Posts

Showing posts from July 24, 2022

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अलिबाग, दि.29 (जिमाका):-   दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राज्य शासनाच्या वतीने सन 2022 च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला असून https://does.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyVrLvF7E4f448GWvW9Q/viewform?pli=1 या वेबपोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. हे अर्ज ऑनलाईन मागविण्याची मुदत दि.28 जुलै 2022 रोजी पासून दि. 07 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दि.07 ऑगस्ट 2022 पर्यंत सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद श्रीमती ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी कळविले आहे. 00000

जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडतीची कार्यवाही संपन्न

Image
अलिबाग, दि.28 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप -2022/प्र.क्र. 02/का.6, दि. 22 जुलै 2022 अन्वये राज्यातील 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीची कार्यवाही आज दि.28 जुलै 2022 रोजी पार पडली. या आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याकरिता आरक्षणाची अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयांच्या सूचनाफलकांवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. 00000

मध केंद्र योजना (मधमाशापालन) योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत

Image
अलिबाग, दि.28 (जिमाका):- उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि.18 जून 2019 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र व्यक्ती/संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्व-गुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/ प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ठ्ये आहेत. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता: वैयक्तिक मधपाळ या लाभाकरिता पात्रता पुढीलप्रमाणे- अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य, केंद्रचालक / प्रगतीशिल मधपाळ, किमान 10 वी उत्तीर्ण, वय 21 पेक्षा जास्त, अशा व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन, किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन, व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्ष

महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Image
अलिबाग, दि.28 (जिमाका):- महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या तर तालुकास्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा, या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन राज्य विभागीय जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11.00 वाजता किंवा या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी या दिनाचे आयोजन करण्यात येते. यासाठी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची आगाव

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023 साठी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  अलिबाग, दि.28 (जिमाका):- भारतात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने “ सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार ” या नावाच्या पारितोषिकांची सुरुवात केली आहे. या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तीचे आपत्ती प्रतिबंध, आपत्तीचे उपशमन, सुसज्जता, बचाव, प्रतिसाद, मदत, पुनर्वसन, संशोधन अथवा नाविन्यपूर्ण शोध किंवा आपत्तीचा जलद इशारा या क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान लक्षात घेतले जाते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2018 या वर्षीपासून हे पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. “ सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023 ” साठीचे अर्ज 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. महान देशभक्त आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारी रोजी वर्ष 2023 साठीच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल. व्यक्ती आणि संस्था यांमधून तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल. पुरस्कारप्राप्त संस्थेला प्रमाणपत्र आणि रोख 51 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. विजेत्या स

“घरोघरी तिरंगा” अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेचे संयुक्त प्रयत्न

Image
अलिबाग, दि.28 (जिमाका):- “ घरोघरी तिरंगा ” अभियानाबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्याकरिता अलिबाग येथील प्रिझम सामाजिक विकास संस्थेमध्ये करियर मार्गदर्शन घेणाऱ्या युवकांशी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दि.27 जुलै 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी 125 युवक-युवती उपस्थित होते. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करणार असल्याचा निर्धार केला. विविध आदिवासी पाड्यांवर जावून या अभियानाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक व त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती तपस्वी गोंधळी आणि मार्गदर्शक श्रीमती सुचिता साळवी जनजागृती करणार असून काही पाड्यांवर तिरंगाही वितरित करणार आहेत. 00000

“क्षयरोग रुग्णाला सामूदायिक साहाय्य समर्थन मोहीम” बळकट करण्यासाठी लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या साहाय्याने जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालय सज्ज

Image
अलिबाग, दि.28 (जिमाका):- सहसंचालक (कुष्ठ व क्षयरोग) पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि.27 जुलै 2022 रोजी जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यालय येथे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ .सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची “ टी.बी. रुग्णाला सामूदायिक साहाय्य समर्थन मोहीम" बळकट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. क्षयरोग झालेल्या रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. क्षयरोग झाल्यामुळे त्यांची भूक   मंदावते, जर रुग्ण गोळ्या जेवण न करता खात असेल तर त्यास इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्याला पोषण व सकस आहार असेल तर तो या आजारातून लवकरच बरा होऊ शकतो, आदी विषयांबाबत चर्चा संपन्न झाली. विशेष साहाय्य म्हणून लायन्स व रोटरी क्लबकडून रुग्णाला सकस व पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करून ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा क्षयरुग्णाला दत्तक घेण्यात येणार आहे. त्या रुग्णाचा उपचार संपेपर्यंत अंदाजे सहा महिने त्यांना सकस आहार दिला ज

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बॅंक खाते ई-केवायसी करून घेणे बंधनकारक - तहसिलदार मीनल दळवी

  अलिबाग, दि.28 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले खाते ई-केवायसी तसेच एन.पी.सी.आय. (संबंधित बँकेमध्ये जावून बँक खात्याशी आधार लिंक करणे) या विषयाबाबत तहसिलदार कार्यालय अलिबाग येथे दि.26 जुलै 2022 रोजी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अलिबाग, अलिबाग तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी कृषी, /शेती यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ई-केवायसी तसेच एन.पी.सी.आय (संबंधित बँकेमध्ये जावून बँक खात्याशी आधार लिंक करणे) बाबतच्या सूचना देण्यात आल्या. अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी आपल्या लाभाचा हप्ता जमा होणारे बँक खाते ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरिता असलेले बँक खाते ई-केवायसी करण्याकरिता आपल्या आधारकार्डसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलसह, आधारकार्ड व बँक पासबुक घेवून नजिकच्या आधारकार्ड सुविधा केंद्र/ ई-सुव

माथेरान शहरात ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न

Image
  अलिबाग, दि.27 (जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.27 जुलै 2022 रोजी माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न झाली. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या उपक्रमाची व्यवहार्यता तपासण्यासाठी हा उपक्रम अभ्यास प्रकल्प म्हणून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता माथेरानमध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी 06 स्वारस्य अभिरुची (EOI) पैकी 05 ई-रिक्षा या चाचणीत सहभागी झाल्या होत्या. पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.माने, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.कराळे व श्री.पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे प्रादेशिक अधिकारी वि.वि. किल्लेदार, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री.कामत, माथेरान नगरपरिषदेचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) उमेश जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शेखर लव्हे आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही चाचणी पूर्ण करण्यात आली.

जल जीवन मिशन अंतर्गत विशेष मोहीम यशस्वी करावी - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हात दि.25 जुलै 2022 पासून “ हर घर जल उत्सव ” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दि.12 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. मुबलक शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून राबविली जात आहे. या योजनेत शंभर टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये “ हर घर जल ” घोषित करणे, त्याबाबतचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करणे, लोककलाकारांचा सहभाग घेऊन जनजागृती करणे, पाणी

स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्यातून सुधागड तालुक्यातील आसरे कासरवाडी बनले “स्वप्नातील गाव”

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सुधागड तालुक्यातील आसरे कासारवाडी हे गाव “ स्वप्नातील गाव ” म्हणून घोषित करण्यात आले आहे. “ स्वप्नातील गाव ” बनविण्याच्या संकल्पनेतून वाटचाल करीत असताना गावांमध्ये अनेक सामाजिक योजना स्वदेस फाउंडेशन, शासन व गाव विकास समिती यांच्या सहकाऱ्याने राबवून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. गाव विकास समितीच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून गावात हरितक्रांती, वृक्ष लागवड, ठिबक सिंचन अंतर्गत पाणीपुरवठा, म्हैस पालन, अंतर्गत रस्ते, पथदिवे, हागणदारीमुक्त गाव, ओल्या सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, निवृत्ती वेतन, शासकीय कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, महिला बचतगट, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शाळा व अंगणवाडी अशा अनेक उपक्रमातून हे गाव आदर्श गाव म्हणून साकारण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पेणचे आमदार रविंद्र पाटील, तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, ग्रामपंचायत सरपंच श्रीमती स्वात

जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांना दिली जाणार पर्यावरण संवर्धन शपथ

अलिबाग, दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.14 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी वृक्ष लागवड करण्यासोबतच विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संवर्धन शपथ दिली जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला दि.15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा भाग म्हणून दि.14 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी बांबू तसेच विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट यांचा सहभाग घेण्यात येणार असून, त्यांना पर्यावरण संवर्धन शपथ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.   पर्यावरण संवर्धन- शपथ - मी अश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुई गाव स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने बनले स्वप्नातील गाव

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-   सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत मधील पुई हे छोटेसे गाव मागील तीन वर्षांपासून गावाचा विकास करण्यासाठी एक स्वप्नातील गाव बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेषतः या गावातील महिलांनी स्वप्नातील गाव बनविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण गावाने त्यांना मदत केली. नारी शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने पुई या गावाने दाखवून दिले आणि म्हणूनच सोमवार दि.25 जुलै रोजी सिद्धेश्वर ग्रामपंचायतीतील पुई हे गाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित करण्यात आले. या गुणगौरव सोहळ्यासाठी सुधागड तालुक्याचे तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी यादव, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.उमेश यादव, ग्रामसेवक श्री.गोरड, स्वदेश फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, सहाय्यक व्यवस्थापक समीर शेख, समन्वयक सोनाली पवार व सर्व स्वदेस कर्मचारी आणि इतर परिसरातील गावविकास समितीचे सदस्य उपस्थित होते.  पुई हे छोटेसे गाव

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलैपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 938 लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 1 लाख 43 हजार 156 लाभार्थ्यांची आधारकार्डची माहिती पी.एम.किसान पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. केंद्र शासनाकडील नवीन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांचा पी.एम.किसान योजनेचा लाभ हा त्यांचे आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केला जाणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी दि.31 जुलै 2022 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी:- स्टेप 1-  मोबाईलवरून गूगल क्रोमवर  www.pmkisan.gov.in  टाईप करावे. त्यानंतर तुम्ही पी.एम.किसान पोर्टलवर जाल व तिथे तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक

शामराव पेजे स्मृती न्यासातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता कोकण व बृहन्मुंबई क्षेत्रातील कुणबी व तत्सम इतर मागास समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

अलिबाग, दि.26 (जिमाका):-  शामराव पेजे   न्यासातर्फे कोकण व बृहन्मुंबई क्षेत्रातील कुणबी व अन्य तत्सम इतर मागास समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीनींकडून कार्यवाह, शामराव पेजे स्मृती न्यास द्वारा सर्वोदय छात्रालय, डॉ.बा.ना.सावंत रोड, रत्नागिरी, पिन कोड 415612 या पत्यावर अर्ज मागविण्यात आले असून अर्ज याच पत्त्यावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 9421706592 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज वितरण व स्वीकारण्याचा कालावधी दि.25 जुलै 2022 ते दि.30 ऑगस्ट 2022 (सार्वजनिक सुट्टीचा दिवस व रविवार वगळून) वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत   असा आहे. या तारखेनंतर अर्ज दिले व स्विकारले जाणार नाहीत. मनिऑर्डरने रु.15/- पाठविल्यास अर्ज पोस्टाने पाठविला जाईल. मनिऑर्डर कूपनवर लाभार्थीचे पूर्ण नाव, पत्ता व फोन नंबर लिहिणे आवश्यक आहे. अपुऱ्या पत्त्यामुळे वा पोस्टाच्या दिरंगाईमुळे विहित मुदतीत अर्ज न मिळाल्यास त्यास हे न्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. सर्वसाधारण वार्षिक शिष्यवृत्तीसाठी पात्रता:   सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 12वी पुढील पदवी / पदव्युत्तर/व्यावसायिक अभ्यासक्रम

सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्काराकरिता व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व योगदान देणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या  www.awards.gov.in  या पोर्टलवर दि.31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.   तरी देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व विशिष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. 00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याची दिंडी अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेची अभिनव संकल्पना; जिल्ह्यात विविध उपक्रमांचे होणार आयोजन

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याला दि.15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त केंद्र सरकारने  “ हर घर तिरंगा ”  अर्थात  “ घरोघरी तिरंगा ”  अभियान जाहीर केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत रायगड जिल्हा परिषद  “ स्वातंत्र्याची दिंडी ”  हा उपक्रम दि.09 ते दि.16 ऑगस्ट दरम्यान राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविणे, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम राबविणे यासह इतर बाबींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारने  “ घरोघरी तिरंगा ”  हे अभियान जाहीर केले आहे. यांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमातून शिवणक्षेत्रात