जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जुन्या साहित्यांचा 20 रोजी लिलाव


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रायगड राऊतवाडी, वेश्वी ता.अलिबाग, या कार्यालयाच्या जुन्या नादुरुस्त लाकडी व लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक साहित्य, गाडीचे जुने पार्टस जाहीर लिलावाद्वारे विकण्याची कारवाई बुधवार दि.20 रोजी सकाळी अकरा वा.करण्यात येणार आहे.लिलावातील साहित्य अटी व शर्थी याबाबत सविस्तर माहिती व साहित्य पाहणीसाठी सोमवार दि.18 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध होऊ शकेल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.02141-222154/094 वर संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक