Posts

Showing posts from September 11, 2016

रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग Phone No. -222019 Fax-223522 Blog-dioraigad                Email - dioraigad@ gmail.com              Twitter-@dioraigad              Facebook-dioraigad दिनांक   :- 17 सप्टेंबर   2016                                                                                               वृत्त क्र. 607 रायगड जिल्ह्यात   वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी चा इशारा अलिबाग दि.17 :-   रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिला आहे.             रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला असून 7 से.मी. ते 12 से.मी. इतका पाऊस तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक 12 से.मी. ते 24 सें.मी. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   वाऱ्याचा वेग 45 ते 55 कि.मी. प्रतितास असा राहणार असून या कालावधीत समुद्र खवळलेला राहिल.   त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये   असा इशारा देण्यात आला आहे.                

स्वच्छतेची मोहिम अभियानापुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 17 सप्टेंबर  2016                                                      वृत्त क्र. 603 स्वच्छतेची मोहिम अभियानापुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी                                                           --जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले             अलिबाग दि. 17:- निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता  मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे  केले.  आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिम अंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.   यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आर.जे.नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अलिबाग प्र

जलयुक्त शिवार अभियान खालापूर तालुक्याला वरदान

Image
दिनांक :- 16सप्टेंबर 2016                                                           लेख क्र- 34                                                    जलयुक्त शिवार अभियान खालापूर तालुक्याला वरदान                             महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविली आणि मोठी जलक्रांतीच घडून आली.  सन 2019 पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.  गतवर्षी 26 जानेवारीला या योजनेचा  राज्यस्तरीय शुभारंभाचा सन्मान रायगड जिल्ह्याला मिळाला.             एका महत्वाकांक्षी अशा जलुयक्त शिवार योजनेचा पाया भक्कम ठरला.   या  अभियानातील ही कथा आहे खालापूर परिसरातील जलविकासाची, जलयुक्त शिवार अभियानाच्या यशाची.... पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे.  भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.  राज्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करणे-शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.  राज्यात

माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांच्यासाठीचे विशेष गौरव पुरस्कार

दिनांक :- 15 सप्टेंबर  2016                                                          लेख क्र. 32 माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांच्यासाठीचे  विशेष गौरव पुरस्कार            माजी सैनिक आपल्या सैनिक सेवेतील कार्यकाल पूर्ण केल्यानंतर विविध  क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असतात.  नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत करुन आपले बहुमोल योगदान देत असतात. देश तसेच राज्याची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम त्यांच्या हातून होते.  अशा माजी सैनिक तसेच  पत्नी,पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरासाठी विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील पुरस्काराची माहिती देणारा लेख..              राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर,जळीत,दरोडा,अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश,राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय