संवादपर्व:अलिबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळात शासकीय योजनांचा लाभ घ्या -पथनाट्याच्या माध्यमातून गणेशभक्तांना आवाहन-


            अलिबाग दि.2, (जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत अलिबागचा राजा या अलिबागमधील सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशमंडळात संवादपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  पथनाट्यातून शासकीय योजनांबद्दल जनजागृती करण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित गणेशभक्तांना करण्यात आले.
शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन  अलिबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अलिबाग येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.
यावेळी अलिबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश कोटीयन, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, मंडळाचे सदस्य,  प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी, प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे, अफान गझाली, सुचित जावरे आदि उपस्थित होते.
प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी वाटचाल रायगडची पथनाट्यातून किल्ले रायगड विकास, कामांचे स्वरुप, जलयुक्त शिवार, शेततळे, 4 कोटी वृक्ष लागवड, क्रीडा संकुल, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांची आणि त्याद्वारे जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विठ्ठल बेंदुगडे, जयंत ठाकूर, अशोक मोरे, सचिन काळुखे यांनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक