अतिवृष्टीचा इशारा



                                                                                                                                      
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.14- येत्या 72 तासात कोकण विभागात तुरळक ठिकाणि जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
 यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, कोकणात येत्या 72 तासात तुरळक ठिकाणी जोरदार तर दि.17 व 18 रोजी जोरदार ते अतिजोरदार  पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच पुढील पाच दिवस समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याने मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करीता जाऊ नये, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.
पिक परिस्थिती व कीड, रोज  आणि कृषि विषयक सल्ला (प्रादेशिक कृषी हवामान केंद्र मुळ्दे जि. सिंधुदुर्ग व दापोली जि. रत्नागिरी यांचेकडून प्राप्त)-
 नागली पिकाच्या लागवडीच्या वेळेनुसार पिक एक महिन्याचे झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 40किलो ( युरिया 87 किलो/हेक्टर) या प्रमाणात देण्यात यावा. भात पिकाचे कीड, रोग इ. साठी सतत निरीक्षण करावे. शेतातील पाण्याची पातळी 5 सेमी पर्यंत ठेवावी. भात पिकावर सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतात पाणी बांधुन पिकावरुन एक जड दोर आडवा ओढत न्यावा. नंतर एक दोन तासानी शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. जेणेकरुन सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील. त्यानंतर त्या नष्ट कराव्या. भुईमुगाच्या लागवडीमध्ये  पान्याचा योग्य निचरा करावा व पिकाची बेणणी करुन घ्यावी. वेलवर्गीय भाज्यांमध्ये वेल  तयार झालेला आहे , त्यांना काठीचा आधार द्यावा व मातीची भर द्यावी. वेल वर्गीय भाजीपाला पिकांमध्ये भूरी किंवा केवडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त पाने काढुन नष्ट करावीत.  ड्याथेन एम 45 किंवा डायथेन झेड 78 यापैकी एका बुरशीनाशकाची 25 ग्रॅम/10 लि. पाणी या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. भेंडी, मिरची, वांगी इ. भाज्यांना खताचा दुसरा हप्ता द्यावा. भेंडीसाठी प्रती गुंठा क्षेत्रास 720 ग्रॅम  युरिया वांगीसाठी 1080 ग्रॅम युरिया व मिरचीसाठी 810 ग्रॅम युरिया या प्रमाणात खताचा दुसरा हप्ता द्यावा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक