“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या लाभासाठी दि.7 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करून घ्यावे


अलिबाग,दि.06 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी कार्यवाहीचे काम पूर्ण करण्यासाठी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जे शेतकरी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही.

तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन पोलादपूर व महाड तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यात एकूण 7 हजार 746 लाभार्थ्यापैकी 5 हजार 173 लाभार्थ्यांची ई-केवायसी कार्यवाही पूर्ण झाली असून 2 हजार 573 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे प्रलंबित आहे. त्यापैकी गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील अहवालानुसार एकूण 1 हजार 987 खातेदारांचा प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही.

 तसेच महाड तालुक्यातील एकूण 188 गावांमधील 16 हजार 789 लाभार्थ्यांपैकी 12 हजार 816 लाभार्थ्यांची ई-केवायसी कार्यवाही पूर्ण झाली असून 3 हजार 973 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे प्रलंबित आहे.

संपर्क न झालेल्या खातेदारांच्या याद्या गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

तरी ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी सीएससी सेंटर मार्फत दि.7 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा सीएससी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई आणि महाड तहसिलदार सुरेश काशीद यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक