Posts

Showing posts from November 21, 2021

ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी--उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते

  अलिबाग , जि.रायगड , दि. 24( जिमाका) :- केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 पारित केला आहे. त्यानुषंगाने बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळे विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अन्वये असंघटित कामगारांची व्याख्या :- गृह उद्योग करणारा, स्वयंरोजगार करणारा, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा, संघटीत क्षेत्रातील कामगार ज्याला औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 आणि सामाजिक सुरक्षा सं

खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते -आंतरराष्ट्रीय धावपटू तथा उरण प्रांताधिकारी ललिता बाबर

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी का र्या लय , रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी , पनवेल येथे करण्यात आले . या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुलांच्या एकूण 16 संघांनी सहभाग घेतला . स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा प्रांताधिकारी उरण श्रीमती ललिता बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . यावेळी श्रीमती ललिता बाबर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले . खेळाडूंनी आपल्या खेळांमध्ये प्रामाणिक कष्ट घ्यावे तसेच खेळांमधील जय- पराजय हे खिलाडू वृत्तीने स्वीकारावेत . पराजित झालेल्या खेळाडूंनी निराश न होता पुन्हा नव्या जोमाने पुढील स्पर्धेची तरी करून अधिकाधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत , त्यांनी उपस्थित खेळाडूंना सांगितले. त्याचबरोबर उपस्थित तसेच जिल्‍ह्यातील सर्व खेळाडू युवक- युवती ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदार नाव नोंदणी मोहिमेत सहभाग घेऊन मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवू

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु केली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टल वर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021, शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2021 अशी आहे. अर्ज भरण्यासाठीच्या अटी व शर्ती - इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/निमशासकीय/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यता प

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे युवा खेळाडू व युवकांसाठी चर्चासत्र संपन्न

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि प्रिझम संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने "Daily Lifestyle, Fitness and Diet" या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय येथे काल (दि.23 नोव्हेंबर 2021 ) रोजी करण्यात आले होते. या चर्चासत्रात अ‍ॅड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या अ‍ॅड. निलिमा हजारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. निशांत रौतेला, भारतीय भूदल सेनेतील श्री.मयुरेश गावंड आदी मान्यवरांनी उपस्थित युवा खेळाडू व   युवकांना मार्गदर्शन केले. 0000000

अलिबाग तहसिल कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- अलिबाग तहसिलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग तहसिल कार्यालय येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी   मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.   या शिबिराचे उद्घाटन अलिबागच्या तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.श्री. हुलवान, लायन्स क्लब, श्री. जित टोळकर, निवासी नायब तहसिलदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची रक्तदाब, मधुमेह, दातांचे आरोग्य, थायरॉईड व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. ०००००००

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत

  अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु केली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टल वर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021   असून शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम त

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

    अलिबाग , जि.रायगड , दि. 23 ( जिमाका):- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यां च्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी , रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2021-2022 करीता   धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील दि.30 सप्टेंबर 2021 शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगामाचा कालावधी दि.1 ऑक्टोबर 2021 ते दि. 31 जानेवारी 2022 असा असेल. तर रब्बी/उन्हाळी हंगामाचा कालावधी दि. 1 मे 2022 ते दि.30 जून 2022 असा असेल . भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7 / 12 चा उता ऱ्या ची व गाव नमुना 8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्री करिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतक ऱ्यांच्या 7 / 12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र , या वर्षीची पीक परिस्थिती ( पैसेवारी ), पीकाचे सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊन , धान

जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली अलिबाग येथे होणार खेलो इंडीया युथ गेम्स खो-खो जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा

    अलिबाग , जि.रायगड , दि. 23 ( जिमाका):- चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्स हरियाणा-2022 करिता महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खो-खो या खेळाची स्पर्धा दि. 26 ते 27 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता.अलिबाग येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी नियम व सूचना पुढीलप्रमाणे आहेत:-   या स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षाखालील मुले व मुली असा राहील, खो-खो संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा घेण्यात येतील, या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील शाळा/क्लब यांचे संघ सहभाग घेऊ शकतात, संघ नसलेल्या शाळेतील/क्लब मधील खेळाडू तसेच शाळाबाह्य खेळाडू निवड चाचणी मध्ये सहभाग घेऊ शकतात, सहभागी होण्यासाठी सर्व संघ/खेळाडूंनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा.पर्यंत मो.क्र.8856093608 या व्हॉट्सअपवर किंवा raigadgames@gmail.com ईमेल वर पाठवावे, सहभागी होणारा खेळाडू हा दि.01 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने अन् एकजुटीने पुढे जात राहणार -- उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार अजितदादांच्या हस्ते सपत्नीक सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

Image
    अलिबाग,जिल्हा.रायगड,दि.23 (जिमाका):- या महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी आज येथे केले.                श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.               यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.                आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा,म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आह