Posts

Showing posts from February 10, 2019

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे रविवार दि.17 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.17 रोजी सायं. साडेपाच वा.जे.एन.पी.टी. उरण येथे आगमन व शिवसमर्थ स्मारकाचे अनावरण व जे.एन.पी.टी. मधील विविध प्रकल्पांच्या भूमीपुजन व उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.   सायं.साडे सात वा.जे.एन.पी.टी.   येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपुजन अलिबागचे प्रशिक्षण केंद्र आदर्शवत ठरावे- ना. महादेव जानकर

Image
  अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका) - महाराष्ट्राला 720 कि.मी चा सागरी किनारा लाभला असतांनाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छिमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते, त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय   मंत्री ना. महादेव जानकर यांनी आज येथे केले. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय   प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन आज ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अलिबाग येथे कोळीवाडा परिसरात मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय विनोद नाईक, कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगले,रायगडचे सह आ

वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेची बैठक 21 रोजी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- राज्य सरकारी आहरण व संवितरण अधिकारी आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेत सहभागी होणारे व झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेच्या अनुषंगाने गुरुवार दि.21 फेब्रुवारी रोजी एमडीइंडिया (TPA) यांच्यासमवेत जंजिरा हॉल अलिबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.    सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील जुलै 2018 ते जून 2019 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज इ.मुल्ला यांनी केले आहे. 00000

किसान क्रेडीट कार्ड वाटप योजना शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.     या योजनेस पात्र शेतकऱ्यांनी   आपल्या नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयांना भेट देऊन त्यांच्याकडील असलेला अर्ज भरुन तो संबंधित बँक शाखेकडे देण्यात यावा. या अर्जासोबत शेतकऱ्यांनी त्यांचा स्वत:चा आधारकार्ड, 7/12 उतारा, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.    ज्या शेतकऱ्यांचे कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडलेले नाही त्यांनी सदरील अर्ज भरुन नजिकच्या बँक शाखेत आपले खाते उघडणे आवश्यक आहे.   या योजनेच्या लाभासाठी आवश्यक   असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. 00000

वावंजे,शिरवली,सोनारी ग्रा.पं. कार्यक्षेत्रात मनाई आदेश

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.16:- पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत वावंजे व शिरवली ग्रामपंचायत तसेच न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत सोनारी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून दि.24 रोजी मतदान व दि.25 रोजी मतमोजणी होणार आहे.   या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी वर नमूद ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात बुधवार दि. 27 च्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.   पोलीस उप आयुक्त विशेष शाखा नवीमुंबई पंकज डहाणे यांनी हे आदेश निर्गमित केले असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 00000

केंद्रीय भूतल परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हादौरा

  अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका) -केंद्रीय भूतल परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री ना. नितीन गडकरी हे रविवार दि.17 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि.17 रोजी सायंकाळी साडेपाच वा. जेएनपीटी उरण येथे आगम व दास्तान फाटा उरण कडे प्रयाण, सायं. पावणे सहा वा. दास्तान फाटा उरण येथे आगमन व सायं.6 वा. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मारक, पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 ते 9   जेएनपीटी येथे राखीव, रात्री 9 वा. जेएनपीटी येथून बोटीने गेट वे ऑफ इंडीया कडे प्रयाण. 00000

संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) -येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात   संत सेवालाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रोहयो उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी अभिवादन केले. यावेळी तहसिलदार के.डी. नाडेकर   तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 00000

सर्व समावेशक महिला सल्लागार समिती सभा पिडीत महिलांच्या सहाय्यासाठी एकात्मिक सेवा केंद्राचा प्रस्ताव

Image
  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) -अन्याय व अत्याचार पिडीत महिलांना सर्व प्रकारची मदत व तत्पश्चात पुनर्वसन सेवा देण्यासाठी एकात्मिक सेवा केंद्राचा प्रस्ताव असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावावा, अशा सुचना जिल्हा सर्व समावेशक महिला सल्लागार समितीने दिल्या आहेत.   जिल्हास्तरीय सर्व समावेशक महिला सल्लागार समिती तसेच बाल न्याय अधिनियम 2018 अन्वये स्थापन जिल्हास्तरीय बाल सल्लागार समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा परिविक्षा समिती, जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती   बैठक   जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.14) पार पडल्या. यावेळी   उपजिल्हाधिकारी रविंद्र पठपती हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर यावेळी सत्र न्यायाधीश मलशेट्टी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे   सचिव या. जयदीप मोहिते, कारागृह अधिक्षक एस.आर.पवार,पोलीस निरीक्षक   सुरेश वराडे,   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, उपशिक्षणाधिकारी एस.सी.पवार, तसेच समितीचे सदस्य डॉ.नीता कदम, शोभा उदय जोशी,   ॲड. रोशनी ठाकूर, राहुल किसन धुळे, ॲड दीपाली बोंद्रे, शुभांगी झेमसे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, किरण वाघुळे, जिल्हा संरक्षण अधिकारी  

एलएलआयएन रसायनी प्रकल्प भूमिपूजन सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रकल्प- ना.डी. बी.सदानंद गौडा

Image
  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) -देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागृत असून एलएलआयएन रसायनी प्रकल्प सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरेल, असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांनी गुरुवारी (दि.14) रसायनी येथे केले.   रसायनीस्थित हिल (एचआयएल) इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याच्या अद्यावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. गौडा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.   या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव आडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव, हिल इंडियाचे सीएमडी एस. पी. मोहंती तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते.   ना.गौडा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी धोरणे तयार केली व त्याची यशस्वी अंमलबजावणीही केल

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 337 जणांची प्राथमिक निवड

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व   अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे   आयोजन करण्यात आले होते.   यामेळाव्यात सहभागी विविध कंपन्या व उद्योजकांनी 640 जागांसाठी   या मेळाव्यात उमेदवारांना पाचारण केले होते. त्यात 540 उमेदवारांनी उपस्थिती दिली व त्यातील 337 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. अलिबाग न.प. शाळा क्रमांक 1 येथे हा मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांतशेठ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक एस.जी. पवार, मुख्याधिकारी महेश चौधरी, ॲड प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, कोटक महिन्द्रा बँक, डीएचएफएल बँक, अल-फलाह, आगा कारवान, पीएसआयपीएल, मिंट स्कील, फास्टट्रॅक सोल्युशन्स, आदित्य बिर्ला ग्रुप, युरेका फोर्ब्स, पीआयजीयो, एसकेएसपीएल, कादीर एन्टरप्राईजेस, डेल्टाफिल्टर अँड सेपरेटर्स प्रा.लि.,जार्वीस टेक्नॉलॉजिज, टेक्नोसीम ट्रेनिंग सर्व्हिस

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर यांचा जिल्हादौरा

  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) -राज्याचे पशुसंवर्ध, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय   मंत्री ना. महादेव जानकर   हे शनिवार दि.16 रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.16 रोजी दुपारी दोन वा. 20 मि. नी. मांडवा बंदर येथे आगम व शासकीय वाहनाने कोळीवाडा अलिबागकडे प्रयाण,   दुपारी तीन वा. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती,   दुपारी साडेचार वा.   अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा बंदरकडे रवाना, सायं.पाच वा.10 मि. नी. बोटीने मुंबईकडे प्रयाण. 00000

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आज भूमिपुजन

  अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका) - शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय   प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन शनिवार दि.16 रोजी दुपारी तीन वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अलिबाग येथे   कोळीवाडा परिसरात   मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र   इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री आ. अनंत गिते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय   मंत्री ना. महादेव जानकर, राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्नव नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय   राज्यमंत्री ना. अर्जून खोपकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, लोकसभा सदस्य खा. श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले   सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. धैर्यश

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2019 अलिबाग येथील सहा उपकेंद्रावर बैठक व्यवस्था

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा-2019 ही परीक्षा रविवार दि.17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था अलिबाग शहरातील आर.सी.एफ.सेंकडरी ॲण्ड हायर सेंकडरी हायस्कूल, जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,पी.एन.पी.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अलिबाग, जा.र.ह.कन्याशाळा अलिबाग, जे.एस.एम.कॉलेज अलिबाग (Part 1 ), जे.एस.एम.कॉलेज अलिबाग (Part 2 ) या उपकेंद्रावर   करण्यात आली आहे.             आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.   परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे.   तसेच पर्यावेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आले आहे.   परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.   जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.   या संदर्भात परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी

राष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखेत बदल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दि.9 मार्च रोजी 'राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात   आले होते.   तथापि, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आता सदरची लोकअदालत रविवार दि. 17 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.   या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,138 एन आय ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड,वीजवितरण,राष्ट्रीयकृत बॅंका आणि पतसंस्था यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे. तसेच या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ

ग्रा.पं. निवडणूक : मतदानासाठी 24 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.   त्यानुसार जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार दि. 24 रोजी मतदान होणार असून सोमवार दि.25 रोजी मतमोजणी होणार आहे.   याकरिता ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी रविवार दि.24 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. 00000

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जुन्या साहित्यांचा 20 रोजी लिलाव

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड राऊतवाडी, वेश्वी ता.अलिबाग, या कार्यालयाच्या जुन्या नादुरुस्त लाकडी व लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक साहित्य, गाडीचे जुने पार्टस जाहीर लिलावाद्वारे विकण्याची कारवाई बुधवार दि.20 रोजी सकाळी अकरा वा.करण्यात येणार आहे.लिलावातील साहित्य अटी व शर्थी याबाबत सविस्तर माहिती व साहित्य पाहणीसाठी सोमवार दि.18 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध होऊ शकेल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.02141-222154/094 वर संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके यांनी कळविले आहे. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे  दि.15 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.15 रोजी दुपारी एक वा. महाड एम.आय.डी.सी. येथे आगमन.  दु. अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून गांधारपाले महाडकडे प्रयाण. दु.तीन वा.गांधारपाले महाड येथे आगमन. सायंकाळी पाच वा.गांधारपाले महाड येथून एम.आय.डी.सी. महाडकडे प्रयाण.  सायं.सहा वा. एम.आय.डी.सी. महाड येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वा.  एम.आय.डी.सी.महाड येथून ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.  रविवार दि.17 रोजी सकाळी अकरा वा.पोलादपूर येथे आगमन.  दुपारी एक वा. पोलादपूर येथून महाड एम.आय.डी.सी.कडे प्रयाण.  दु.दीड वा. महाड एम.आय.डी.सी.येथे आगमन.  दु.अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे  दि.15 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.15 रोजी दुपारी एक वा. महाड एम.आय.डी.सी. येथे आगमन.  दु. अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून गांधारपाले महाडकडे प्रयाण. दु.तीन वा.गांधारपाले महाड येथे आगमन. सायंकाळी पाच वा.गांधारपाले महाड येथून एम.आय.डी.सी. महाडकडे प्रयाण.  सायं.सहा वा. एम.आय.डी.सी. महाड येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 16 रोजी सकाळी साडेनऊ वा.  एम.आय.डी.सी.महाड येथून ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.  रविवार दि.17 रोजी सकाळी अकरा वा.पोलादपूर येथे आगमन.  दुपारी एक वा. पोलादपूर येथून महाड एम.आय.डी.सी.कडे प्रयाण.  दु.दीड वा. महाड एम.आय.डी.सी.येथे आगमन.  दु.अडीच वा. महाड एम.आय.डी.सी. येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाः शुक्रवारपर्यंत लाभार्थ्यांच्या याद्या पूर्ण करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी   दोन हेक्टर (पाच एकर) पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून प्रत्येक महसूली गावातून ही माहिती गोळा करुन येत्या शुक्रवार दि.15 पर्यंत या याद्या पुर्ण कराव्या,असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.              प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याच्या कामाचा आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सहा. निबंधक आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत या योजनेच्या अंमलबजावणीत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे. दि.4 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार दि.15 फेब्रुवारीपर्यंत या याद्या पूर्ण करावयाच्या आहेत.   प्रत्येक मह

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त पेण आरटीओ कार्यालयाचे विविध उपक्रम

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण तर्फे 30 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहास सोमवार दि.4 पासून प्रारंभ झाला असून सलग पंधरा दिवस रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने वाहन चालक-मालकांसाठी तसेच शिकाऊ व कायम लायसन्स मिळविण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यान देण्यात येत आहे तसेच माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे.  या निमित्ताने रस्ता सुरक्षा विषयक नियमांची व सुरक्षित वाहतुकीबाबतची माहिती वाहन धारकांना कार्यालयीन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती अपर्णा चव्हाण या देत आहेत.  या उपक्रमाचा लाभ कार्यालयीन कामासाठी उपस्थित असलेले वाहनधारक तसचे शिकाऊ व कायम लायन्सस मिळविण्यासाठी येणारे उमेदवार घेत आहेत.  ही माहिती केवळ तोंडी न देता सोबत माहिती पत्रकेसुध्दा देण्यात येत आहेत.सदर व्याख्यानामध्ये सुरक्षित रस्ता वाहतुकी संदर्भातील नियम, वाहन चालविताना योग्यप्रकारे सिटबेल्टचा वापर, दुचाकी वाहन धारकांसाठी हेल्मेटचा वापर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत तसेच वाह

अलिबाग येथे शुक्रवारी(दि.15) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व   अलिबाग नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे   आयोजन करण्यात आले आहे.   हा मेळावा शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 10 वा.अलिबाग न.प. शाळा क्रमांक 1, सरखेल कान्होजी आंग्रे समाधीजवळ, अलिबाग, ता.अलिबाग, जिल्हा-रायगड येथे होणार आहे.                 या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, कोटक महिन्द्रा बँक, डीएचएफएल बँक, अल-फलाह, आगा कारवान, पीएसआयपीएल, मिंट स्कील, फास्टट्रॅक सोल्युशन्स, आदित्य बिर्ला ग्रुप, युरेका फोर्ब्स, पीआयजीयो, एसकेएसपीएल, कादीर एन्टरप्राईजेस, डेल्टाफिल्टर अँड सेपरेटर्स प्रा.लि.,जार्वीस टेक्नॉलॉजिज, टेक्नोसीम ट्रेनिंग सर्व्हिसेस, इत्यादी आस्थापनांचे प्रतिनिधी त्यांचेकडील रिक्तपदांकरीता उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सहभागी होणार आहेत. या कंपन्यांना त्यांच्याकडील रिक

मनरेगातून गडकिल्ल्यांचे जतन संवर्धन अभिमान महाराष्ट्र योजनेची रायगड किल्ल्यावर घोषणा राज्यातल्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुन देणार- ना. रावल

Image
किल्ले रायगड, ता.महाड, जि. रायगड, दि. 11 (जिमाका)- राज्यातील 450 हून अधिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शिवभक्त गड-दुर्गप्रमी प्रयत्नशिल असतात. त्यांच्या या प्रयत्नांना शासनाने मनरेगा अर्थात रोजगार हमी योजनेची घोषणा आज दुर्गराज किल्ले रायगडावर राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावल यांनी केली. दुर्गराज किल्ले रायगडावर हत्ती खाना परिसरात आज दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, राज्यसभा सदस्य तथा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे, सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, मनरेगा आयुक्त रंगनायक, पुरातत्व विभागाचे ए.के.सिंह, डॉ. तेजस गर्ग, माजी आमदार माणीकराव जगताप, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार आदी अधिकारी तसेच शिवभक्त दुर्गप्रेमी उपस्थित होते. यावेळी ना. रावल यांनी अभिमान महाराष्ट्रः गड किल