Posts

Showing posts from June 15, 2025

माणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगाभ्यास सर्वदूर पोहोचविणे आवश्यक-- महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे

Image
  रायगड (जिमाका) दि. 21:- भारताने जगाला दिलेले योगसाधनेचे अमूल्य ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात रुजावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत माणगाव तालुका प्रशासन, तालुका क्रीडा अधिकारी व मनोयोग मंदिर, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे यांनी सहभाग घेत योगसाधना केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मंत्री कु.अदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या शरीराला व मनाला अंतर्बाह्य निर्मळ करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे ‘योग’. नियमित योगसाधना केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो, मनास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक बनतो.  उपस्थितांनी एकत्रितपणे विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली व योगाभ्यासाचा अनुभव घेतला. यावेळी माणगाव तालुक...

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न एकाग्रता जपण्यासाठी प्रत्येक माणसाने योग करणे अत्यंत महत्वाचे --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड(जिमाका),दि.21 : -   प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एकाग्रता जपण्यासाठी   योग करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले.  जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, राहुल कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मेरा युवा भारतचे अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम. तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सुचिता ठमाळे, आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक विरेंद्र पवार या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र ...

मोफत कायदेशीर मदतीसाठी '15100' टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

Image
  रायगड(जिमाका)दि.20:-   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत (NALSA) गरजू व दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सहाय्य आणि सल्ला देण्यात येतो. जर आपल्याला कायदेशीर सहाय्याची किंवा सल्ल्याची आवश्यकता भासत असेल तर तुम्ही थेट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे मोफत कायदेशीर मदतीसाठी '15100' टोल फ्री क्रमांकावर येथे संपर्क साधू शकता. संपर्क तपशील: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग  फोन: 02141-232390, मोबाईल: 9552533066. टोल फ्री हेल्पलाईन: 15100 – या क्रमांकावर कॉल करून विनामूल्य कायदेशीर मदत मिळवता येईल.ऑनलाईन अर्ज:  https://www.nalsa.gov.in/ lsams/अधिक  माहितीसाठी आणि अर्जासाठी NALSA च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या किंवा खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संपर्क साधा:  YouTube: NALSA,  Instagram: @Nalsalegalaid,  X (Twitter): @NALSAlegalAid,  Facebook: nalsa.india.1,   ईमेल:  nalsa-dla@nic.in . ००००००

'निराधार बालकांना मिळणार आधार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार"

    रायगड(जिमाका)दि.20:-   समाजामध्ये असंख्य अशी निराधार बालके आहेत. अशा बालकांना कागदोपत्री कोणतीही तरतुद नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. असे उपलब्ध माहितीतून दिसून आले आहे. त्याचाच गांभिर्याने विचार करून निराधार बालकांना नैसर्गिक त्यांचे अधिकार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्या तर्फे निराधार व भटक्या जमातीच्या बालकांच्या हक्कांना आधार देण्याकरिता "साथी समिती गठित करण्यात आली आहे. साथी समितीचा मुळ उद्देश निराधार बालकांच्या हक्कांना आधार देणे म्हणजेच समाजामध्ये जी निराधार बालके आहेत, ज्या बालकांना कोणताही आधार नाही, कागदोपत्री देखील कोणता पुरावा नाही, अशा बालकांना साथी समितीतर्फे २७जून ते ५ ऑगस्ट या कालावधी मध्ये मोहिम राबविली जाणार आहे. सदरील समिती निराधार बालकांचा सर्व्हे करून त्या बालकांना आवश्यक व महत्त्वाचे असणारे आधारकार्ड काढून देणार आहे. त्यामुळे बालकांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच त्यांच्या अन्य वैयक्तिक ओळख...

थकीत लाभार्थीनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम भरुन कर्ज खाते बंद करावे

  रायगड(जिमाका)दि.20:-   महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांची उपकंपनी असलेले शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जि ल्ह्या तील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज   वितरीत करण्यात आले आहे. सदर लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपून गेली असताना देख ी ल ब ऱ्या च लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही.  त्यामुळे ज्या   थकीत लाभार्थीनी थकीत मुद्दल व थकीत व्याज रक्कमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे जेणेकरुन भविष्यात होणारी संभावित कायदेश ी र कार्यवाही टाळावी, असे आवाहन  शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महाडमंडळाचे  जिल्हा व्यवस्थापक   गंगाधर डोईफोडे   यांनी केले आहे. थकीत लाभार्थीनी कर्ज खाते बंद केल्यास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या नविन आकर्षक बिनव्याजी रु. 15 . 00   लक्ष पर्यंत कर्जाच्या योजनेमध्ये...

सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीव्दारे निवासी व अनिवासी खेळाडूकरीता प्रवेश जिल्हास्तरावर चाचण्यांचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.20:-   महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतूलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्याकरीता शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यातील कार्यरत असलेल्या 9 क्रीडाप्रबोधिनीत सरळ प्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50%) प्रक्रिये अंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय प्रवेश चाचण्या ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन,आर्चरी, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा 17 क्रीडा प्रकारात आयोजित केली जात असते. यापैकी ज्या चाचण्यांचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन केले जाणार आहे, त्या चाचण्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील.     जिल्हास्तर चाचण्या कालावधी दि.24 जून 2025 सकाळी 9.00 वाजता. प्रवेश चाचण्यांचे खेळप्रकार हॅण्डबॉल, जलतरण, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, सायकलिंग. प्रवेश अर्ज स्वि...

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

  रायगड(जिमाका)दि.20:-   राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. त्यानुसार नागरिकांनी  पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगांव-निजामपूर-ता म्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस...

“धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

Image
  रायगड,दि.19(जिमाका):-   “ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान   हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजित  “ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान   शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सुर्यवंशी, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, आत्माराम धाबे, तहसिलदार विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 02 ऑक्टोबर 2024 रोजी झाला असून या उपक्रमाचा कालावधी पाच वर्षांचा असला तरी एक वर्षातच आदिवासी बांधवांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.  देशातील आदिवासी बांधव...

MH06CT दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी इच्छूकांनी अर्ज सादर करावेत--उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते

    रायगड दि.19 (जिमाका) :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे MH06CT दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी दि.30 जून 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात डीडी, पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांनी केले आहे. तसेच एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.30 जून 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.01 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये घालून कार्यालयात जमा करावा. अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षिणचा विचार केला जाणार नाही...

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

       रायगड,(जिमाका)दि.18 :-  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलै ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जुलै-2025:  बुधवार, दि.09 जुलै 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.08 जुलै 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.11 जुलै व शुक्रवार, दि.25 जुलै 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.07 जुलै व सोमवार दि.21 जुलै 2025 ता.महाड, मंगळवार, दि.22 जुलै 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.23 जुलै 2025, ता.माणगाव. माहे ऑगस्ट-2025:  बुधवार, दि.13 ऑगस्ट 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.12 ऑगस्ट 2025, ता.मुरुड, शुक्रवार, दि.08 ऑगस्ट व शुक्रवार, दि.22 ऑगस्ट 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.11 ऑगस्ट व सोमवार दि.18 ऑगस्ट 2025 ता.महाड, मंगळवार, दि.19 ऑगस्ट 2025 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.20 ऑगस्ट 2025, ता.माणगाव. माहे सप्टेंबर-2025 :  बुधवार, दि.17 सप्टेंबर 2025, ता.रोहा, मंगळवार, दि.16 सप्टेंबर 2025, ता.मुरुड, गुरुवार, दि.11 सप्टेंबर व सोमवार, दि.29 सप्टेंबर 2025 ता.अलिबाग, सोमवार, दि.15 सप्...

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार -- मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

             रायगड,(जिमाका) दि.1 8 :-       जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) -2 अंतर्गत 21 जून 2025 रोजीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले यांनी दिली.       याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 हा आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या  21 जून 2025 रोजी एक दशक पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम 10 विशेष कार्यक्रमांमध्ये विभागलेले आहेत.या अनुषंगाने कार्यक्रम क्रमांक 1 - योग संगम मध्ये योग संगम किंवा मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम दि.21 जून 2025 रोजी सकाळी 6:30 ते 7:45 रोजी आयोजित करण्यात आला ...

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

Image
  रायगड,(जिमाका) दि.18:-   रायगड डाक विभागाने डाक जीवन विम्याचा क्लेम युद्धपातळीवर सेटल करून कै. सुयोग अशोक कांबळे हे इनफन्ट्री सोल्जर  म्ह णून कार्यरत असताना शहीद झालेल्या सैनिकास आदरांजली वाहिली. अतिशय कमीवेळात डाक जीवन विम्याचा क्लेम सेटल झाल्याने देशासाठी शहीद झालेल्या यांच्या कुटुंबासाठी हा रायगड डाक विभागाचा सुखद अनुभव होता. डाक जीवन विम्याचा रु 3,36,000/- क्लेमचा धनादेश वीरपत्नी निशा सुयोग कांबळे यांना सोपवण्यात आला. याप्रसंगी   रायगड डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक राकेश मिश्रा यांनी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर यांच्या सामाजिक बांधिलकीला प्रधान्य देण्याच्या धोरणामुळे अशी कामे यशस्वीपणे मार्गी लावत सामाजिक ऋण चुकवता आल्याचा आनंद मोठा आहे असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोस्टमास्टर श्रीमती दर्शना सिंघासने, सैनिक कार्यालय अलिबागचे प्रतिनिधी, डाक सहाय्यक शुभम शर्मा हे उपस्थित होते. क्लेम सेटल करण्यासाठी पेण पोस्टमास्टर ज्योति बावकर, मनोज अंबुरे, देवेंद्र काते, एकता श्रीवास्तव यांनी मदत केली. ००००००

"देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हाणी घाट" या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

  रायगड,(जिमाका) दि.18:-   पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील  "देवकुंड धबधबा"  व सणसवाडी गावचे हद्दीतील  "सिक्रेट पॉईंट"  व  "ताम्हिणी घाट"  हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.  सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते. या कारणांमुळे "देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट"  व आजूबाजूच्या 1 कि.मी. परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार पुढीलबाबींकरिता दि.17 जून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.  या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थे...

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन

Image
     रायगड(जिमाका) दि.17 :- शारीरिक आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन प्रतीवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने "21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. त्यानुषंगाने दि.21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास जिल्हा प्रशासनांतर्गत असलेले सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, नामांकित खेळाडू आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यातसंदर्भात (दि.16 जून) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, जिल्हा युवा अधिकारी अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीमती तपस्वी गोंधळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासमन्वयाने दि.21 जून 2025 हा दहावा आतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉलमध...

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

  रायगड,(जिमाका) दि.16:-    सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व    परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे    दिनांक 1 जुलै 2025 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी दि.30 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गणेश टेमकर यांनी केले आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फुट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेवुन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.    त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-प्रशिक्षण कालावधी- 01 जुलै 2025 ते 31 डिसेंबर 2025 (6 महिने) आहे. आवश्यक    पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे.    आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. उमेदवार...