Posts

Showing posts from July 5, 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 :-प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020-21 पासून तीन वर्षांकरिता लागू करण्यात आली आहे.   या योजनेद्वारे शेतक-यांना हवामानातील प्रतिकूलतेमुळे पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड,भूस्खलन, ढगफूटी, नैसर्गिक आग, वादळ, गारपीट, वीज कोसळणे यामुळे होणारे नुकसान, काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामात अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सहभागी शेतक-यांना या योजनेद्वारे आर्थिक आधार मिळणार आहे. कोकण विभागातील शेतक-यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पिक विमा उतरविता येणार आहे. ही योजना खरीप हंगामामध्ये भात, नाचणी व उडीद या पिकांकरिता अधिसूचित क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. भात पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.45 हजार 500 प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.910/- प्रति हेक्टर, नाचणी पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.20 हजार प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.400/- प्रति हेक्टर, उडीद पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.20 हजा

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मु.बामणडोंगरी, पो.वहाळ येथील पूर्वेस-सिताबाई भोईर यांचे घर, पश्चिमेस-अनंता महादेव कोळी यांचे घर, दक्षिणेस-शालिक भोईर यांचे घर व उत्तरेस-दिनानाथ घरत यांचे घर हा परिसर. मु.डोलघर, पो.बारापाडा येथील पूर्वेस-राजेश गणपत पाटील यांचे घर, पश्चिमेस-बाळकृष्ण नारायण खोत यांचे घर, दक्षिणेस-वासुदेव जाना खोत यांचे घर व उत्तरेस-अंबाजी कोळी यांचे घर हा परिसर. कोळवाडी येथील पूर्वेस-रिकामी जागा, पश्चिमेस-जना भोईर यांचे घर, दक्षिणेस-रिकामी जागा व उत्तरेस-श्रीपद पाटील यांचे घर हा परिसर. मु.कोपर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-अनंत ठाकूर यांचे घर, पश्चिमेस-तुकाराम घरत यांचे घर, दक्षिणेस-किराना दुकान/गाळे व उत्तरेस-दिनेश घरत यांचे घर हा परिसर. पळस्पे फाटा-कोळखे येथील ए-608, झोडीयाक, मॅराथॉन नेक्सझोन, पळस्पे फाटा-कोळखे हा परिसर. शिरढोण येथील

जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.50 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-3.50 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.40 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.95 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 48 मि.मि.पावसाची नोंद

वृत्त क्रमांक :- 932                                                                                   दिनांक :- 10 जुलै 2020     अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 48.29 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1051.14 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 19.00 मि.मि., पेण-45.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-11.60 मि.मि., उरण-19.00 मि.मि., कर्जत-14.20 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-106.00 मि.मि., रोहा-66.40 मि.मि., सुधागड-38.00 मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-67.00 मि.मि., पोलादपूर-128.00, म्हसळा-68.00मि.मि., श्रीवर्धन-23.00 मि.मि., माथेरान-53.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 772.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 48.29 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 32.68 टक्के इतकी आहे. 00000

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.09 (जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- कोळवाडी येथील पूर्वेस-आकाश भोईर यांचे घर, पश्चिमेस-रिकामी पडीक जागा, दक्षिणेस-धोंडू भोईर चाळ व उत्तरेस-संतोष भोईर यांचे घर हा परिसर. कोप्रोली येथील रॉयल मिडोज को.ऑप.हौ.सो.,बी-1 विंग, पूर्वेस-बी-2 विंग, पश्चिमेस-जी-1 विंग, दक्षिणेस-ए-2 व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. पालेबुद्रुक येथील कृष्णा पार्क, इ-2 विंग, पूर्वेस-गार्डन, पश्चिमेस-रिकामी जागा, दक्षिणेस-बिल्डिंगनं.3 कृष्णा पार्क व उत्तरेस-ए विंग हा परिसर. कानपोली येथील पूर्वेस-बाळाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-सोपान पोरजी यांचे घर, दक्षिणेस-संजय पवार यांचे घर व उत्तरेस-संजय भोईर यांचे घर हा परिसर. मु.बंबावीपाडा, पो.वहाळ येथील पूर्वेस-प्रविण नरेश मुंडकर यांचे घर, पश्चिमेस-चेतन बाळकृष्ण पाटील यांचे घर, दक्षिणेस-समीर जनार्दन मुंडकर यांचे घर व उत्तरेस-हरिश्चंद्र जनार्दन पा

जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.9(जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.45 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.80 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.45 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.10 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 36 मि.मि.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.9 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1002.85 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 10.00 मि.मि., पेण-40.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-12.20 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-35.20 मि.मि., खालापूर-28.00 मि.मि., माणगांव-45.00 मि.मि., रोहा-42.30 मि.मि., सुधागड-42.00 मि.मि., तळा-49.00 मि.मि., महाड-58.00 मि.मि., पोलादपूर-65.00, म्हसळा-27.00मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-76.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 582.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 36.43 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 31.18 टक्के इतकी आहे. 00000

राष्ट्रीय सहकारिता विकास निगम नियामक मंडळावर प्रा.डॉ.उदय जोशी यांची नियुक्ती

  अलिबाग, जि.रायगड, दि.08 (जिमाका) :-   प्रा.डॉ.उदय जोशी यांची राष्ट्रीय सहकारिता विकास निगम National Cooperative Development Corporation (NCDC) नियामक मंडळावर केंद्र शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून, केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. NCDC वर प्रतिनिधित्व करण्याची रायगड जिल्ह्यास या निमित्ताने प्रथमच संधी मिळालेली आहे. NCDC तर्फे देशभरातील सहकार संस्थांना (विशेषत: सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, मच्छीमार संस्था, दुग्धसंघ,इ) दिर्घ मुदतीचा वित्त पुरवठा करण्यात येतो. केंद्रीय कृषी मंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.   IAS श्रेणीतील अधिकारी कार्यकारी संचालक असतात. या नियुक्तीचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून डॉ.उदय जोशी यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. ००००००

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.08 (जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- उलवे येथील मातृछाया अपार्टमेंट, प्लॉट नं.131, सेक्टर-02, पहिला मजला हा इमारतीचा भाग. मु.शेलघर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-मनोहर काशिनाथ भगत यांचे घर, पश्चिमेस-जनार्दन भगत यांचे घर, दक्षिणेस- संतोष भगत यांचे घर व उत्तरेस-प्रतिक जगजीवन भगत यांचे घर हा परिसर. मु.शेलघर, पो.गव्हाण येथील पूर्वेस-गुलाब तुकाराम घरत यांचे घर, पश्चिमेस-रघुनाथशेठ घरत यांचे घर, दक्षिणेस- जिल्हा परिषद शाळा व उत्तरेस-रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स हा परिसर. मु.बामणडोंगरी, पो.वहाळ येथील पूर्वेस-अंगणवाडी, पश्चिमेस-संतोष जनार्दन म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस- उलवे नोड सेक्टर-19 बी व उत्तरेस-गणेश हिरा नाईक यांचे घर हा परिसर. मु.ओवळे, पो.पारगाव येथील पूर्वेस-तुकाराम महादेव पाटील यांचे घर, पश्चिमेस-मोकळे मैदान, दक्षिणेस-उदय शंकर पाटील यांचे घर व उत्तरेस-ज

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.08 (जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मु.तारा, पो.बारापाडा येथील पूर्वेस-राजेंद्र हासुराम म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-राजेंद्र तुकाराम म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-सुनिल बाबूराव यादव यांचे घर व उत्तरेस-भगवान पोशा म्हात्रे यांचे घर हा परिसर. पळस्पे येथील हरीटेज रुम नं.301,कुडावे रोड, पळस्पे गाव, पूर्वेस-मैत्री पार्क, पश्चिमेस-नदी, दक्षिणेस-शेती व उत्तरेस-स्मशानभूमी हा परिसर. पोयंजे येथील पूर्वेस-पडीक घर, पश्चिमेस-मारुती केरु मते यांचे घर, दक्षिणेस-गावदेवी मंदिर व उत्तरेस-विनायक दत्तात्रेय चोरघे यांचे घर हा परिसर. साई येथील पूर्वेस-बबन कृष्णा वाघमारे यांचे घर, पश्चिमेस-कमलाकर गोपाळ पवार यांचे घर, दक्षिणेस-अक्षय कमलाकर पवार यांचे घर व उत्तरेस-विकास जयराम पवार यांचे घर हा परिसर. साई येथील पूर्वेस-वसंत जनार्दन तांडेल यांचे घर, पश्चिमेस-अलका वसंत पाटील यांचे

जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.8(जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.40 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.65 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.80 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 76 मि.मि.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.8(जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 76.91 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 966.42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 79.00 मि.मि., पेण-110.00 मि.मि., मुरुड-83.00 मि.मि., पनवेल-89.00 मि.मि., उरण-87.00 मि.मि., कर्जत-57.20 मि.मि., खालापूर-68.00 मि.मि., माणगांव-75.00 मि.मि., रोहा-106.00 मि.मि., सुधागड-74.00 मि.मि., तळा-93.00 मि.मि., महाड-68.00 मि.मि., पोलादपूर-43.00, म्हसळा-56.00मि.मि., श्रीवर्धन-26.00 मि.मि., माथेरान-116.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1230.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 76.91 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 30.05 टक्के इतकी आहे.

उरण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :   जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- चाणजे येथील सुरेश चव्हाण यांचे घर, मु.पंचवटी कॉलनी, पूर्वेस-जयप्रकाश सुद्राणिया यांचे गोडाऊन, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-करुणा पाटील यांचे घर व उत्तरेस-मोकळी जागा हा परिसर. केगाव येथील पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस-मोकळी जागा, दक्षिणेस-चंद्रकांत महादेव पाटील यांचे घर व उत्तरेस-मनोहर केशव पाटील यांचे घर हा परिसर ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल   श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्य

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

     अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :   जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे कोपर येथील पूर्वेस-नवजीवन हेल्थकेअर, पश्चिमेस-उदय जानू घरत यांचे घर,दक्षिणेस-रघुनाथ सोमा घरत यांचे घर व उत्तरेस-गजानन वामन घरत यांचे घर हा परिसर. मु.पाटनोली,पो.कुंडेवहाळ येथील पूर्वेस-शरद काना पाटील यांचे घर, पश्चिमेस-पडिक शेती, दक्षिणेस-प्रभाकर कान्हा पाटील यांचे घर व उत्तरेस-कानुबाई कमलाकर पाटील यांचे घर हा परिसर. मु.दिघाटी, पो.केळवणे येथील पूर्वेस-रुबाबन बंधू पाटील यांचे घर, पश्चिमेस-दिपक नथुराम पाटील यांचे घर, दक्षिणेस-पडिक घर व उत्तरेस-गणपती मंदिर हा परिसर. उलवे येथील मु.इलिजन्ट ऑलिमपीया बिल्डिंग, को.ऑ.हौ.सो.,प्लॉट नं.23, सेक्टर-21, सहावा   मजला हा इमारतीचा भाग. मु.देवळोली, पो.रसायनी येथील पूर्वेस-हरिश्चंद्र गणपत पाटील यांचे घर, पश्चिमेस-शेती, दक्षिणेस राजेश शंकर पाटील यांचे घर व उत्तरेस-रमेश शंकर पाटील यां

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून वेबिनार सिरीजच्या माध्यमातून केले जाणार व्यावसायिक विषयांचे मार्गदर्शन

अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :- सद्य:स्थितीत बेरोजगारांची संख्या जरी जास्त असली तरी शासन स्तरावर विविध माध्यमांमधून बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्याचबरोबर युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, मार्गदर्शन मिळावे, यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) रायगड यांच्याकडून उद्योजकता-जागरूकता, गरज आणि महत्व-दि. 14 जुलै 2020, कोविड-19 नंतरच्या संधी-दि.21 जुलै 2020, आत्मनिर्भर-लोकल ते ग्लोबल-दि.28 जुलै 2020, प्रकल्प अहवाल (बनविणे आणि समजणे एक गरज)-दि. 04 ऑगस्ट 2020, क्रेडिट डिसिप्लिन (Credit Discipline)-दि. 11 ऑगस्ट 2020, डिजिटल मार्केटिंग-दि.18 ऑगस्ट 2020, अकुशल ते कुशल-दि. 25 ऑगस्ट 2020 या विषयांवर वेबिनार सिरीजच्या माध्यमातून विविध विषय तज्ञांचे ऑनलाइन मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. वरील सर्व विषयांचे मार्गदर्शन दर मंगळवारी सकाळी 11.30   वाजता होणार असून   वेबिनारसाठी आपल्या फोन मध्ये Google Meet app download करणे आवश्यक आहे. वेबिनार सिरीज संपेपर्यंत आवश्यक सूचना आणि बदलांसाठ

जिल्हा स्तरावरील गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द

अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या   स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ www.raigad.gov.in यावर प्रसिध्द करण्यात   आलेली आहे. या यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत/आक्षेप असल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज दि.15 जुलै 2020 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. दि.15 जुलै   नंतर आलेल्या हरकत अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे. ०००००

पेण तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

    अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :-   जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे पाटणोली येथील पांडूरंग नारायण कोळी यांचे घर ते धनाजी चिंतामण कोळी ते विकी बाबूराव कोळी यांच्या घरापर्यंतचे क्षेत्र मौजे तांबडशेत येथील श्रीमती मनिषा समाधान पाटील यांचे घर (खोली क्र.1) ते ज्ञानेश्वर नामदेव पाटील यांचे घर (खोली क्र.4) पर्यंतचे एकूण चाळीतील रुम क्र.01 ते 05 हे क्षेत्र ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण   श्रीमती प्रतिमा पुदलवाड-शेंगूलवार यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती