Posts

Showing posts from September 4, 2022

मतदाराचा आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलाशी ऐच्छिक जोडणी कार्यक्रम जाहीर दि.11 सप्टेंबर ला पहिले विशेष शिबिर

    अलिबाग,दि.10 (जिमाका):- निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली असून दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे.               त्यानुषंगाने मतदार यादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 B नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे.               दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेल्या मा. भारत निवडणूक आयोगाच्या उपक्रमास सर्व स्तरातून सहकार्य मिळावे व सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्र

जिल्हा व सत्र न्यायालयातील ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल कराराकरिता इच्छुकांनी निविदा सादर कराव्यात

                  अलिबाग,दि.10 (जिमाका):- उच्च न्यायालय, मुंबई यांच्यामार्फत रायगड-अलिबाग मुख्यालय, पनवेल, माणगाव, कर्जत, खालापूर, मुरूड, पाली, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण येथे सन 2016 मध्ये एच.पी. ऑल-इन-वन संगणक पुरविण्यात आलेले आहेत. एकूण 172 ऑल-इन-वन संगणकांची एकूण मूळ किंमत 68 लाख 39 हजार 107 रुपये आहे.               या ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करार (Comprehensive Annual Maintenance Contract) करण्याकरिता विहित नमुन्यातील मोहरबंद निविदा / दरपत्रक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड-अलिबाग या नावाने सीलबंद लखोट्यामध्ये दि.16 सप्टेंबर 2022 पूर्वी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करावीत अथवा व्यक्तिश: आणून द्यावीत. त्यानंतर प्राप्त निविदांचा /दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. याशिवाय कोणतेही कारण न सांगता प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा / दरपत्रके स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे रायगड-अलिबाग जिल्हा न्य

जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत “कुष्ठरोग शोध मोहीम” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम”

    अलिबाग,दि.08(जिमाका):-   महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत  “ कुष्ठरोग शोध मोहीम ”  व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत  “ सक्रिय क्षयरोग शोध मोहीम ”  राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण लोकसंख्या 21 लाख 48 हजार 773 चे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण 1 हजार 662 आरोग्य पथके व 332 पर्यवेक्षक नेमण्यात आली असून एकूण 4 लाख 81 हजार 752 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. आदिवासी भागातील पाडे, वस्त्या, डोंगराळ भाग, आदी भागात कुष्ठ व क्षयरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे सहाय्यक संचालक डॉ.आर.एच.बाविस्कर यांनी कळविले आहे. तरी दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार

“महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे होणार जनसुनावणी

    अलिबाग,दि.10 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता  “ महिला आयोग आपल्या दारी ”  या उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत.   तक्रारदार पिडीत महिलेस स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. ज्या महिलांचे प्रकरण न्यायालयात सुरु असेल अथवा न्यायप्रविष्ठ असेल, अशी प्रकरणे या जनसुनावणीत स्विकारली जाणार नाहीत. रायगड येथील पोलीस स्टेशन आवारातील महिला समुपदेशन, सहाय्य कक्ष, भरोसा सेल तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयातील रायगड जिल्ह्यांच्या तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्य

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेच्या लाभाकरिता पशुपालक/शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

    अलिबाग,दि.10 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रु. 30 हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत प्रति जिल्हा 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4.5 लक्ष याप्रमाणे एकूण 34 जिल्ह्यांकरिता रु. 153 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे.               या योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैराणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.   बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत, लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.                 तरी या योजनेच्या लाभाकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजी

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टॅंड अप इंडिया योजनेंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज योजना

                  अलिबाग,दि.10 (जिमाका):- केंद्र शासनाने “ स्टँडअप इंडिया ” ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील उद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2020-21 पासून योजना सुरु करण्यात आली आहे.               या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचीत जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.             या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.               तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छी भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त श्री.जाधव

आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

                अलिबाग,दि.10 (जिमाका):- “ किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ” ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.                 आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत.                रायगड जिल्ह्यात पणन हंगाम 2020-21 मध्ये 40 खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर 25 हजार 34 शेतकऱ्यांकडून 4 लाख 10 हजार 756 क्विंटल इतके धान खरेदी झाले होते. तर पणन हंगाम 2021-2022 मध्ये 38 धान खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली होती. पणन हंगाम 2021-2022 मध्ये 25 हजार 832 शेतकऱ्यांकडून 5 लाख 49 हजार 279.64 क्विंटल इतकी धान खरेदी झालेली आहे.               शासनाने पणन हंगाम 2020-2021 व पणन हंगाम 2021-2022 मध्ये खालीलप्रमाण

गाई/ म्हशीमध्ये होणाऱ्या "लम्पी स्कीन" रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी "लम्पी स्कीन"आजाराला घाला आळा... पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा..!

  अलिबाग,दि.10(जिमाका):- गाई/ म्हशीमध्ये होणाऱ्या "लम्पी स्कीन" या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.काळे यांनी केले आहे.       जळगाव,अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये "लम्पी स्कीन" या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे समजले आहे. या रोगाचा प्रादूर्भाव रायगड जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "लम्पी स्कीन" रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. 'लम्पी स्कीन' हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पशुपालकांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. या रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्राण्यातील खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे.        "लम्पी स्कीन" रोगाचा संसर्ग "कॅप्रिपॉक्स" (Capri pox) विषाणू मुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील

भात शेतीवर कीड रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

    अलिबाग,दि.10 (जिमाका) :- सद्य:स्थितीमध्ये जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादूर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी जागरुक राहून भात शेतीचे नियमित सर्वेक्षण करावे व प्रादूर्भाव आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे कीडनिहाय उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.             सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव आढळून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे व नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील नंतर शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे व सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या महाराणी एलिझाबेथ II, यांच्या निधनाबद्दल 11 सप्टेंबर रोजी एक दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Image
अलिबाग,दि.09 (जिमाका):-  युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय, यांचे दि.8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. या दिवंगत सम्राज्ञीच्या सन्मानार्थ, भारत सरकारने दि.11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी संपूर्ण भारतामध्ये ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविला जातो, त्या सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरच फडकविला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविला जातो तेथील आस्थापनांनी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 00000

जिल्ह्यात “माझी पॉलिसी माझ्या हातात” उपक्रमास सुरुवात

Image
  अलिबाग,दि.09 (जिमाका):-  केंद्र शासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Campagin India@७५ अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची पावती घरपोच देणारा  “ माझी  पॉलिसी माझ्या हातात ”  हा उपक्रम रायगड जिल्ह्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड  मार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन (गुरुवार, दि.8 सप्टेंबर 2022) रोजी आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 अंतर्गत भात व नाचणी ही दोन पिके अधिसूचित आहेत.  भात पिकासाठी विमा हप्ता रक्कम 1 हजार 35 रुपये 20 पैसे प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम 51 हजार 760 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. तर नाचणी पिकासाठी विमा हप्ता रक्कम 400 रुपये प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. खरीप हंगाम 2022 जिल्ह्यामध्ये एकूण 7 हजार 871 शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. यापैकी बँकेमार्फत विमा प

जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत “कुष्ठरोग शोध मोहीम” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम”

  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत  “ कुष्ठरोग शोध मोहीम ”  व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत  “ सक्रिय क्षयरोग शोध मोहीम ”  राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण लोकसंख्या 21 लाख 48 हजार 773 चे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण 1 हजार 662 आरोग्य पथके व 332 पर्यवेक्षक नेमण्यात आली असून एकूण 4 लाख 81 हजार 752 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. आदिवासी भागातील पाडे, वस्त्या, डोंगराळ भाग, आदी भागात कुष्ठ व क्षयरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे सहाय्यक संचालक डॉ.आर.एच.बाविस्कर यांनी कळविले आहे. तरी दि.13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिका

“महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे होणार जनसुनावणी

  अलिबाग,दि.08 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता  “ महिला आयोग आपल्या दारी ”  या उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत.   तक्रारदार पिडीत महिलेस स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. ज्या महिलांचे प्रकरण न्यायालयात सुरु असेल अथवा न्यायप्रविष्ठ असेल, अशी प्रकरणे या जनसुनावणीत स्विकारली जाणार नाहीत. रायगड येथील पोलीस स्टेशन आवारातील महिला समुपदेशन, सहाय्य कक्ष, भरोसा सेल तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयातील रायगड जिल्ह्यांच्या तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकर

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेच्या लाभाकरिता पशुपालक/शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

    अलिबाग,दि.08(जिमाका):-  केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रु. 30 हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत प्रति जिल्हा 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4.5 लक्ष याप्रमाणे एकूण 34 जिल्ह्यांकरिता रु. 153 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे.              या योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैराणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.  बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत, लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.                तरी या योजनेच्या लाभाकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद

मतदाराचा आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलाशी ऐच्छिक जोडणी कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,दि.08 (जिमाका):- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि. 23 जून 2022 च्या पत्रान्वये केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने मतदार यादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 B नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना दि. 17  जून, 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि.01 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो...                वि

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टॅंड अप इंडिया योजनेंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज योजना

  अलिबाग,दि.07 (जिमाका):-  केंद्र शासनाने  “ स्टँडअप इंडिया ”  ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील उद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2020-21 पासून योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचीत जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छी भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त श्री.जाधव यांनी कळविले आहे. 00000

राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  अलिबाग, दि.07 (जिमाका):-  राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

जिल्ह्यातील दोन लाख मतदार जोडले गेले 'आधार'शी..!

  अलिबाग,दि.06 (जिमाका):-  मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील 1 लाख 93 हजार 304 मतदार आधारशी जोडण्यात आले आहेत. त्यानुसार 188 पनवेल- 24 हजार 106, 189 कर्जत- 23 हजार 774, 190 उरण- 39 हजार 935, 191 पेण- 16 हजार 938, 192 अलिबाग- 6 हजार 465, 193 श्रीवर्धन- 47 हजार 477, 194 महाड- 34 हजार 609 अशा एकूण 1 लाख 93 हजार 304 मतदारांनी आज रोजीपर्यंत आपले मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक केले आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 22 लाख 70 हजार 768 इतकी आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त मतदार ओळखपत्र आधार लिंक करण्यावर भर देत असून यासाठी जिल्ह्यात जागोजागी स्टॉल लावण्यात आले आहेत. यासोबतच काही विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात येत असून यामध्ये आधार नोंदणीसाठी मतदारांकडून अर्ज क्रमांक 6 ब भरून घेतले जात आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने आपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सो

“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या लाभासाठी दि.7 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करून घ्यावे

Image
अलिबाग,दि.06 (जिमाका):-   “ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ”  योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी कार्यवाहीचे काम पूर्ण करण्यासाठी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जे शेतकरी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन पोलादपूर व महाड तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलादपूर तालुक्यात एकूण 7 हजार 746 लाभार्थ्यापैकी 5 हजार 173 लाभार्थ्यांची ई-केवायसी कार्यवाही पूर्ण झाली असून 2 हजार 573 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे प्रलंबित आहे. त्यापैकी गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील अहवालानुसार एकूण 1 हजार 987 खातेदारांचा प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही.  तसेच महाड तालुक्यातील एकूण 188 गावांमधील 16 हजार 789 लाभार्थ्यांपैकी 12 हजार 816 लाभार्थ्यांची ई-केवायसी कार्यवाही पूर्ण झाली असून 3 हजार 973 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे प्रलंबित आहे. संपर्क न झालेल्या खातेदारांच्या