Posts

Showing posts from August 27, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका) दि.03-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.58 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3030.34   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 52.00 मि.मि., पेण-12.20 मि.मि., मुरुड-38.00 मि.मि., पनवेल-16.40 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-6.40 मि.मि., खालापूर-4.00 मि.मि., माणगांव-09.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-07.00 मि.मि., पोलादपूर-7.00, म्हसळा-28.20मि.मि., श्रीवर्धन-38.00 मि.मि., माथेरान-30.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 297.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 18.58 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   97.90 % इतकी आहे. 000000

संवादपर्व:अलिबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळात शासकीय योजनांचा लाभ घ्या -पथनाट्याच्या माध्यमातून गणेशभक्तांना आवाहन-

Image
            अलिबाग दि.2, (जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत अलिबागचा राजा या अलिबागमधील सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशमंडळात संवादपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  पथनाट्यातून शासकीय योजनांबद्दल जनजागृती करण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित गणेशभक्तांना करण्यात आले. शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन  अलिबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अलिबाग येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली. यावेळी अलिबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश कोटीयन, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, मंडळाचे सदस्य,  प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी, प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे, अफ

संवादपर्व:आदर्श मित्र मंडळ येथे: पथनाट्यातून उलगडली 'वाटचाल रायगडची'

Image
            अलिबाग दि.2, (जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात  घरत आळीतील आदर्श सार्वजनिक गणेशमंडळात 'वाटचाल रायगडची' या पथनाट्यातून जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल उलगडण्यात आली. शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन  आदर्श मित्र मंडळ, घरत आळी, अलिबाग येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.                        यावेळी आदर्श मित्र  मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, सुधीर अग्रावकर, प्रसाद पाटील, प्रविण नाईक, प्रशांत नाईक, राजेश म्हात्रे, पत्रकार प्रफुल्ल पवार,  प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी, प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे, अफान गझाली, सुचित जावरे आदि उपस्थित होते.           

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका) दि.02-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.85 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3011.77   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 6.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-11.40 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-0.80 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-9.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-08.00 मि.मि., पोलादपूर-15.00, म्हसळा-31.40मि.मि., श्रीवर्धन-34.00 मि.मि., माथेरान-07.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 189.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.85 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   97.24 % इतकी आहे. 000000

संवादपर्व : पथनाट्यातून शासनाच्या योजनांची जनजागृती

Image
            अलिबाग दि.1, (जिमाका), माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात आज पथनाट्यातून शासकीय योजनांबद्दल जनजागृती करण्यात आली. शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन आज सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अलिबाग येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.             यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव   मंडळाचे अध्यक्ष एस.एम.कांबळे, सचिव डि.बी.चेतकर, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, सार्वजनिक बांधकाम विभागचे विनोद म्हात्रे, अशोक पाटील, नारायण सोलंकी, विकास पवार, राजेंद्र बांदिवडेकर, किशोर वाघमारे, मनोहर सानकर, जिवितो भोसाणे, मधुकर गायकर, सविता वाडकर, रेश्मा पाटील, रावजी हरिजण, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस

अल्पसंख्याक बहुल शाळांच्या पायाभूत विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

  अलिबाग   दि.1   (जिमाका)- अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संख्या व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव पाठवावे. परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडे 18   सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,दि.1(जिमाका):- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे रविवार दि.3 रोजी   रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.   रविवार दि.3 रोजी   सकाळी साडेदहा वाजता रोहा येथे आगमन. दुपारी दोन वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर तात्पुरती कुर्बानी केंद्र चेकनाक्यांवर सक्षम अधिकारी नियुक्त

अलिबाग,(जिमाका)दि.1- रायगड जिल्ह्यात शनिवार दिनांक 2 ते 4 सप्टेंबर या दरम्यान   बकरी ईद साजरी होत आहे.   या कालावधीमध्ये जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात एकही   नोंदणीकृत कत्तलखाना   नाही. ग्रामीण व शहरी भागांतून तात्पुरत्या कुर्बानी केंद्रास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांना असल्याने त्यांच्या मंजूरीने जिल्ह्यात धामद,ममदापूर,साळोख ता.कर्जत व तळोजा ता.पनवेल तसेच शिळफाटा खोपोली ता.खालापूर येथे तात्पुरत्या कुर्बानी   केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.  यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व चेकनाक्यांवर पोलीस यंत्रणेने   चोख बंदोबस्त ठेवला आहे.  शांतता राखण्याचे आवाहनही पोलीसांमार्फत करण्यात आले आहे.   तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी पोलीस यंत्रणेने निश्चित केलेल्या चेकनाक्यावर सक्षम अधिकार असलेले पशुधन विकास अधिकारी यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुभ

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.1-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.93 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2999.92   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 19.00 मि.मि., पेण-25.00 मि.मि., मुरुड-01.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-01.00 मि.मि., कर्जत-0.60 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-01.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-02.00 मि.मि., महाड-04.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-14.20मि.मि., श्रीवर्धन-07.00 मि.मि., माथेरान-01.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 78.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 4.93 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   96.86 % इतकी आहे. 000000

पनवेल महापालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करीता पथक

अलिबाग दि.30 (जिमाका)- जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीमधील सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीकरीता तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल भारत शितोळे हे आहेत.  तर पनवेल महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भगवान गोविंद खाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल झोन-2 प्रकाश हिलेवाड  हे सदस्य आहेत. त्यांचे संपर्क याप्रमाणे-   अध्यक्ष- 022-27452328, मोबाईल 9820287655 ई- मेल-sdo_panvel@yahoo.com, सदस्य श्री. खाडे 022-27458041, मोबाईल- 9595550009 ई-मेल- panvelnaarparishad@gmail.com , सदस्य श्री. हिलेवाड 022-27452532, मोबाईल-9167903131  ई मेल- scppanvelnm@gmail.com तरी नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, रायगड यांनी केले आहे. 000000

भातपिकासाठी किड नियंत्रण सल्ला

            अलिबाग दि.30 (जिमाका)-  भात पिकावरील कीड सर्वेक्षणानंतर  कृषि विभागाच्या वतीने भात पिकासाठी खालीलप्रमाणे किड नियंत्रण सल्ला देण्यात आला आहे. पिवळ्या खोडकिड्यासाठीः- लावणी नंतर शेतात 5 टक्के कीडग्रस्त फुटवे आढळल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळल्यास, खालीलप्रमाणे उपाययोजना करावी. वेळोवेळी कीडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत. उपाय योजना :- शेतात कडूलिंबयुक्त कीटकनाशके वापरावीत. २५ टक्के प्रवाही क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून  फवारावे किंवा फिप्रोनील 0.3 जी 10 किलो प्रति एकर प्रमाणे शेतात फोकून टाकावे.                       निळे भुंगेरे किडीसाठी -  ही किड पानाच्या वरच्या भागातील हरितद्रव्य खातात, पानावर पांढऱ्या समांतर रेषा उमटतात व त्याचे पांढरे चट्टे तयार होतात कालांतराने हे चट्टे तपकिरी होतात व पाने करपलेली दिसतात. नत्र खताचा अवाजवी वापराने प्रादुर्भाव वाढतो, 1 ते 2 प्रती चुड प्रादुर्भाव आढळल्यास  खालीलप्रमाणे उपाययोजना करावी. उपायय

संकल्पकृत होऊ या, 'अवयवदानासाठी'

मानवी आरोग्याच्या विविध  प्रश्नांबाबत वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केली आहे. अवयवप्रत्यारोपण हा त्या प्रगतीचाच एक टप्पा. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानांतर्गत किडनी, लिवरचे प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात  किडनी, लिवर, फुफ्फुस, हृदय, त्वचा यासारख्या अवयवांचे दान करता येते.  आपल्या अवयवदानाने एखाद्याला जीवनदान मिळू शकते. महाराष्ट्र राज्यात सध्या 4000 रुग्ण किडनी, 500 रुग्ण लिवर तसेच 10 रुग्ण तातडीने हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन समाजात जनजागृती होण्यासाठी 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत महाअवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान या प्रक्रियेविषयी सुज्ञ जनांनी माहिती घेऊन स्वतः अवयवदानासाठी संकल्पकृत व्हावे, हा या अभियानाचा हेतू. त्यानिमित्त अवयवदान या संकल्पनेविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे देत आहोत. अवयवदानाची गरज व महत्व जाणून याबाबत जनजागृती होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजागृती अभियान राबवण्याचे सुचित केले. त्यानुसार र

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 110 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.30:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 110.38 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2979.98  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 122.00 मि.मि., पेण-200.40 मि.मि., मुरुड-95.00 मि.मि., पनवेल-95.40 मि.मि., उरण-92.00 मि.मि., कर्जत-110.60 मि.मि., खालापूर-112.00 मि.मि., माणगांव-69.00 मि.मि., रोहा-98.00 मि.मि., सुधागड-130.00 मि.मि., तळा-99.00 मि.मि., महाड-91.00 मि.मि., पोलादपूर-101.00, म्हसळा-105.20मि.मि., श्रीवर्धन-60.00 मि.मि., माथेरान-185.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1766.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 110.38 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   96.21 % इतकी आहे. 00000

संवादपर्व हा उपक्रम जनसामान्यांच्या हिताचा- तहसिलदार अजय पाटणे

Image
            अलिबाग दि.29, (जिमाका), माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेला संवादपर्व हा उपक्रम जनहिताचा आहे, असे प्रतिपादन पेण येथील तहसिलदार अजय पाटणे यांनी आज पेण येथे बोलताना केले.             माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित संवादपर्व या उपक्रमाचे आयोजन आज पेण येथील पेण नगरपरिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे  करण्यात आले होते. या कार्यक्रमात पेणचे तहसिलदार अजय पाटणे, पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रविण कदम आदि मान्यवर उपस्थित होते.             यावेळी बोलताना श्री.पाटणे म्हणाले की, शासन जनतेच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. तसेच सार्वजनिक हितासाठी व जिल्ह्याच्या‍ विकासासाठी विविध विकास कामे ही करीत असते. शासन तळागाळातील व्यक्तींच्या विकासासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवित असलेल्या विविध योजना संवादपर्व सारख्या उपक्रमातून त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात येतात. त्यामुळे हा उपक

पुढील 4 तासात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग दि.29 (जिमाका)-   प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून पुढील 4 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) ते त्यापेक्षा अधिक (12 से.मी. ते 24 से.मी.)   होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे दरडग्रस्त, नदी किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. पुरस्थिती उद्भवल्यास त्यास समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322 या क्रमांकावर द्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 135 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.29:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 135.42 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2869.60  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 155.00 मि.मि., पेण-260.00 मि.मि., मुरुड-127.00 मि.मि., पनवेल-124.00 मि.मि., उरण-171.00 मि.मि., कर्जत-75.80 मि.मि., खालापूर-78.00 मि.मि., माणगांव-107.00 मि.मि., रोहा-142.00 मि.मि., सुधागड-84.00 मि.मि., तळा-155.00 मि.मि., महाड-113.50 मि.मि., पोलादपूर-123.00, म्हसळा-213.40मि.मि., श्रीवर्धन-100.00 मि.मि., माथेरान-138.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2166.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 135.42 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   92.60 % इतकी आहे. 00000

महा अवयवदान दिवस: अवयवदानाचा संकल्प करा- डॉ. अजित गवळी

Image
अलिबाग दि.29- आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. मरणोत्तर आपल्या अवयवदानाने  कुणाचे तरी प्राण वाचणार आहेत ही भावना जनतेमध्ये रुजून अवयवदानाला चालना मिळावी याकरीता महा अवयवदान महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवात अवयवदानाचा संकल्प 'संकल्प पत्र' भरुन प्रत्येकाने करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आज केले.  महा अवयवदान महोत्सवाच्या निमित्ताने  जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे  आज सर्व कर्मचाऱ्यांनी व उपस्थित नागरिकांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.सुहास कोरे, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुचिता गवळी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती जयश्री मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, समन्वयक सुनिल चव्हाण, अर्थ संकल्पीय व वित्त अधिकारी प्रथमेश मोकल, नेत्रदान समुपदेशक श्रीमती स्नेहल सपकाळे आदि उपस्थित होते.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळ

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,(जिमाका)दि.28-     नेहरु युवा केंद्र, अलिबाग- रायगड (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय,भारत सरकार) यांच्यावतीने दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळांना ‘उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत व नेहरु युवा केंद्रासोबत संलग्न युवा मंडळांनी दि.1 एप्रिल 2016 ते मार्च 2017या कालावधीत केलेल्या सामाजिक,साक्षरता, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरण, व्यावसायिक प्रशिक्षण, हुंडा निर्मुलन,वनीकरण,आरोग्य्‍ आणि कुटूंब कल्याण इत्यादी सोबत जी युवा मंडळे स्थानिक आणि राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यावर कार्यक्रम घेत आहेत. तसेच वेगवेगळ्यास्तरांवर विविध विभाग आणि संस्थांशी समन्वय साधून समाजातील विकास, क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम आणि इतर विकासात्मक कार्यक्रमांत पुढाकार घेत आहेत. अशा कामाची माहिती विहीत नमुन्यात अर्जाच्या दोन प्रतीत   मागविण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये संबंधित कार्यक्रमाचे फोटो,वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे तसेच   लेखा परिक्षण होणे आवश्यक आहे. प्रस्ताव  दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत पाठवावे