ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून वेबिनार सिरीजच्या माध्यमातून केले जाणार व्यावसायिक विषयांचे मार्गदर्शन




अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :- सद्य:स्थितीत बेरोजगारांची संख्या जरी जास्त असली तरी शासन स्तरावर विविध माध्यमांमधून बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्याचबरोबर युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, मार्गदर्शन मिळावे, यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) रायगड यांच्याकडून उद्योजकता-जागरूकता, गरज आणि महत्व-दि. 14 जुलै 2020, कोविड-19 नंतरच्या संधी-दि.21 जुलै 2020, आत्मनिर्भर-लोकल ते ग्लोबल-दि.28 जुलै 2020, प्रकल्प अहवाल (बनविणे आणि समजणे एक गरज)-दि. 04 ऑगस्ट 2020, क्रेडिट डिसिप्लिन (Credit Discipline)-दि. 11 ऑगस्ट 2020, डिजिटल मार्केटिंग-दि.18 ऑगस्ट 2020, अकुशल ते कुशल-दि. 25 ऑगस्ट 2020 या विषयांवर वेबिनार सिरीजच्या माध्यमातून विविध विषय तज्ञांचे ऑनलाइन मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
वरील सर्व विषयांचे मार्गदर्शन दर मंगळवारी सकाळी 11.30  वाजता होणार असून  वेबिनारसाठी आपल्या फोन मध्ये Google Meet app download करणे आवश्यक आहे. वेबिनार सिरीज संपेपर्यंत आवश्यक सूचना आणि बदलांसाठी Whatsapp ग्रुप वर सूचित करण्यात येईल. 
तरी रायगड जिल्ह्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी नाव नोंदणीसाठी  https://forms.gle/fRgTReePt4DbHin49  या लिंक वर क्लिक करावे व अधिक माहितीसाठी 02141-222214 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे (RSETI) संचालक, विजयकुमार कुलकर्णी  यांच्याकडून करण्यात आले आहे.
०००००

Comments

  1. pushpa gharat
    at bhatanpada
    post somathne
    tei panvel
    Dist raiga
    pine 410206

    ReplyDelete
    Replies
    1. 18 July 2020
      Gavdevi mahila Bachat gat poyanje
      Niyati mali
      At-post-poyanje
      Tal -panvel
      Dist- taiga do
      Pin-410206

      Delete
    2. Aai ekvira bachat gat poyanje
      Roshani mundhe
      At-post-poyanje
      Tal - panvel
      Dist-raigad
      Pin-410206

      Delete
    3. Aai ekvira Mahila bachat gat poyanje
      Roshani mundhe
      At-post-poyanje
      Tal-panvel
      Dist-raigad
      Pin-410206

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक