Posts

Showing posts from August 16, 2020

मुरुड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांचे फलित

    अलिबाग,जि.रायगड, दि.19   (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.                रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्याकडे पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. या   पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना दिल्या.               यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.             सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करून आणल्यानंतर मासे विक्रीसाठी तसेच मत्स्यप्रक्रियेसाठी ससून डॉक येथे जाता येत ना

कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणीकार्ड आधार लिंक करा

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने लिंक करुन नोंदणीतील माहिती दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत अद्यावत   करणे आवश्यक आहे. याकरीता सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणीमध्ये आपल्या आधार कार्ड नोंदणी क्रमांकाचा   समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली आपली सर्व माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या   https:// rojgar.mahaswayam. gov.in या वेबपोर्टलवर दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत अद्ययावत करावी. तसेच वेबपोर्टलवरील उपलब्ध असलेली नोकरी/व्यवसाय इ. बाबतची माहिती प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी वेबपोर्टलवर लॉग-इन करावे. ही माहिती दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील आपली नोंदणी रद्द करण्यात येईल. वेबपोर्टलवरील   माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या 02141-222029 या

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

  अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्याकडून प्राप्त झालेल्या नद्यांचा पाणी पातळी दैनंदिन तालुकानिहाय अहवाल पुढीलप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.70 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.30 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.00 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-18.80 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.10 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.90 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.43 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 708.72 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 28.00 मि.मी., पेण-60.00 मि.मी., मुरुड-31.00 मि.मी., पनवेल-57.20 मि.मी., उरण-44.00 मि.मी., कर्जत-48.40 मि.मी., खालापूर-75.00 मि.मी., माणगाव-85.00 मि.मी., रोहा-55.20 मि.मी., सुधागड-65.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-66.00 मि.मी., पोलादपूर-79.00 मि.मी., म्हसळा-40.00मि.मी., श्रीवर्धन-40.00 मि.मी., माथेरान-78.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 918.80 मि.मी.इतके असून सरासरी 57.43 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 84.22 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगडदि.18 (जिमाका):- केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन 2020 च्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.                  दिव्यांग व्यक्तींना सन-2020 चे पुरस्कारासाठीचे अर्ज दि. 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2020 या   कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या WWW.DASABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. अर्जदारांकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण माहिती व अर्ज दि.22 ऑगस्ट 2020 पूर्वी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. हे अर्ज दि.25 ऑगस्ट 2020 पूर्वी आयुक्तालयात सादर करावयाचे आहेत.                  राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे :- उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती.    उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था. प्रथितयश व्यक्ती (रोल मॉडेल). दिव्यां

निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.31ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी

  अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- जिल्हा कोषागार कार्यालय,रायगड-अलिबाग येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची आहे.             यासाठी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांची माहिती मागविण्यात आली असून ती माहिती पुढीलप्रमाणे आहे--- निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचे पूर्ण नाव, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा पूर्ण पत्ता, निवृत्तीवेतनधारक प्रदान आदेश क्रमांक (PPO NO), बँकेचा तपशिल, बँकेचे नाव, शाखेचे नावे, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक (झेरॉक्स जोडण्यात यावी), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा ई-मेल आयडी असल्यास नमूद करण्यात यावा.             ही माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या to.raigad@zillamahakosh.in या ई-मेल वर अथवा जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्तीवेतन शाखा, हिराकोट तलावाजवळ, रायगड-अलिबा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी.पावसाची नोंद

    अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.58 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 651.29 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 17.00 मि.मी., पेण-25.00 मि.मी., मुरुड-34.00 मि.मी., पनवेल-87.60 मि.मी., उरण-18.00 मि.मी., कर्जत-47.00 मि.मी., खालापूर-31.00 मि.मी., माणगांव-37.00 मि.मी., रोहा-68.00 मि.मी., सुधागड-35.00 मि.मी., तळा-69.00 मि.मी., महाड-76.00 मि.मी., पोलादपूर-82.00 मि.मी., म्हसळा-53.00मि.मी., श्रीवर्धन-30.00 मि.मी., माथेरान-211.60 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 921.20 मि.मी.इतके असून सरासरी 57.58 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 82.43 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली पाहणी

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-     राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पाहणी केली तसेच संबंधित यंत्रणेच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांना अपूर्ण असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, कृषी व पशु संवर्धन सभापती बबन मनवे,   म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.जयश्री काफरे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी, कार्यकारी अभियंता श्री.कोळी, गटविकास अधिकारी श्री.प्रभे, म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री. उकिरडे, श्री.समीर बनकर, श्री.नाझीम हसवारे आदी उपस्थित होते. 00000

डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारत सेलचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-     74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि.15 ऑगस्ट 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे केले.   यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती.              राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारतासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याबद्दल कुलगुरू प्रो.वेदला रामा शास्त्री यांचे अभिनंदन केले.   ते पुढे म्हणाले, देशातील तरुणांनी मातृभाषेचे महत्त्व समजून घेऊन आपली स्वतःची शक्ती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.   आत्मनिर्भर भारत साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाची भूमिका पुढे आणावी आणि देशातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यात आपल्या विद्यापीठांनी मोठी भूमिका बजावावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.   शेवटी त्यांनी उपस्थितांना व्यावहारिकदृष्ट्या काम करण्याची खूप गरज अस

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर व्यापारी, भाजीपाला विक्रेते इत्यादींनी स्वत:ची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट तात्काळ करून घ्यावी

  अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-   दैनंदिन नागरिकांचा व्यापारी, भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंप इत्यादींशी सतत संपर्क येत असतो.  आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक यांनी त्यांच्या व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वखर्चाने त्यांची स्वत:ची तसेच त्यांच्या दुकानामध्ये काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट तात्काळ करून घ्यावी आणि त्याबद्दलची माहिती संबंधित नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.  करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता जास्तीत जास्त बाधित व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  शिवाय जागतिक आरोग्य संघटना तसेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन तसेच शासनाच्या सूचनांप्र

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.85 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 5.90 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.00 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-19.00 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.80 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.90 मी. इतकी आहे. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43 मि.मी.पावसाची नोंद

  अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.90 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 593.72 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 10.00 मि.मी., पेण-20.00 मि.मी., मुरुड-13.00 मि.मी., पनवेल-17.40 मि.मी., उरण-17.00 मि.मी., कर्जत-44.00 मि.मी., खालापूर-45.00 मि.मी., माणगांव-49.00 मि.मी., रोहा-29.00 मि.मी., सुधागड-43.00 मि.मी., तळा-65.00 मि.मी., महाड-87.00 मि.मी., पोलादपूर-124.00 मि.मी., म्हसळा-43.00मि.मी., श्रीवर्धन-47.00 मि.मी., माथेरान-49.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 704.40 मि.मी.इतके असून सरासरी 43.90 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 80.64 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.17 (जिमाका):- श्रीवर्धन शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सामान्य दर्जाचे क्ष-किरण मशीन होते. जुन्या तंत्रज्ञामुळे   सध्याच्या मशीन मध्ये   ठराविक एक्स-रे च निघत असल्याने तसेच त्याचा दर्जा सामान्य असल्यामुळे रुग्णाला उत्तम दर्जाच्या एक्स-रे साठी खासगी एक्स-रे क्लिनिक मध्ये जावे लागत होते. परिणामी रुग्णाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात येथे डिजिटल क्ष-किरण यंत्राचे आज वितरण करण्यात आले व  एक्स-रे सेवेचे  उद्घाटनही करण्यात आले. उद्घाटनानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रुग्णालयाची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,पं.स.सदस्य मंगेश कोबनाक, प्रांताधिकारी श्री. अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे,   वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.जी.भरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडे, डॉ.गवळी, दर्शन विचारे, सौ.मीना वेशवीकर मान्यवर तसेच रुग्णालयातील   डॉक्टर्स, नर्सेस व तेथील कर्मचारी उपस्थित हो