Posts

Showing posts from October 10, 2021

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून घेतलेल्या कोविड-19 विशेष लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद एकूण 307 लसीकरण केंद्रावर 12 हजार 599 महिलांनी घेतला विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ

    अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-   नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिलांसाठी आज सोमवार, दि.11 ऑक्टोबर 2021 रोजी राबविण्यात आलेल्या  “ महिला विशेष कोविड लसीकरण ”  मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एकूण 307 लसीकरण केंद्रावर 12 हजार 599 महिलांनी या विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. “ मिशन कवच कुंडल ”  अंतर्गत या  “ महिला विशेष कोविड लसीकरण ”  उपक्रमास संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उलवे, नारपोली प्राथमिक आरोग्य केंद्र, आजिवली   पनवेल महानगरपालिका क्षेत्र, माणगाव तालुक्यातील   माणगाव नगरपंचायत क्षेत्र, कर्जत,   रोहा तालुक्यातील आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरुड तालुक्यातील मुरुड ग्रामीण रुग्णालय, अलिबाग तालुक्यातील चेंढरे, उरण तालुक्यातील मौजे वेश्वी, दादरपाडा, श्रीवर्धन नगरपरिषद क्षेत्र, म्हसळा नगरपंचायत क्षेत्र, खोपोली नगरपरिषद क्षेत्र, पेण नगरपरिषद क्षेत्र यासह जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राचाह

केंद्र शासनाच्या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी व्यक्ती/ संस्थांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-   केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार: वैयक्तिक पुरस्कार- मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.  संस्था स्तरावर: बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बाल शक्ती पुरस्कार सन 2022 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेत

दि.11 ते दि.16 ऑक्टोबर या कालावधीत रायगड डाक विभागाकडून डाक सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):-   भारतीय डाक विभाग दरवर्षी आपला टपाल सप्ताह ऑक्टोबरमध्ये साजरा करतो. यावर्षीदेखील हा सप्ताह दि .11 ते दि. 16 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी ग्राहकांसाठी विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. दि .11 ऑक्टोबर बचत बँक दिवस (बँकिग डे ) व दि.12 ऑक्टोबर डाक जीवन विमा दिवस      (पीएलआय डे) या दोन्ही दिवशी सरकारी आस्थापनेत व ग्रामीण भागात डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांचे तसेच इतर सरकारी आस्थापनेत मेळावे घेऊन बचत व इन्शुरन्स याबाबतचे त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. दि.13 ऑक्टोबर तिकीट संग्रह दिवस (फिलेटेली डे) या दिवशी अलिबाग मुख्य डाक कार्यालय येथे विविध टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे . हे प्रदर्शन जनतेसाठी या दिवशी खुले असेल. दि.14 ऑक्टोबर व्यवसाय विकास दिवस( बीझनेस डे) या दिवशी डाक विभागाशी बिझनेससाठी संबधित असणाऱ्या कार्यालयाबरोबर संपर्क साधून त्यांना डाक विभागाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. दि.16 ऑक्टोबर टपाल दिवस ( मेल डे ) या दिवशी शाळेतील मुलांना डाक विभागाचे कामकाज दाखवून त्या संब

दूर्गम भागातील असंघटित कामगारांसाठी “ई-श्रम कार्ड” नोंदणी विशेष मोहीम राबवावी --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर “ई-श्रम कार्ड” नोंदणीसाठी असंघटित कामगारांनी, सर्व शासकीय व अशासकीय, खाजगी संस्था तसेच असंघटित क्षेत्रातील कार्यरत संघटनांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

      अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- जिल्हयातील असंघटित कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलद्वारे नागरी सुविधा केंद्रामार्फत सुरु करण्यात आली असून दूर्गम भागातील असंघटित कामगारांसाठी “ ई-श्रम कार्ड ” नोंदणी विशेष मोहीम राबवावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. ई-श्रम पोर्टलद्वारे नागरी सुविधा केंद्रामार्फत जिल्हयातील असंघटित कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे (दि.11ऑक्टोबर) रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते सुरु करण्यात आला. यावेळी नोंदीत 11 असंघटित कामगारांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते “ ई-श्रम कार्ड ” चे ही वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, सहायक कामगार आयुक्त श्रीमती शितल कुलकर्णी, श्री.समीर चव्हाण, नागरी सुविधा केंद्राचे व्यवस्थापक श्री.राजेश पाटील, श्री.विनित पाटील तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर चालक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, ई-श्रम

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.11(जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील जुने वृत्तपत्र रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.20 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. ०००००००