Posts

Showing posts from August 12, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26.64 मि.मि.पावसाची नोंद

    अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.64 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2546. 42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 26.00 मि.मि., पेण-15.00 मि.मि., मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-14.60 मि.मि., उरण-15.00 मि.मि., कर्जत-57.70 मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-29.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-24.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-50.00 मि.मि., पोलादपूर-23.00 म्हसळा-30.00 मि.मि., श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-41.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 426.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 26.64 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   81.03   टक्के इतकी आहे. 0000

आंतर राष्ट्रीय युवा दिन व सप्ताह निमित्त एच.आय.व्ही.एड्स मार्गदर्शन शिबीर

Image
             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग यांच्यामार्फत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय वेश्वी अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन व सप्ताह निमित्त   एच आय व्ही एड्स   विषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.              यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी   एच आय व्ही एड्स   बाधित व्यक्तींशी भेदभाव करणार नाही याबाबत शपथ देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या संजीवनी राजेंद्र नाईक या होत्या.    जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक   जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, संजय माने   यांनी विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रोग्रॅम ऑफिसर रविंद्र यशवंत पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी   प्रोग्रॅम ऑफिसर श्वेता गुरव   पी एन पी   कॉलेज वेश्वी, जिल्हा   आयसीटीसी पर्यवेक्षक             श्री.नवनाथ लबडे, एसटीआय समुपदेशक सुरेश

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे सोमवार,दि. 20 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.20 रोजी दुपारी एक वा.महाड एमआयडीसी येथे आगमन.   चार वाजता महाड एमआयडीसी येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17.54 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2519.78 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 4.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-23.00 मि.मि., पनवेल-3.20 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-16.00 मि.मि., खालापूर-12.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-18.00 मि.मि., सुधागड-10.00 मि.मि., तळा-47.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-19.00, म्हसळा-37.40मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-15.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 280.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 17.54 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   80.18 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 28.04 मि.मि.पावसाची नोंद

    अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2502.24 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 9.00 मि.मि., पेण-18.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-17.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-45.20 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-26.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-29.00 मि.मि., महाड-47.00 मि.मि., पोलादपूर-35.00 म्हसळा-24.80 मि.मि., श्रीवर्धन-8.00 मि.मि., माथेरान-86.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 448.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 28.04 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   79.62   टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 20.83 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20.83 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2474.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्तीनिवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-14.20 मि.मि., मुरुड-3.00 मि.मि., पनवेल-26.00 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-43.60 मि.मि., खालापूर-22.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-8.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-21.20मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-63.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 333.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 20.83 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   78.73 टक्के इतकी आहे. 0000

मासळी सुरक्षा व पणनकरिता सफेद बर्फाचा वापर करावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16 -   बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये व अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा मानके कायद्यात नमूद केलेला व खाद्योपयोगी वापरण्यात येणार रंग Indigo Carmine   किंवा Brilliant FCF रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा किमान 10 पीपीएम खाद्यरंग टाकावा.   तसेच खाद्य विक्री व खाद्यपदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा वितरण, वाहतूक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2011 तील तरतुदीनुसार कारवाई होईल व अखाद्य बर्फाच्या उत्पादकांनी त्यामध्ये खाद्यरंगाचा वापर केला नाही तर सदरचा बर्फ खाद्यबर्फ समजून त्याला अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कार्यकक्षेत समजला जाईल.   मच्छिमार सहकारी संस्था व बर्फ पुरवठा धारकांनी फक्त सफेद बर्फाचा वापर करावा. माशांच्या साठवणीसाठी निळ्या बर्फाचा वापर केला तर त्याच्या विरुध्द करण्यात येईल असे पु.वि.भालेकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

एकात्मिक विकास व व्यवस्थापन योजना मच्छिमारांना लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.16 -   भुजलाशयीन, सागरी,निमखारेपाणी क्षेत्रातील उपलब्ध साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करुन शाश्वत पध्दतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणीय समतोल राखून मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी निलक्रांती धोरणाअंतर्गत मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन या योजनेस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.    या योजनेंतर्गत मच्छिमारांना सर्वसाधारण गटात 40 टक्के अनुदान व अनुसूचित जाती, जमाती, महिला व महिलांच्या संस्था यांना 60 टक्के अनुदानाच्या विविध योजनांचा लाभ आहे.   निलक्रांती धोरणाअंतर्गत पूर्वी कार्यरत नऊ योजना सुधारित बदलासह व नविन अशा 21 योजनांची अंमलबजावणी करावयाची आहे.   यामध्ये इन्सुलेटेड ट्रक,ऑटो रिक्षासह शितपेटी, मोटार सायकलसह शितपेटी, फिरते मत्स्यविक्री केंद्र, किरकोळ मासळी विक्री केंद्र, मासळी वाहतुकीसाठी वाहन, बर्फ कारखाना, नविन तळी बांधकाम, पारंपारिक मच्छिमारांना लाकडी ऐवजी फायबर नौका खरेदीस अर्थसहाय्य इत्यादी योजनांचा समावेश आहे.   या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मच्छिमारांनी (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, महिलांच्या सहकारी संस्था व गट) य

‘माहितीदूत’ उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ युवकांनी माहितीदूत उपक्रमात सहभागी व्हावे- ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘युवा माहिती दूत’ या अभिनव उपक्रमाचा रायगड जिल्ह्यात   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा   जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील महाविद्यालयातील युवक युवतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी ना. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.   यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या सह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आद

अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे लोकार्पण टेलिमेडीसीन द्वारे जिल्ह्यातील आरोग्यसेवांचे बळकटीकरण करणार- ना. रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -    रायगड जिल्हा हा सागरी,डोंगरी आणि नागरी अशा तिनही वैशिष्ट्यांनी नटलेला व मोठा भूभाग असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणे ही दुर्गम आहेत. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा टेलिमेडीसिन व्यवस्थेशी जोडून बळकट करण्यात येईल व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन येथील रुग्णांना उपलब्ध करुन देऊ, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण   यांनी आज येथे केले.   ना. चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) लोकार्पण करण्यात आले. यावेळी   जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. पंडीतशेट पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. देवकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना ना. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात आ

स्वातंत्र्यदिन समारंभ आपत्तींच्या मुकाबल्यासाठी सुसज्ज व्यवस्था निर्मिती करणार-पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.15 -   जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव कार्यासाठी सुसज्ज व्यवस्थानिर्मितचे शासनाचे   प्रयत्न असून लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर जिल्ह्यात सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण होईल , अशी घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण   यांनी आज येथे केली. ना. चव्हाण   यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव साधनांच्या उपलब्धतेसाठी तातडीने 30 लाख रुपये देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित या शानदार समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवडणूक उपजिल्हा

अतिवृष्टीचा इशारा

                                                                                                                                              अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.14 - येत्या 72 तासात कोकण विभागात तुरळक ठिकाणि जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.   यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, कोकणात येत्या 72 तासात तुरळक ठिकाणी जोरदार तर दि.17 व 18 रोजी जोरदार ते अतिजोरदार   पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच पुढील पाच दिवस समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याने मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करीता जाऊ नये, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. पिक परिस्थिती व कीड, रोज   आणि कृषि विषयक सल्ला (प्रादेशिक कृषी हवामान केंद्र मुळ्दे जि. सिंधुदुर्ग व दापोली जि. रत्नागिरी यांचेकडून प्राप्त)-   नागली पिकाच्या लागवडीच्या वेळेनुसार पिक एक महिन्याचे झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 40किलो ( युरिया 87 किलो/हेक्टर) या प्रमाणात देण्यात यावा. भात पिकाचे कीड, रोग इ. साठी सतत निरीक्षण करावे. शेतातील पाण्याची पात