Posts

Showing posts from August 2, 2020

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 14 हजार 378 जणांनी केली करोनावर मात

                  अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 378 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 361 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1497, पनवेल ग्रामीण-353, उरण-112, खालापूर-233, कर्जत-79, पेण-279, अलिबाग-197, मुरुड-23, माणगाव-73, तळा-8, रोहा-242, सुधागड-27, श्रीवर्धन-16, म्हसळा-13, महाड-108, पोलादपूर-9 अशी एकूण 3 हजार 269 झाली आहे.               कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-6 हजार 194, पनवेल ग्रामीण-1 हजार 997, उरण-821, खालापूर-930, कर्जत-495, पेण-1149, अलिबाग-976, मुरुड-133, माणगाव-325, तळा-21, रोहा-496, सुधागड-33, श्रीवर्धन-134, म्हसळा-185, महाड-417,   पोलादपूर-72 अशी एकूण 14 हजार 378 आहे.                          आज दिवसभरातही पनवेल मनपा-121, पनवेल ग्रामीण-51, उरण-22,

नजिकच्या काळात निसर्ग चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सुविधांसह दर्जा सुधारण्यास प्रयत्नशील -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग, जि.रायगड, दि.8 (जिमाका)-:   रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग निसर्ग चक्रीवादळामुळे क्षतीग्रस्त झाला. यात काही शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीचे तसेच शैक्षणिक सोयीसुविधांचे अतोनात नुकसान झाले. नजिकच्या काळात   चक्रीवादळग्रस्त शाळा-महाविद्यालयांचा शैक्षणिक सोयीसुविधांसह दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दोशी वकील आर्ट्स कॉलेज येथील सभागृहात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयांना संगणक व इतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.               यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, अशासकीय महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवारे, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय शेटे, प्रदीप सावंत, कोकण विभाग शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संजय जगताप, एनएसएसचे र

हुश्श...रायगडकरांना दिलासा..! जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली

    अलिबाग,जि.रायगड दि.08 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.40 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.80 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.50 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 27 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 130.86 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 23.00 मि.मी., पेण-50.00 मि.मी., मुरुड-8.00 मि.मी., पनवेल-35.60 मि.मी., उरण-21.00 मि.मी., कर्जत-44.10 मि.मी., खालापूर-36.00 मि.मी., माणगांव-14.00 मि.मी., रोहा-34.00 मि.मी., सुधागड-27.00 मि.मी., तळा-24.00 मि.मी., महाड-10.00 मि.मी., पोलादपूर-26.00 मि.मी., म्हसळा-25.00मि.मी., श्रीवर्धन-14.00 मि.मी., माथेरान-50.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 441.70 मि.मी.इतके असून सरासरी 27.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 66.25मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

             अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :- केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत “ प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना" राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्हयातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.                मत्स्यव्यवसाय विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे--- मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :- गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज निर्मिती केंद्राची स्थापना (हॅचरी), मत्स्यबीज संगोपन तलाव, मत्स्यसंवर्धन तलाव बांधणी, निविष्ठा खर्च, RAS/ बायोफ्लॉक पध्दतीने मत्स्यसंवर्धन, जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन.   सागरी मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :-   सागरी मत्स्यव्यवसाय बाबत सागरी माशांचे मत्स्यबीज केंद्र निर्मिती, मत्स्यबीज संगोपन केंद्र (नर्सरी), खुल्या समुद्रातील पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन, समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन.   शोभिवंत मासे निगडीत योजनाः- शोभिवंत मास

हुश्श...रायगडकरांना दिलासा..! जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली

    अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.80 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.50 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.70 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.65 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.60 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 80 मि.मी.पावसाची नोंद

      अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 80.28 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 1 हजार 670.06 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 30.00 मि.मी., पेण-80.00 मि.मी., मुरुड-67.00 मि.मी., पनवेल-42.60 मि.मी., उरण-37.00 मि.मी., कर्जत-51.20 मि.मी., खालापूर-47.00 मि.मी., माणगांव-68.00 मि.मी., रोहा-118.20 मि.मी., सुधागड-88.00 मि.मी., तळा-106.00 मि.मी., महाड-147.00 मि.मी., पोलादपूर-126.00 मि.मी., म्हसळा-58.00मि.मी., श्रीवर्धन-40.00 मि.मी., माथेरान-178.40 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 284.40 मि.मी.इतके असून सरासरी 80.28 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 65.39 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

शेतकरी उत्पादक संस्था स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक संस्था (फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी) स्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात नाबार्डची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी नार्बाडचे व्यवस्थापक श्री.राघवन, स्टेट बँक मॅनेजर श्री.निंबेकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष मस्के, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्‍हा उपनिबंधक गोपाळ मावळे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, आत्मा चे उपसंचालक सतिश बोराडे उपस्थित होते.   जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत विविध लाभ मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडे अर्ज सादर करावेत. बँकाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 13 हजार 692 जणांनी केली करोनावर मात

           अलिबाग,जि.रायगड दि.6 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 13 हजार 692 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 379 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1384, पनवेल ग्रामीण-372, उरण-132, खालापूर-245, कर्जत-83, पेण-263, अलिबाग-213, मुरुड-36, माणगाव-68, तळा-8, रोहा-191, सुधागड-14, श्रीवर्धन-17, म्हसळा-18, महाड-121, पोलादपूर-18 अशी एकूण 3 हजार 183 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-5 हजार 971, पनवेल ग्रामीण-1 हजार 895, उरण-786, खालापूर-867, कर्जत-471, पेण-1091, अलिबाग-924, मुरुड-107, माणगाव-304, तळा-21, रोहा-484, सुधागड-32, श्रीवर्धन-128, म्हसळा-178, महाड-370,   पोलादपूर-63 अशी एकूण 13 हजार 692 आहे.                         आज दिवसभरातही पनवेल मनपा-151, पनवेल ग्रामीण-23, उरण-37, खालापूर

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शुक्रवार, दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी, दुपारी 2.30 वा., म.औ.वि.महामंडळ विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. रायगड जिल्हा शांतता कमिटी बैठक. स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. सोईनुसार अलिबाग येथून सुतारवाडी, ता.रोहा, जि.रायगडकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.             शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.30 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. गोरेगाव येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट मार्फत संगणक व मदत वाटप. स्थळ :- दोशी वकील कला महाविद्यालय, गोरेगाव, ता.माणगाव, जि.रायगड. दुपारी 2.30 ते 3.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. गोरेगाव येथून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्

आगामी गणेशोत्सवानिमित्तची तयारी, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- आगामी रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव-2020 निमित्त करावयाच्या उपाययोजना व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी, दुपारी 3.00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे.                     या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हास्तरीय विभाग प्रमुख तर तालुकास्तरीय विभागप्रमुखांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे   उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 0000

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -23.50 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 7.70 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-5.10 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.60 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-45.00 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.90 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 209 मि.मी.पावसाची नोंद

अलिबाग,जि.रायगड दि.6 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 209.05 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 022.98 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 187.00 मि.मी., पेण-220.00 मि.मी., मुरुड-211.00 मि.मी., पनवेल-217.00 मि.मी., उरण-323.00 मि.मी., कर्जत-107.60 मि.मी., खालापूर-90.00 मि.मी., माणगांव-222.00 मि.मी., रोहा-304.00 मि.मी., सुधागड-211.00 मि.मी., तळा-237.00 मि.मी., महाड-181.00 मि.मी., पोलादपूर-182.00 मि.मी., म्हसळा-200.00मि.मी., श्रीवर्धन-238.00 मि.मी., माथेरान-214.20 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 3 हजार 344.80 मि.मी.इतके असून सरासरी 209.05 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 62.90 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 12 हजार 575 जणांनी केली करोनावर मात

        अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 575 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 388 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1399, पनवेल ग्रामीण-355, उरण-176, खालापूर-257, कर्जत-107, पेण-269, अलिबाग-187, मुरुड-53, माणगाव-69, तळा-4, रोहा-165, सुधागड-17, श्रीवर्धन-29, म्हसळा-71, महाड-135, पोलादपूर-20 अशी एकूण 3 हजार 313 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-5 हजार 507, पनवेल ग्रामीण-1 हजार 804, उरण-707, खालापूर-789, कर्जत-425, पेण-984, अलिबाग-878, मुरुड-90, माणगाव-277, तळा-21, रोहा-441, सुधागड-25, श्रीवर्धन-115, म्हसळा-125, महाड-326,   पोलादपूर-61 अशी एकूण 12 हजार 575 आहे.                         आज दिवसभरातही पनवेल मनपा-118, पनवेल ग्रामीण-48, उरण-9, खालापूर-27, कर्जत

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमआयडीसी येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण

Image
अलिबाग, जि.रायगड, दि.3 (जिमाका) : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-19 शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या   ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.               यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.               मुख