Posts

Showing posts from February 26, 2017

मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्यिकांचे प्रभावी योगदान -- मराठी भाषा तज्ञ अनंत देवघरकर

Image
दिनांक:- 27/02/2017                                                                                            वृत्त क्र. 104 मराठी भाषा संवर्धनासाठी  साहित्यिकांचे प्रभावी योगदान                                                               -- मराठी भाषा तज्ञ अनंत देवघरकर अलिबाग, दि.27(जिमाका) :- मराठी भाषेची महती मोठी असून मराठी भाषा संवर्धनासाठी आपल्या साहित्यिकांनी दिलेले योगदान खूप मोठे व प्रभावी आहे.  ज्यांना आपण अष्टपैलू, साहित्यिक म्हणतो त्या सर्वांनी मराठी भाषेसाठी केलेली साहित्याची निर्मिती ही अभूतपूर्व आहे.  अशा मराठीचे जतन करणे, तिचे संवर्धन करणे हे काम प्रत्येक मराठी माणसाचे असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा तज्ज्ञ अनंत देवघरकर यांनी आज येथे केले.   अलिबाग राज्य परिवहन महामंडळामार्फत  आयोजित केलेल्या मराठी भाषा दिन कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, दैनिक लोकमतचे उपसंपादक जयंत धुळप, अलिबागचे एसटी आगार व्यवस्थापक गजानन पाटील, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे  बोलताना श्री. देवघकर म्हणाले की