सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

 

रायगड,(जिमाका) दि.16:-  सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व  परिचालन या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे  दिनांक 1 जुलै 2025 पासून प्रशिक्षणाच्या सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी दि.30 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गणेश टेमकर यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फुट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या "मत्स्यप्रबोधिनी" नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेवुन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.  

त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-प्रशिक्षण कालावधी- 01 जुलै 2025 ते 31 डिसेंबर 2025 (6 महिने) आहे.

आवश्यक  पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे.  आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे. उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाकिंत प्रत जोडणे आवश्यक, क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. तसेच विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. 

प्रशिक्षण शुल्क :- i) प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. ii) दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र.  (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.) 

प्रशिक्षणामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी असून  i) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थ सहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. ii) सरकारी किवा खाजगी  विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते. संपर्कासाठी पत्ता- :- श्री. धीरज शहुराव भोयर, यांत्रिक निदेशक, रायगड-अलिबाग, मत्स्यसंकुल इमारत, अलिबाग कोळीवाडा, कस्टम कार्यालयाच्या बाजूला,अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड. पिन-402201

ईमेल : ftoalibag@rediffmail.com  मोबाईल व Whas app क्र. - 9860254943.

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व Whas app क्र. 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध  करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेऊन दिनांक 30 जून 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद Whas app किवा ईमेल सादर करावेत.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज