भात लावणी 70 टक्के पुर्ण



अलिबाग दि.20,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन झाले  आहे. त्यामुळे भात लावणीला वेग आला असून आज अखेर भात लागवडी खालील एकूण क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्रावर भात लावणी पुर्ण झाली आहे.
            जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून  पावसाचे दिलासादायक पुनरागमन झाले आहे. गेल्या 24 तासात सरासरी 73.06 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1777.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
            गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसाने  जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.   या संदर्भात कृषि विभागाकडुन प्राप्त आकडेवारीनुसार,  जिल्ह्यात एकूण 1 लाख 41 हजार 483 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने  भात पिकाची  लागवड सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजे  1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी आज अखेर भात पिकाची 86 हजार 258 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. एकूण लागवडीच्या 70 टक्के लावणी पुर्ण झाली आहे. सर्वाधिक भात लावणी रोहा तालुक्यात  90 टक्के पुर्ण झाली असून मुरुड, महाड, पोलादपुर, म्हसळा या तालुक्यात 85 टक्क्यांपर्यंत भात लावणी पुर्ण झाली आहे.
            जिल्ह्यात खरीप पिकांत नागली, वरई, अन्य तृणधान्य पिकांची तसेच कडधान्य पिकांची लागवड होत असते. या पेरण्यांनाही वेग आला आहे.  एकूण खरीपाच्या लागवड क्षेत्रापैकी  91 हजार 39 हेक्टर क्षेत्रावर लागवड पुर्ण झाली आहे.  हे प्रमाण 64 टक्के आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक