Posts

Showing posts from August 11, 2019

स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध --- ना योगेश सागर

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे, प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश सागर यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांचे हस्ते संपन्न झाले.    त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम.शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उ पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती आदी मान्यवर उपस्थित होते.   ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली.       ध्वजारोहणानंतर नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश   सागर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.   उपस्थितांना संबोधतांना ना.श्री.सागर म्हणाले

पेण तालुका पुरग्रस्त गाव पाहणी शासन पुरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -    : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पेण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात शेतीचे, शेततळ्यांचे, घरांचे, गणपती कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन पुरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. पेण तालुक्यातील रावे,उर्णोली सानखार, दादर,कळवा, अंतोरे, जोहे, तांबडशेत,वाशी, बोर्झे, कणे, वढाव या   पुरग्रस्त गाव पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आ.प्रशांत ठाकूर, माजी   राज्यमंत्री रविशेठ पाटील, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार पेण श्रीम.अरुणा जाधव पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, मुख्याधिकारी श्रीम.अर्चना दिवे,वैकुंठ पाटील   आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पेण तालुक्या तील ग्रामीण भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थि

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.56 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3453.96 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 04.00 मि.मि., पेण-07.20 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-05.20 मि.मि., उरण-01.00 मि.मि., कर्जत-08.50 मि.मि., खालापूर-05.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-07.00 मि.मि., सुधागड-09.00 मि.मि., तळा-10.00 मि.मि., महाड-14.00मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-10.00 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-12.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 152.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.56 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   109.91 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 15 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.91 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3435.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 5.00 मि.मि., पेण-19.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-5.40 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-9.20 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-13.00 मि.मि., रोहा-9.00 मि.मि., सुधागड-26.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-12.00मि.मि., पोलादपूर-30.00, म्हसळा-18.00मि.मि., श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-50.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 254.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 15.91 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   109.31 टक्के इतकी आहे. 0000

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग दि.11 ऑगस्ट- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्तीमूळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड रविंद्र   चव्हाण यांनी आज राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र   चव्हाण यांनी पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा सर्वंकष आढावा विविध विभागाकडून घेतला. विद्युत विभागाने जिल्ह्यामध्ये 24 तासा पेक्षा जास्त लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालये तसेच अति महत्वाचे ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत राहील. पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे   बांधबंधिस्तीचे नुकसान झाले आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्याच