“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 12 हजार 575 जणांनी केली करोनावर मात

        अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 575 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 388 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1399, पनवेल ग्रामीण-355, उरण-176, खालापूर-257, कर्जत-107, पेण-269, अलिबाग-187, मुरुड-53, माणगाव-69, तळा-4, रोहा-165, सुधागड-17, श्रीवर्धन-29, म्हसळा-71, महाड-135, पोलादपूर-20 अशी एकूण 3 हजार 313 झाली आहे.

            कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-5 हजार 507, पनवेल ग्रामीण-1 हजार 804, उरण-707, खालापूर-789, कर्जत-425, पेण-984, अलिबाग-878, मुरुड-90, माणगाव-277, तळा-21, रोहा-441, सुधागड-25, श्रीवर्धन-115, म्हसळा-125, महाड-326,  पोलादपूर-61 अशी एकूण 12 हजार 575 आहे.           

            आज दिवसभरातही पनवेल मनपा-118, पनवेल ग्रामीण-48, उरण-9, खालापूर-27, कर्जत-22, पेण-37, अलिबाग-21, माणगाव-18, रोहा-8, श्रीवर्धन-3, म्हसळा-2,  महाड-9 असे  एकूण 325 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

             आतापर्यंत पनवेल मनपा-170, पनवेल ग्रामीण-48, उरण-31, खालापूर-35, कर्जत-19, पेण-31, अलिबाग-31, मुरुड-10, माणगाव-3, तळा-2, रोहा-15, सुधागाड-1, श्रीवर्धन-6, म्हसळा-7, महाड-25, पोलादपूर-7 असे एकूण 441 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

               आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-166, पनवेल (ग्रा)-33, उरण-13, खालापूर-28, कर्जत-12, पेण-44, अलिबाग-33, तळा-3, रोहा-19, सुधागड-3, म्हसळा-4, महाड-27, पोलादपूर-3  अशा प्रकारे एकूण 388 ने वाढ झाली आहे.

            आजच्या दिवसात 8 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, पनवेल (ग्रामीण)-1, उरण-1, खालापूर-1, पेण-1, अलिबाग-1, महाड-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

            आतापर्यंत जिल्ह्यातून 52 हजार 761 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 154 आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक