पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.2 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.2 रोजी दुपारी चार वा. कामोठे येथे आगमन व पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभारण्याच्या कामाचे भूमीपुजन. स्थळ : कोमोठे.  दु.साडेचार वा. वडाळ तलावाचे सुशोभिकरण कामाचे भूमीपुजन. स्थळ : बल्लाळेश्वर मंदिराजवळ.  सायं. पाच वा. नॅशनल पॅराडाईज सोसायटी ते गोदरेज स्काय गार्डन अं.भू.क्र.399 व राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (अ.भू.क्र.307) ते पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचे भूमीपुजन.  स्थळ : पनवेल रेल्वे स्थानक रस्ता यशोनगर सोसायटी समोर.  सायं.साडेपाच वा.प्रा.क्र.1033 अ येथे समाज मंदिर बांधकामाचे भूमीपुजन.  सायं.सहा वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण कामाचे भूमीपुजन.  सायं.साडेसहा वा. प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या बांधकामोच भूमीपुजन.  सायं.सात वा. पनवेल  येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक