Posts

Showing posts from February 11, 2018

वित्त आणि नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका) दि.17- राज्याचे वित्त आणि नियोजन,वने मंत्री, ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री हे रविवार दिनांक 18 रोजी जिल्हा दौऱ्यावर  येत असून त्यांचा  दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता नवी मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी तीन वाजता  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन समारंभास उपस्थिती स्थळ:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई. कार्यक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता मुंबईकडे प्रयाण. 0000

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17- महाराष्ट्र राज्याचे राज्यापाल सी. विद्यासागर राव हे  रविवार दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- रविवार दि. 18 रोजी दुपारी साडेतीन वा. मा.पंतप्रधान यांच्या समवेत नवी मुंबई हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन,  जे.एन.पी.टी.  नवी मुंबई कडे प्रयाण. व मोटारीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भुमिपूजन सोहळा कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण, दुपारी 3 वा. 40 मि. ते दुपारी 4 वा. 40 मि. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिपूजन सोहळा व जे.एन.पी.टी. च्या चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या लोकापर्ण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.40 वा. कार्यक्रम स्थाळावरुन नवी मुंबई हेलिपॅडकडे प्रयाण व 4 वा. 55 मि. नी हेलिकॉप्टरने छत्रपती शिवाजी महाराज,मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण. 00000

अवजड वाहतुकदारांनी नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांची अवजड वाहने ग्रामीण भागातून ये जा करीत असतात अशा वाहतुकदारांनी रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.             जिल्ह्यातील विविध अवजड वाहतूक करणारी वाहने  परिसरातील गावांमधून वाहतुक करतांना त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. यासंदर्भातील तक्रारींबाबत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. याबैठकीस आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील उपस्थित होते. तसेच खारभुमी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.स्वामी, एस.ए. गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, वाहतुक पोलीस निरीक्षक एम.आर. म्हात्रे, पेण उपविभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, जेएसडब्ल्यू चे एम.बी. प्रसाद, मुकुंद नवंगाळ, एस.डी. निंबाळकर आदी उपस्थित होते.             यावेळी आ. पंडीतशेट पाटील यांनी वाहतुकदारांमुळे  ग्रामीण भागात आणि अन्य रस्ते वाहतुकीला निर्माण होत असलेल्या अडथळे व अपघातांच्या धोक्याबाबत माहिती दिली. यावे

ऑनलाईन शाळा प्रवेशाची प्रक्रिया

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.16- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील नियमान्वये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना सर्व खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित 244 पात्र शाळांमध्ये  पूर्व प्राथमिक 3628 असे एकूण 4065 जागा आर.टी.ई 25 टक्के   ऑनलाईन प्रवेश प्रवेशाकरीता राखीव आहेत. अंतिम दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहील. ऑनलाईन अर्ज भरतांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:- जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य) (भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक)(सर्व घटकांना अनिवार्य) सामाजिक वंचित घटक (पालकांचा, बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र  ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु.एक लाखापेक्षा कमी उत्पन्न) आर.टी.ई. 25 टक्के

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:-   संत सेवालाल महाराज यांच्या 279 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात तहसिलदार (सर्व सामान्य) के.डी.नाडेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.              यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 000

माथाडी कायद्याचा गैरवापर रोखण्याठी जिल्हास्तरीय कृती समितीची स्थापना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:-  राज्यातील अंगमेहनतीचे काम करणाऱ्या असंरक्षित माथाडी कामगारांच्या कल्याणास्तव अंमलात आणलेल्या महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 च्या तरतूदींचा काही तथाकथीत संघटना, व्यक्ती व हित संबंधीतांकडून होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी व माथाडी कायद्याची सध्या होत असलेली अंमलबजावणी पारदर्शक व सुरळीतपणे होऊन मालक वर्ग व उद्योग जगतात या कायद्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी 6 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर कृती आराखडया अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी देखील जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर माथाडी कायद्यांतर्गत असलेल्या तरतूदींचा कोठे दुरुपयोग होत असल्यास त्याबाबत कोणतीही व्यक्ती, मालक आस्थापना किंवा संघटना सदर कृती समितीकडे रितसर तक्रार दाखल करु शकतात. सदर तक्रारीकरीता खालील प्रमाणे संपर्क पत्ता व दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहे

पालकमंत्र्यांची आढावा बैठक: 'मिशन-मोड' मध्ये काम करा- ना.रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनेक विकासाच्या योजना आणि प्रकल्प शासनाने कार्यान्वित केले आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वाला आणण्यासाठी शासकीय यंत्रणेने 'मिशन-मोड' मध्ये काम करावे आणि कामांचे चांगले परिणाम दाखवावे, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.   रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ना. चव्हाण यांचा आजचा पहिला दौर. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा ना. चव्हाण यांनी घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,   आ. प्रशांत ठाकूर, महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर,   उपवनसंरक्षक मनिषकुमार, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषदे

किल्ले रायगड आणि चवदार तळ्याला भेट देऊन पालकमंत्र्यांनी केला पहिल्या दौऱ्याचा प्रारंभ

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले रायगड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चवदार तळे, महाड  येथे भेट देऊन नवनियुक्त पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पहिल्या जिल्हा दौऱ्यास प्रारंभ केला. रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाड येथील चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांचे समवेत आ.प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रांताधिकारी विठ्ठल   इनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, नायब तहसिलदार प्रदीप कुडाळ यांसह राजेय भोसले, जयवंत दळवी आदी प्रमुख कार्यकर्ते- पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाड नगरपालिकेच्या वतीने ना. चव्हाण   यांचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्तम प्रतिसाद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे शनिवार दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्ह्यात शनिवार दि.10 रोजी सर्व न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने 33 कक्षांचे आयोजन करण्यात आले होते.  अलिबाग येथील लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर,  दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण   एल.डी.हुली,  अलिबाग नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश चौधरी, इतर न्यायिक अधिकारी, वकील आदी यावेळी उपस्थित होते. लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये 4143 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 836 प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामध्ये 7 कोटी 15 लाख 41 हजार 495 इतकी रक्कम भरण्याचे मान्य करण्यात आले. तसेच वादपूर्व प्रकरणे 20920 तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी 5604 प्रकरणे निकाली निघाली व त्यामध्ये रक्कम रुपये 7 कोटी 28 ला

ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.रविंद्र चव्हाण हे बुधवार दि. 14 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- बुधवार दि. 14 रोजी सकाळी सहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. सकाळी साडे सहा वा. पाचाड किल्ले रायगड येथे आगमन. सकाळी सात वा. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन. सकाळी आठ वा. पाचाड किल्ले रायगड येथून अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11 वा.  शासकीय वाहनाने अलिबाग येथे आगमन व रायगड जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामां संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ :- राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी एक वा. पत्रकारांशी वार्तालाप. दुपारी दीड ते अडीच राखीव. दुपारी तीन वा. अलिबाग येथून रेवदंडाकडे प्रयाण. दुपारी चार वा. रेवदंडा येथे आगमन व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी साडे चार वा. रेवदंडा येथून  शासकीय वाहनाने डोंबिवलीकडे