माथाडी कायद्याचा गैरवापर रोखण्याठी जिल्हास्तरीय कृती समितीची स्थापना



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:-  राज्यातील अंगमेहनतीचे काम करणाऱ्या असंरक्षित माथाडी कामगारांच्या कल्याणास्तव अंमलात आणलेल्या महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 च्या तरतूदींचा काही तथाकथीत संघटना, व्यक्ती व हित संबंधीतांकडून होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी व माथाडी कायद्याची सध्या होत असलेली अंमलबजावणी पारदर्शक व सुरळीतपणे होऊन मालक वर्ग व उद्योग जगतात या कायद्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी 6 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर कृती आराखडया अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी देखील जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
सदर माथाडी कायद्यांतर्गत असलेल्या तरतूदींचा कोठे दुरुपयोग होत असल्यास त्याबाबत कोणतीही व्यक्ती, मालक आस्थापना किंवा संघटना सदर कृती समितीकडे रितसर तक्रार दाखल करु शकतात. सदर तक्रारीकरीता खालील प्रमाणे संपर्क पत्ता व दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, अलिबाग, जि.रायगड संपर्क क्रमांक :- 02141-222227. कामगार उप आयुक्त कार्यालय, जि.रायगड, विघ्नहर्ता कॉम्पलेक्स, सेक्टर क्र.1, खांदाकॉलनी, नवीन पनवेल, रायगड संपर्क क्रमांक 022-27452835 अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष तथा सदस्य सचिव कृती समिती रायगड यांनी दिली आहे.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक