Posts

Showing posts from February 24, 2019

पनवेल येथे विविध विकासकामांचा शुभारंभ लोकप्रतिनिधी व प्रशासन विकासाची दोन चाके - पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 :-   शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचण्यासाठी विकासाच्या रथाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तरच फायदा होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना येत आहे,असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 2) पनवेल येथे केले. पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील,   सभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, राजू सोनी, सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, नगरसेवक नितिन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, पं. स. सदस्या रत्नाताई घरत, जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ   आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतान

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.2 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.2 रोजी दुपारी चार वा. कामोठे येथे आगमन व पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभारण्याच्या कामाचे भूमीपुजन. स्थळ : कोमोठे.   दु.साडेचार वा. वडाळ तलावाचे सुशोभिकरण कामाचे भूमीपुजन. स्थळ : बल्लाळेश्वर मंदिराजवळ.   सायं. पाच वा. नॅशनल पॅराडाईज सोसायटी ते गोदरेज स्काय गार्डन अं.भू.क्र.399 व राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (अ.भू.क्र.307) ते पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचे भूमीपुजन.   स्थळ : पनवेल रेल्वे स्थानक रस्ता यशोनगर सोसायटी समोर.   सायं.साडेपाच वा.प्रा.क्र.1033 अ येथे समाज मंदिर बांधकामाचे भूमीपुजन.   सायं.सहा वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण कामाचे भूमीपुजन.   सायं.साडेसहा वा. प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या बांधकामोच भूमीपुजन.   सायं.सात वा. पनवेल

विद्यार्थी खेळाडूंच्या वाढीव गुणांकनासाठी प्रस्ताव मागविले

                                                 अलिबाग,जि. रायगड   दि.१: शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्यप्राप्त सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भातील सुधारित कार्यपध्दतीस शासन मान्यता देण्यात आली आाहे.   शासन निर्णयानुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळाच्या राज्य संघटना इ.आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत.   एकविध खेळाच्या राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयात नमूद कागदपत्रांच्या यादीनुसार परिपूर्ण असतील तरच खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरिता शिफारस करण्यात येईल. एखादा खेळाडू विद्यार्थ्यांना क्लबकडून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केलेले प्रतिनिधीत्व अथवा संपादन केलेले प्राविण्य क्रीडा गुण सवलतीसाठी अनुज्ञेय असणार नाही.   जिल्ह्यातील एकविध खेळाच्या संघटनां

वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी ऑनलाईन शुल्क

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेणे येथे ऑनलाईन वाहन 4.0 संगणक प्रणालीचा वापर नोव्हेंबर 2017 पासून सुरु करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीवर वाहन विषयक सर्व कामकाज करण्यात येत आहे.   1 मार्च पासून ऑटोरिक्षासह सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व त्यासाठीच्या ऑनलाईन अपॉईटमेंट कामकाज   व शुल्क भरणा ऑनलाईन करण्यात यावा.ऑनलाईन अपॉईटमेंट घेऊन   ऑनलाईन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण शुल्क भरणा केल्यानंतर नियोजित दिवशी व वेळी वाहन खटला विभागातील केस किंवा हरकत नसल्याचा शेरा घेऊन जिते येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणीसाठी हजर करावे. वाहन धारकांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा नागरी सुविधा केंद्रातूनही (CSC) सेंटरमधून व सायबर कॅफेतून ऑनलाईन अपॉईटमेंट घेता येईल. अपॉईटमेंट घेण्यासाठी www.parivahan.gov.in या वेबसाईट मध्ये Online Services व त्यानंतर Vehicle related service पर्याय निवडा त्यानंतर Vehicle Number टाकून आपण योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण (Apply for Fitness Renewal) हा पर्याय निवडण्यात यावा व संगणकप

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना:अधिकाधिक श्रमिकांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:-   केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरु केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त श्रमिकांनी  या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.  या योजेनेच्या जनजागृतीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दि.4 मार्च रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लाभदायक योजना ज्या कामगारांना पेन्शन योजना लागू नसते अथवा खाजगी पेन्शन योजनेमध्ये देखील जे सहभागी होऊ शकत नाहीत अशा स्वरु

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : अंसघटित कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांचे निर्देश

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:-   केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरु केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायत स्तरावर नाव नोंदणी करावी व जास्तीत जास्त गरजू कामगारांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी गटविकास अधिकारी   संबंधित यंत्रणेला दिले आहेत.   या योजेनेच्या अंमलबजावणीसाठी आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात   बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक   प्रकाश गजऋषी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शिक्षणाधिकारी दराडे आदी विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दि.4 मार्च रोजी शिबिरांचे आयोजन करुन असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करावी, असे निर्देशही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी

महाडीबीटीवरील अर्जांबाबत सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27:-   शासनाच्या विविध शिष्यवृत्या व अन्य आर्थिक लाभ देण्यासाठी   सामाजिक न्याय विभागाने महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवरुन विद्यार्थी, महाविद्यालयांमार्फत अर्ज करणे, सामाजिक न्याय विभागामार्फत शासनाच्या विविध शिष्यवृत्या व अन्य आर्थिक लाभ देण्यासाठी   सामाजिक न्याय विभागाने महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवरुन विद्यार्थी, महाविद्यालयांमार्फत अर्ज करणे, सामाजिक न्याय विभागामार्फत ते अपलोड करणे यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे व संभाव्य चुका टाळून वेळेवर अर्ज अपलोड होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यांचा यथायोग्य वापर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेले निवेदन याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल दि. 01.10.2018 रोजी नव्याने कार्यान्वीत झाले आहे.   https://mahadbtmahait.gov.in   या संकेत स्थळाचा वापर करून अ. जा, विजा,भज, इमाव व विमाप्र प्

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 2 व 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27:-   आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अर्थात मतदार प्रशिक्षण व सहभागीता कार्यक्रमांतर्गत (VVIP) Voter Verification and Information Programme अर्थात ‘मतदार पडताळणी व माहिती कार्यक्रम’ व्यापक पद्धतीने राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने शनिवार दि.2 व रविवार दि.3 मार्च रोजी   मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक   वैशाली माने यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया व तत्संबंधी माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती माने यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, SVEEP अंतर्गत VVIP राबवितांना यात सर्व नागरीकांमध्ये मतदार यादीतील नाव व तपशिल तपासणे, मतदार यादीत नाव नसल्यास त्याची नोंद करणे, एकापेक्षा अधिक नोंदी असतील, मयत व स्थलांतरीत असतील तर त्यांची वगळणी करणे, हेल्प लाईन नंबर व NVSP पोर्टलच्या सेवांबाबत स्वत:ला अवगत करुन

राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (Mahadbt) पोर्टल दि. 01.10.2018 पासून नव्याने कार्यान्वीत झाली असून https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळाचा वापर करून अ. जा, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रिशिप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत. सदर अर्ज   संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करून जिल्हातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेसाठी   सादर करण्यात यावेत. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून ऑनलाईन मान्यता देण्यात येईल. महाविद्यालय स्तरावरील शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परिक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत सद्यस्थितीत महाविद्यालय स्तरावर अद्यापही सुमारे 15% अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज संबंधित सहाय्

कोकण विभागीय व जिल्हा स्तरीय सरस 2019 27 फेब्रुवारी ते 3 मार्च रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- कोकण विभाग रायगड व ठाणे यांच्या संयुक्त विभागाने जिल्हस्तर 6 दिवसाचे विक्री व प्रदर्शन दि.27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधी मध्ये सिडको अर्बन हट, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, विशेष उपस्थिती ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे, विशेष अतिथी अवजड उद्योग विभाग केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,   वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुध्दे, कुमार केतकर. प्रमुख उपस्थिती विधानसभा सदस्य आम.प्रशांत ठाकूर, आम.सुरेश लाड, आम.मनोहर भोईर, आम.सुभाष पाटील, आम.भरतशेठ गोगावले, आम.अवधुत तटकरे, आम.र्धेर्यशील पाटील, आम.मंदा म्हात्रे, आम.किसन कथोरे, आम.बालाजी किणीकर, आम.संदिप नाईक, आम.शांताराम मोरे, आम.गणपत गायकवाड, आम.प्रताप सरनाईक, आम.महेश चौगुले, आम.नरेंद्र पवार, आम.सुभाष भोईर, आम.संजय केळकर, आम

मार्च महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दि.5 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन मार्च महिन्यात सोमवार दि.4 रोजी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने मंगळवार दि.5 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.4 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक सुट्टीच्या नंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या लोकशाही दिन मंगळवार दि. 5 मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी रायगड यांनी कळविले आहे. 0000

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवावा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.18(जिमाका)-   केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत पात्र शेतकऱ्यांनी आपल्या परिचयातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.             देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिकुटूंब सहा हजार रुपये वार्षिक सन्माननिधी देण्याच्या   प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा आज देशभरात शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या   गोरखपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला. यानिमित्त रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे व मुख्य सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी संवाद साधला.             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह   निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा   अधिक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, तहसिलदार (महसूल) विशाल दौंडकर,   कृषी उपसंचालक   तानाजी पावडे,