Posts

Showing posts from July 28, 2019

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 163मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 163.45 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2774.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 106.00 मि.मि., पेण-122.00 मि.मि., मुरुड-159.00 मि.मि., पनवेल-76.60 मि.मि., उरण-54.00 मि.मि., कर्जत-117.60 मि.मि., खालापूर-100.00 मि.मि., माणगांव-226.00 मि.मि., रोहा-295.00 मि.मि., सुधागड-175.00 मि.मि., तळा-210.00 मि.मि., महाड-188.00मि.मि., पोलादपूर-245.00, म्हसळा-200.00 मि.मि., श्रीवर्धन-135.00 मि.मि., माथेरान-206.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2615.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 163.45 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   88.28 टक्के इतकी आहे. 0000

7 ऑगस्ट रोजी निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा

अलिबाग दि.2 ऑगस्ट :-   अवर सचिव, वित्त विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडील सुचनानुसार सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, 7 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता जंजीरा सभागृह पोलीस परेड मैदान अलिबाग येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग फिरोज मुल्ला यांनी केले आहे. 00000

महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग दि.1 ऑगस्ट :-   महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   अँग्लो इस्टर्न मेरिटाईम अकॅडमी खांडपे ता.कर्जत येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपविभागीय अधिकारी श्रीमती शारदा पोवार अलिबाग, श्रीमती प्रतिमा पुदलवाड पेण, श्रीमती वैशाली परदेशी कर्जत, श्री. दत्तात्रय नवले पनवेल,श्री. विठ्ठल इनामदार महाड,श्री. प्रविण पवार श्रीवर्धन, श्री.बोंबले आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्य रितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान

मुंबई गोवा हायवे वरील वाहतूकीत बदल

अलिबाग दि.31 जुलै :-   जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड प्रकल्पाची 600 मी.मी. व्यासाची जुनी पाईपलाईन ज्यामार्फत 45 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे, त्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामाकरीता दि.01/08/2019 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा हायवे वरील गोव्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक ही वाकण ब्रीज (वाहतुक पोलीस चौकी) - आमडोशी - एम.आय. डी.सी. रोड - रिलायन्स चौक सर्कल - होली एंजल्स स्कुल मार्गे हायवे अशी, तर मुंबई बाजूकडून येणारी वाहतुक ही रिलायन्स कमान - रिलायन्स चौक व तेथुन एम.आय.डी.सी. रोड - आमडोशी मार्गे - वाकण ब्रीज (वाहतुक पोलीस चौकी) - हायवे या मार्गाने वळविण्याचे आदेश डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हादंडाधिकारी रायगड यांनी जारी केले आहेत. 00000

एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार

अलिबाग दि.31 जुलै :-   शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी   बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करूण उत्तीर्ण झालेले माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्कार प्राप्त करण्यासाठी माजी सैनिक विधवांनी खाली नमूद कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे   दिनांक   15 सप्टेंबर 2019   पुर्वी सादर करून सदर संधीचा भरपूर लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पद्मश्री एस बैनाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रायगड-अलिबाग   यांनी केले आहे.     माजी सैनिक विधवेचा हस्तलिखित अर्ज. डी डी 40 फॉर्म. माजी सैनिक विधवा ओळखपत्र. एस. एस. सी. / एच. एस. सी. बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत. एस. एस. सी./ एच. एस. सी. बोर्डाच्या गुण पत्रकाची छायांकित प्रत ही कागदपत्र अर्जासोबत जोडावी.   00000

माजी सैनिक/ माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2019 करीता शिष्यवृती

अलिबाग दि.31 जुलै :-   सन 2018-19 मघ्ये इयत्ता 10 वी   व 12 वी व पदवी/पदविका परिक्षेत किमान 60% गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणा-या तसेच विद्यापिठाने मान्य केलेल्या विषयांमघ्ये संशोधनपर अभ्यासक्रम करणा-या (पीएचडी व तत्सम) माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत दर वर्षी शैक्षणिक श्ष्यिवृती देण्यात येणार आहे. सदर कामी माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रासह आपले अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत. वैयक्तिक अर्ज. डी डी-40 अर्ज (कार्यालयात उपलब्ध आहे.) ओळखपत्राची पाटपोठ छायांकित प्रत. सद्या पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गाचे बोनाफाईड सर्टीफिकेट. उत्तीर्ण झालेल्या वर्गाच्या गुणपत्रिकेची प्रमाणित सत्यप्रत. डिसचार्ज पुस्तकातील कुटूंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रमाणित छायांकित प्रत. इतर कोणतीही शिष्यवृती मिळत नसलेबाबतचा कॉलेजचा दाखला. ही कागदपत्र अर्जासोबत जोडावी. तरी   सदर संधीचा जिल्हयातील पात्र  

विविध क्षेत्रात काम करणा-या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष पुरस्कार

            अलिबाग दि.31 जुलै :-   राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त्‍ खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्टा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. यांना अशा कार्याबदृल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एक रकमी रू.10000/- व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू.25000/- चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणारआहे.             विविध क्षेत्रात काम करणा-या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यसाठी खालील प्रमाणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे :- खेळातील पुरस्कार राष्ट्रीय/राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय ?.   घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला ?. राष्ट्रीय/राज्य स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले आहे काय ? उत्कृष्ट कामगिरी/पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रस

महसूल दिनानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा

अलिबाग दि.31 जुलै :-   1 ऑगस्ट पासून महसूली वर्ष सुरु होते. जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्यावेळी   पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसूल वसूलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरीता 1 ऑगस्ट हा दिवस महसूली दिन म्हणून साजरा करण्यांत यावा असे 19/07/2002 च्या शासन परिपत्रकान्वये निर्देश देण्यांत आलेले आहेत. त्या अनुषंगाने सन 2018-19 या वर्षीचा महसूल दिन 1 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता ॲग्लो इस्टर्न मेरिटाईम अकॅडमी खांडपे, ता.कर्जत जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेला आहे. या महसूल दिनाला सन 2018-19 या महसूली वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा व महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्या पाल्यांनी सन 2018-19 या वर्षात शैक्षणिक / सांस्कृतिक / क्रिडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. 000000

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक

अलिबाग,जि.रायगड   दि.31 - (जिमाका)   गेल्या 50 वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी सुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे 10 लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याचे आणि त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदानापासून व औषधोपचारापासून वंचित आहेत. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर / एक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत 69,499 इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे. तर शासकीय यंत्रणेमार्फत 1,40,627 इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन 2017 ते 2025 नुसार कार्यक्रमात उपलब्ध अद्यावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी  

दिव्यांग मतदार नोंदणीसाठी जनजागृती आवश्यक -उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम.वैशाली माने

Image
अलिबाग,जि.रायगड   दि.31 - (जिमाका)   आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने विधानसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीम.वैशाली माने यांनी आज दिली.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित “ सुलभ निवडणूका ” जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग रविकिरण पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.जी.एम.लेंडी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा जिल्हा युथ आयकॉन निवडणूक श्रीम.तपस्वी गोंधळी, प्रमोद गवई आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीम.माने म्हणाल्या की, मा.निवडणूक आयोगाच्या मार्गदर