केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

 


अलिबाग,जि.रायगडदि.18 (जिमाका):- केंद्र शासनाच्या विकलांग जन सशक्तीकरण विभागाने सन 2020 च्या दिव्यांग पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

              दिव्यांग व्यक्तींना सन-2020 चे पुरस्कारासाठीचे अर्ज दि. 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2020 या  कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच हे अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या WWW.DASABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. अर्जदारांकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण माहिती व अर्ज दि.22 ऑगस्ट 2020 पूर्वी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. हे अर्ज दि.25 ऑगस्ट 2020 पूर्वी आयुक्तालयात सादर करावयाचे आहेत. 

              राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे :- उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती.   उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था. प्रथितयश व्यक्ती (रोल मॉडेल). दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी उद्देशाने केलेल्या उत्कृष्ट संशोधन/उत्पादन निर्मिती.  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळाविरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था.   दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा.  राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती. उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक. उत्कृष्ट ब्रेल कारखाना. उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती.

        या पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज  इंग्रजीत किंवा हिंदीमध्ये तीन प्रतीत मुदतीच्या आत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे सादर करावेत, असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक