Posts

Showing posts from February 18, 2024

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी ऐवजी 29 फेब्रुवारी ते 01 मार्च रोजी होणार

  रायगड,दि.21(जिमाका):- मुख्यमंत् री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि.24 आणि 25 फेब्रुवारी 2024  रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात

हापूस आंबा थेट विक्रीसाठी नोंदणीला 15 फेब्रुवारी पासून सुरुवात

    रायगड,दि.21(जिमाका):-   महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम 2024 करीता आंबा उत्पादकांना आंबा विक्री करीता पुणे आणि राज्यातील/परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्या करीता आंबा उत्पादकांची नोंदणी दि.15 फेब्रुवारी 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. स्टॉल नोंदणी करीता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागिल 6 महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणा-या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे नावे रु.10,000/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ.कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.  इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर,नाचणे,जि.रत्नागिरी (02352-299328) अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ