सामाजिक न्याय मंत्री ना.राजकुमार बडोले यांचा जिल्हा दौरा




अलिबाग,जि. रायगड, दि.7 – राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले हे रविवार दि.8 एप्रिल, रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि.8 रोजी दुपारी 12 वा. सेक्टर 20, खारघर नवी मुंबई येथे आगमन व ऑटीजम डे (स्वमग्न दिन) निमित्त ब्युटीफुल टुमारो फाऊंडेशनच्या सतीष हावरे दिव्यांग सेंटर खारघर, नवी मुंबई या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- शारदा सदन प्लॉट नं.54, केसर गार्डनजवळ, सेक्टर 20, खारघर नवी मुंबई. दुपारी पाऊण वा. सतीष हावरे दिव्यांग सेंटर खारघर, नवी मुंबई येथून सेक्टर 7 खारघर नवी मुंबईकडे मोटारीने प्रयाण. दुपारी एक वा. खारघर येथे आगमन व शिक्षण संस्थेतील मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कार्यक्रमास उपस्थिती . स्थळ :- शांताबाई रामराव सभागृह, सत्याग्रह महाविद्यालय, सेक्टर 7 खारघर पोलीस ठाणे जवळ, खारघर, नवी मुंबई. दुपारी दोन वा. खारघर येथून मोटारीने नेरुळ  कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक