जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली अलिबाग येथे होणार खेलो इंडीया युथ गेम्स खो-खो जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्स हरियाणा-2022 करिता महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्यावतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

खो-खो या खेळाची स्पर्धा दि. 26 ते 27 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता.अलिबाग येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी नियम व सूचना पुढीलप्रमाणे आहेत:-

 या स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षाखालील मुले व मुली असा राहील, खो-खो संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा घेण्यात येतील, या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील शाळा/क्लब यांचे संघ सहभाग घेऊ शकतात, संघ नसलेल्या शाळेतील/क्लब मधील खेळाडू तसेच शाळाबाह्य खेळाडू निवड चाचणी मध्ये सहभाग घेऊ शकतात, सहभागी होण्यासाठी सर्व संघ/खेळाडूंनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा.पर्यंत मो.क्र.8856093608 या व्हॉट्सअपवर किंवा raigadgames@gmail.com ईमेल वर पाठवावे, सहभागी होणारा खेळाडू हा दि.01 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा, खेळाडूकडे आधारकार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी बोर्ड सर्टीफिकेट), जन्मप्रमाणपत्र (5 वर्षापूर्वी काढलेले) यापैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे,  ही स्पर्धा/निवड चाचणीचे आयोजन खेला इंडीया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्याकरिता करण्यात येत असल्याने सहभागी खेळाडूंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही,  18 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. पर्यंत आलेल्या संघांची उपस्थिती घेण्यात येईल, निवड चाचणीसाठी दु.02.00 वा. पर्यत उपस्थिती घेण्यात येईल, 18 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा दि.27 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. पर्यंत  आलेल्या संघांची उपस्थिती घेण्यात येईल, निवड चाचणीसाठी दु.02.00 वा. पर्यंत उपस्थिती घेण्यात येईल,  स्पर्धा ठिकाणी मास्क, सॅनिटायझर तसेच कोविड-19 प्रतिबंधकन नियमांचे पालक करणे सर्वाना बंधनकारक राहील.

 स्पर्धा आयोजनाये सर्वाधिकार आयोजन समितीला राहतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री सचिन निकम, यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा तसेच रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक