Posts

Showing posts from April 1, 2018

सामाजिक न्याय मंत्री ना.राजकुमार बडोले यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, दि.7 – राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले हे रविवार दि.8 एप्रिल, रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.8 रोजी दुपारी 12 वा. सेक्टर 20, खारघर नवी मुंबई येथे आगमन व ऑटीजम डे (स्वमग्न दिन) निमित्त ब्युटीफुल टुमारो फाऊंडेशनच्या सतीष हावरे दिव्यांग सेंटर खारघर, नवी मुंबई या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- शारदा सदन प्लॉट नं.54, केसर गार्डनजवळ, सेक्टर 20, खारघर नवी मुंबई. दुपारी पाऊण वा. सतीष हावरे दिव्यांग सेंटर खारघर, नवी मुंबई येथून सेक्टर 7 खारघर नवी मुंबईकडे मोटारीने प्रयाण. दुपारी एक वा. खारघर येथे आगमन व शिक्षण संस्थेतील मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कार्यक्रमास उपस्थिती . स्थळ :- शांताबाई रामराव सभागृह, सत्याग्रह महाविद्यालय, सेक्टर 7 खारघर पोलीस ठाणे जवळ, खारघर, नवी मुंबई. दुपारी दोन वा. खारघर येथून मोटारीने नेरुळ   कडे प्रयाण. 00000

कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून प्लास्टिक बंदीला विशेष मुलांचे 'पाठबळ'

Image
            अलिबाग,जि. रायगड, दि.7 (डॉ.मिलिंद दुसाने)- प्लास्टिक बंदीच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प आणि प्रत्यक्ष कृतितून जनतेचा प्रतिसाद हवाय. प्लास्टिक समस्येचे उग्र रुप दिसते ते प्लास्टिक कॅरी बॅगच्या रुपाने. अलिबाग येथील 'पाठबळ' सामाजिक संस्थेच्या   राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी रद्दी कागदांपासून अल्पदरात कॅरीबॅग तयार करुन प्लास्टिक बंदी च्या शासनाच्या निर्णयाला कृतिशील पाठबळ दिलं आहे. अलिबाग शहरानजिक आरसीएफ कुरुळ येथील राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांची शाळा , ही शाळा शहरातील पाठबळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालविली जाते. सध्या या संस्थेत 33 विशेष मुलं शिक्षण घेत आहेत. विशेष मुलांचे शिक्षण ही सुद्धा एक विशेष बाब असते. हे शिक्षण देण्याचे काम येथील शिक्षीका वृंद मोठ्या तन्मयतेने करतांना दिसतात. विशेष मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांचे वर्ग ठरविणे, त्यांचे शिक्षण ठरविणे, या बाबींचा त्यात समावेश असतो. या मुलांना नैसर्गिक विधींपासून सर्वच गोष्टींचे प्रशिक्षण द्यावे लागते. त्यादृष्टीने येथील कर्

काकळ गावात घडतेय सामाजिक परिवर्तन कुक्कुट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार

Image
            अलिबाग,जि. रायगड, दि.5(डॉ.मिलिंद दुसाने)- दुर्गम भागात असणाऱ्या काकळ ता. माणगाव या गावात रोजगारासाठी स्थलांतराची समस्या. येथील गावकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी   पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परसातील कुक्कुट पालन आणि त्याला शेळीपालन व पशुपालनाची जोड दिल्याने गावकऱ्यांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध झाला आहे. तब्बल 38 लाभार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला असून शेतीपूरक शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात राबविण्यात येत असलेल्या ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानातून ही किमया घडली आहे. या गावात   रोजगारासाठी स्थलांतर हा एक सामाजिक प्रश्न होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानात या गावाची निवड झाली. रायगड जिल्ह्यात 22 ग्रामपंचायतींमधील 56 गावांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक गावात स्थानिक प्रशासनातले अधिकारी हे संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायत काकळ, ता.माणगाव, या गावाकरीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.सुभ

पेण येथे तारण सोन्याचा 21 रोजी जाहीर लिलाव

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:-पेण बँकेच्या शाखेतून ज्या कर्जदारांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे त्याची मुदत संपली असून नोटीसद्वारे सुद्धा त्यांना कळविण्यात आले होते. तथापि आजतागायत कर्जफेड न केल्याने बँकेकडे तारण असलेले दागिने जाहीर लिलावाने विक्री करुन कर्ज वसुली करण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासक मंडळाने घेतला आहे. बँकेकडे तारण दागिन्यांची विक्री जाहीर लिलावाद्वारे   शनिवार दि.21 रोजी सकाळी अकरा वाजता बँकेचे मुख्य कार्यालय पेण   येथे करण्यात येणार आहे,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड तथा प्रशासक मंडळ सदस्य पेण को. ऑप अर्बन बॅंक लि. पेण यांनी कळविले आहे. ०००००

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 ऑनलाईन अर्ज भरण्यास 14 एप्रिल तर एकवेळ समझोत्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत   ऑनलाईन अर्ज भरण्यास 14 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर   एकवेळ समझोता योजनेअंतर्गत   पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा मुदत 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आली होती. ती आता शनिवार दि. 14 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शासनाच्या दिनांक 7 डिसेंबर च्या शासन निर्णयान्वये मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना   (One Time Settlement) या योजनेअंतर्गत   पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची अंतिम मुदतीत वाढ करुन ती शनिवार दि.30 जून पर्यंत वाढवण्यात आली