Posts

Showing posts from November 27, 2016

प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी केंद्र शासन कटिबध्द ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

Image
दिनांक:- 3/12/2016                                                                                             वृत्त क्र. 773             प्रवाशांच्या सुखकर व आनंददायी प्रवासासाठी केंद्र शासन कटिबध्द                                               ---रेल्वेमंत्री सुरेश प्रभू अलिबाग,  दि.03 :- (जिमाका) कोकणातील बहुतांशी लोक मुंबईत राहत असून ते नेहमी कोकण रेल्वेने प्रवास करीत असतात.  यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आनंददायी  व्हावा यासाठी केंद्र शासन कटिबध्द  असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री  सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.    माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील हॉल्ट स्थानकाचे  क्रॉसिंग स्थानकामध्ये परिवर्तन, महाड तालुक्यातील सापेवामने हॉल्ट स्थानकाचे क्रासिंग स्थानकामध्ये (रिमोटद्वारे) परिवर्तन व भुमिपुजन आणि कोनिशीला अनावरण त्यांचेहस्ते करण्यात आले त्यावेळी  ते बोलत होते.     यावेळी केंद्रीय अवजड व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भरत गोगावले, माणगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अलका केकाणे, इंदापूर ग्रामपंचायतीच

जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन

Image
दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 771 जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग, दि.01 :- (जिमाका) जागतिक एड्स दिन 2016 निमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्यातर्फे रॅलीचे आयोजिन करण्यात आले होते.  रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या प्रसंगी त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ डॉ.श्री.ननावरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ.सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडूरंग शिंदे, डॉ.मेघा घाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या श्रीमती पुष्पा मगर, ॲड.निहा राऊत,प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते. . रॅलीची सुरूवात जिल्हा सामान्य रुग्णालय येथून करुन एस.टी.स्टँड सर्कल मार्गे परत फिरून शिवाजी पुतळयावरुन  बालाजी नाका ते रक्तपेढी प्रांगण जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपविण्यात आली.   सदर रॅलीमध्ये एड्सविषयी घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या

आयुष व महिला मंडळातर्फे मधुमेह जनजागृती अभियान संपन्न

Image
दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 772 आयुष व महिला मंडळातर्फे मधुमेह जनजागृती अभियान संपन्न अलिबाग,दि.1(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेमार्फत कुळस्वामी महिला मंडळ,पोयनाड आयुष विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह जनजागृती अभियान संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती श्रीमती चित्रा पाटील या उपस्थित होत्या.             या कार्यक्रमांत मार्गदर्शन करतांना सौ.चित्राताई पाटील यांनी सांगितले की,संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या महिला स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे बदलत्या राहणीमानामुळे व ताणतणावांमुळे मधुमेह,रक्तदाब आदी चुकीच्या जीवनशैलीमुळे उदभवणारे आजार आजकाल दिसून येतात. त्यामुळे सर्वांनी स्वत: बरोबरच कुटूंबातील जेष्ठांची काळजी घ्यावी व नियमितपणे चालणे, योग्य आहार, व्यायाम आदी सकारात्म्क सवयी अंगी बाळगाव्यात असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात आहारातून आरोग्याकडे या विषयी मार्गदर्शन डॉ. भक्ती पाटील, वैद्यकीय समन्वय अधिकारी राजीव गांधी 

मुलगा आणि मुलगी यात फरक मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

दिनांक:-30/11/2016                                                            वृत्त क्र. 765 मुलगा आणि मुलगी यात फरक  मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक                         ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले अलिबाग दि.29:- (जिमाका)  आपल्या अपघातानंतर प्रबल इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभी राहत इंग्लड ते महाड असा 32 हजार कि.मी.प्रवास एकटयाने करणारी भारतीय महिला ही किती सक्षम आहे हे भारुलता कांबळे यांच्या बेटी बचाओ,बेटी पढाओ या मोहिमेद्वारे सिध्द झाले आहे.  त्यामुळे मुलगा  व मुलीमध्ये भेद करणारी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ मत्री राजकुमार बडोले यांनी  आज येथे केले.  श्रीमती भारुलता कांबळे यांनी इंग्लड ते भारत असा एकटीने कार प्रवास करुन  मुलगी वाचवा,मुलगी शिकवा तसेच महिला सक्षमीकरणाबाबत जागृती करण्याचे काम करत आहेत.  त्यांच्या विश्वभ्रमंतीची सांगता करणाऱ्या कार्यक्रमात भारुलता कांबळे यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक  महाड येथे सामाजिक न्यायमंत्री राजकु

राज्य निवडणूक आयुक्त यांची रायगड जिल्हयात मतदान पहाणी

Image
दिनांक:-  27/11/2016                                               वृत्त वि. क्र.756                             राज्य निवडणूक आयुक्त यांची                             रायगड जिल्हयात मतदान पहाणी             अलिबाग दि. 27:-   राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज रायगड जिल्हयात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीची मतदान पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त यांनी काल खोपोली येथे निवडणूक साहित्य वाटपाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच त्यांनी आज खोपोली येथे मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत  खोपोली नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी दिपक सावंत, तहसिलदार राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.                                                    पेण,रोहा व अलिबाग पहाणी              राज्य निवडणूक आयुक्त यांनी  पेण येथे नगरपरिषदेच्या  मतमोजणी केंद्राची पहाणी करुन समाधान व्यक्त केले