जलयुक्त शिवार अभियान खालापूर तालुक्याला वरदान

दिनांक :- 16सप्टेंबर 2016                                                           लेख क्र- 34
                                                  
जलयुक्त शिवार अभियान
खालापूर तालुक्याला वरदान


                            महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविली आणि मोठी जलक्रांतीच घडून आली.  सन 2019 पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.  गतवर्षी 26 जानेवारीला या योजनेचा  राज्यस्तरीय शुभारंभाचा सन्मान रायगड जिल्ह्याला मिळाला.  
          एका महत्वाकांक्षी अशा जलुयक्त शिवार योजनेचा पाया भक्कम ठरला.   या  अभियानातील ही कथा आहे खालापूर परिसरातील जलविकासाची, जलयुक्त शिवार अभियानाच्या यशाची....





पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे.  भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.  राज्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करणे-शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.  राज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची, शाश्वत-ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीविकरण करुन पाणीपुरवठयात वाढ करणे.  भूजल अधिनियम अंमलबजावणी.  विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे.  पाणीसाठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.  अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची (बंधारे,गाव तलाव,पाझर तलाव,सिमेंट बंधारे) पाणीसाठवण क्षमता पुनर्स्थापित करणे/वाढविणे.  अस्तित्वातील जलस्त्रोतामधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोतांचा पाणीसाठा वाढविणे.  वृक्षलागवडीस प्रेात्साहन देऊन वृक्ष लागवड करणे.  पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव,जागृती निर्माण  करणे.  शेतीतील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन,जनजागृती करणे.  पाणी अडविणे,जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे, लोकसहभाग वाढविणे असा उद्देश ठेऊन राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार हे अभियान राबविण्यात आले.
रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते.  रायगड जिल्ह्यात साधारणत  50 हजार मि.मी. इतका पाऊस वर्षाला पडतो.  खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात.  पण हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले  तर…म्हणूनच जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये 945 कामे पूर्ण करण्यात आली.  अगदी खालापूर तालुक्यात 95 कामे पूर्ण झाली असून यात सलग समतर चर-7, माती नाला बांध -29, मातीनाला बांध दुरुस्ती-14, अनघड दगडी बांध-17, शेततळे-6, सिमेंट नाला बांध-7, सिमेंट बांध दुरुस्ती-5, जुनी भातशेती दुरुस्ती-10 अशी एकूण 95 कामे पूर्ण झाली असून या कामांमुळे 673 टी.सी.एम.अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.
खालापूर तालुक्यात चावणी व नडोदा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत काही कामे करण्यात आली.  तर उंबरे,खानव,बोरगाव या गावातही योजनेंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. 2015 च्या आराखडयानुसार 54 कामे प्रस्तावित होती.  ही कामे 81.40 हेक्टरमध्ये राबविण्यात आली.  सलग समतर चर, मातीचें बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरुस्ती, गाळ काढणे आदि कामांचा समावेश करुन योजनेला मूर्त स्वरुप देण्याचा चांगला प्रयत्न या भागात झाला.   नडोदे परिसरात 68.48 हेक्टर मध्येही मातीचे बांध 12, सिमेंट नाला 1, शेततळे 3 जुन्या भातशेतीची दुरुस्ती करण्यात आली असून  सिमेंटचे बांध 3 ठिकाणी तयार केले.  6 ठिकाणचे गाळ काढण्यात आले.
प्रस्तावित आराखडा
खानव,उंबरे,बोरगाव खुर्द सोंडेवाडी या 3 गावांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये असून त्याचा आराखडा तयार झाला आहे.  हा भाग काहीसा डोंगराळ असल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे.   खानाव हे जवळपास 1800 लोकवस्ती असलेले गाव.   तर बोरगाव खुर्द सोंडेवाडी ची लोकसंख्या  जवळपास 1200 आणि उंबरे ची लोकसंख्या जवळपास 1700 आहे.  त्यामुळे या भागात पाणी टंचाईला पर्याय म्हणून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या योजना राबविल्या जात आहेत.   या ठिकाणी देखील  सलग समतर चर, मातीचें बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरुस्ती, गाळ काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. खानाव परिसरात एकूण 38/81.50 हेक्टर, बोरगाव  परिसरात 46/115 हेक्टर भागात उपरोक्त कामे केली जाणार आहेत.
            एकूणच या जलशिवार  योजनेमुळे या भागात झालेल्या कामांमुळे पाणीसाठा साचून तो जमिनीत मुरविण्यामध्ये बरेचसे यश मिळाले आहे.  येत्या काही वर्षात या अभियानांतर्गत कामे पूर्ण झाल्यावर भूगर्भात पाणी जिरवून व जमिनीची धूप थांबविण्यात आणखीन मोठे यश मिळवून येथील पाणी टंचाई कायमची दूर होऊन 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र  पाणीटंचाई मुक्त करण्याच्या मोहिमेची सफलता होईल असा विश्वास वाटतो.
00000000
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                   रायगड-अलिबाग


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक