राज्य निवडणूक आयुक्त यांची रायगड जिल्हयात मतदान पहाणी

दिनांक:-  27/11/2016                                               वृत्त वि. क्र.756

                            राज्य निवडणूक आयुक्त यांची
                            रायगड जिल्हयात मतदान पहाणी

            अलिबाग दि. 27:-   राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज रायगड जिल्हयात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीची मतदान पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयुक्त यांनी काल खोपोली येथे निवडणूक साहित्य वाटपाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच त्यांनी आज खोपोली येथे मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत  खोपोली नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी दिपक सावंत, तहसिलदार राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
                                                  पेण,रोहा व अलिबाग पहाणी
             राज्य निवडणूक आयुक्त यांनी  पेण येथे नगरपरिषदेच्या  मतमोजणी केंद्राची पहाणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच गुरुकुल स्कूल येथील मतदान केंद्रासही भेट देऊन होत असलेल्या मतदानाची पाहणी केली. यावेळी पेण नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भु.सं.मेट्रो.सेंटर) दत्तप्रसाद नाडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आयुक्त महोदयांना निवडणूकी संदर्भात माहिती दिली.
        तसेच रोहा येथे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेऊन मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष मतदान होत असलेल्या मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी रोहा रविंद्र बोंबले,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील,तहसिलदार श्री.काशिद यांच्या समवेत संवाद साधला.  
                                 
        तसेच अलिबाग येथे जिल्हा उद्योग केंद्रातील मतदान केंद्रात जाऊन सोयी-सुविधांची पाहणी केली व संवाद साधला व  जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथे अलिबाग नगरपरिषदेची निवडणुक मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करुन मार्गदर्शन केले.यावेळी    नगरपरिषदेचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग सर्जेराव सोनावणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी अधिकारी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक