Posts

Showing posts from March 14, 2021

चला होवू जलसाक्षर…!

  विशेष लेख क्र.12 दिनांक:-19 मार्च, 2021 वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.   पाण्याचा अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे कमी होत आहेत, त्यातच पावसाचे अत्यल्प प्रमाण, ऋतूमानातील अनिश्चित बदल यामुळे देशातील अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यावर मात करून पाण्याच्या बाबतीत भविष्यकाळ सुरक्षित करावयाचा असेल तर जलसंवर्धन व पाणीबचत ही काळाची गरज आहे. यासाठी “ जलसाक्षरता ” हा महत्त्वाचा घटक आहे.   आपणास ज्ञात आहेच की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे.     मानव जातीच्या कल्याणासाठी व सजीव सृष्टीच्या उत्कर्षासाठी पाणी हाच मूलभूत व अत्यावश्यक घटक आहे. यासाठी आता पाण्याचा काटकसरीने वापर, विहिरी-तलावाचे पुनर्भरण, पावसाचे पाणी साठविणे, उपलब्ध पाणी व पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब वापरात आणणे व त्याचे नियोजनपूर्ण जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. पाणी संवर्धनासाठी हे करूया:- Ø   बागेसाठी व शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर. Ø   सांडपाणी व्यवस्

जिल्ह्यात सुरु असलेल्या कोविड लसीकरण केंद्रांची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

    अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका)- संपूर्ण राज्यात शासनाकडून सामान्य जनतेसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे व त्यांच्या इतर आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासन ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवित आहे. जिल्ह्यात ज्या केंद्रावरुन लसीकरण मोहीम राबविली जात आहे, त्या केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे:-   जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग (2 केंद्र), उप जिल्हा रुग्णालय पेण, माणगाव, कर्जत,श्रीवर्धन (2 केंद्र), रोहा,   ग्रामीण रुग्णालय उरण, महाड, पोलादपूर, मुरुड, म्हसळा, चौक,   जेएनपीटी उरण, आर सी एफ हॉस्पिटल अलिबाग, खोपोली नगर परिषद, लायन्स हेल्थ क्लब अलिबाग. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पेण- वाशी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र, गडब प्राथमिक आरोग्य केंद्र, जिते प्राथमिक आरोग्य केंद्र. पनवेल - ने

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला कोविशिल्डचा दुसरा डोस

Image
  अलिबाग, जि.रायगड, दि.19 (जिमाका):- येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील विशेष लसीकरण कक्षात पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज शुक्रवार, दि.19 मार्च रोजी "कोविशिल्ड" लस चा दुसरा डोस घेतला.                 यावेळी   पनवेल महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका डॉ.आनंद गोसावी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय डॉ.सचिन संकपाळ,   पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पंडित, डॉ.नेहा गांगुर्डे, औषध निर्माण अधिकारी अनिल वायकर सहाय्यक मेट्रन ज्योती गुरव व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 000000

जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावर नियुक्त्यांचा मार्ग खुला-पालकमंत्री कु. आदिती तटकरे

  अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका)- रायगड जिल्हाधिकारी स्तरावर गट-क व गट-ड मधील पदाच्या प्रतिक्षायादीनुसार नगरपरिषदा/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याबाबत शासनाने मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे प्रतिक्षायादीनुसार प्रलंबित अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा मार्ग खुला झाला आहे.                जिल्हाधिकारी कार्यालयाकडील प्रतिक्षायादीनुसार अनुकंपा तत्वावरील साधारणत: 27 प्रस्ताव नियुक्तीसाठी प्रलंबित आहेत. संबंधित पात्र उमेदवार व त्यांच्या पालकांनी याबाबत राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे या विषयाकडे वैयक्तिक लक्ष देऊन जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार करण्यात आला.                   नगरविकास विभागाने दि.18 मार्च 2021 रोजी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी संबंधित नगरपरिषद/नगरपंचायती

रायगड जिल्ह्यातील गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत न करण्याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरेंनी ग्रामविकास मंत्र्याना दिले निवेदन

    अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका) :- जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हद्दीतील (गावे/वाडी) अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून खंडीत करण्यात आला आहे. यामुळे गावागावामध्ये चोरी- दरोड्यासारखे प्रकार उद्भवून त्यातून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ग्रामविकास मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांना महावितरण वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होऊ नये, याबाबत लक्ष देण्याविषयी निवेदन आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात दिले.        यावेळी रायगड जिल्ह्यातील सरपंच सोमनाथ ओझर्डे, शरद जाधव, अनिल ढवळे, संयोगिता गायकवाड आदी उपस्थित होते.     राज्यात कोविड परिस्थितीमुळे या ग्रामपंचायतींना वीजबील भरणे शक्य न झाल्याने राज्य विद्युत वितरण कंपनीकडून या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. थकीत वीजदेयके भरण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत ग्रामविकास विभागामार्फत आदेश निर्गमित करण्यात यावेत. तसेच ग्रामविकास विभागाकडून ऊर्जा विभाग व राज्य विद्युत वितरण कंपनीस थकीत विद्युत देयके भर

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार समितीचे गठन करणे बंधनकारक --जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील

  अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे बंधनकारक आहे.   त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्रायझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, विरतण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुशालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल इ. आस्थापनांनी आपल्या आस्थापनेत अंतर्गत तक्रार समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नीलपुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिससमोर, अलिबाग   (ई-मेल आयडी wcdora@gmail.com , दू.क्र.02141-225321) कार्यालयास तात्काळ सादर करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील कळविले आहे. ००००

महिला व बालविकास विभागाच्या योजनेसंबंधीच्या बनावट पोस्टकडे दुर्लक्ष करावे -- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील

  अलिबाग,जि.रायगड,दि.18(जिमाका) :- घरातील वय वर्षे 21 ते 70 या वयोगटातील ज्या कर्त्या व्यक्तीचे दि.01 मार्च 2020 ते दि. 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत निधन झाले आहे, अशा विधवा महिलांना महिला व बालविकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत रु.50 हजार प्रति लाभार्थी मिळतील, अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप या अॅपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला बालविकास विभागामार्फत राबविली जात नाही. या व्हॉट्सअप मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांनी केले आहे. ००००००

करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना ताप आलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट करुन घ्यावी

    अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका)- सद्य:स्थितीत राज्यामध्ये कोविड-19 या आजाराचा प्रादूर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यानुषंगाने जिल्हयामध्ये सर्व तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. जिल्हयामधील खाजगी रुग्णालयात, क्लिनिकमध्ये तापाचे रुग्ण तपासणीसाठी आले असता अशा रुग्णांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता याची नोंद घेवून त्यांना जवळच्या खाजगी, सरकारी कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याबाबत रुग्णांना सर्व खाजगी डॉक्टरांमार्फत सूचना देण्यात याव्यात. तपासणी नंतर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जवळच्या जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तात्काळ कळविण्यात यावे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती यांची देखील तात्काळ तपासणी करण्यात यावी. संबंधित बाधित रुग्ण अथवा संपर्कात आलेले नातेवाईक, व्यक्ती सहकार्य करीत नसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय डॉक्टरांना कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षांना केले आहे. ००००००

उद्योजक पिनाकीन पटेल व सौ.हिमा पटेल यांनी धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास रेफ्रिजरेटर,वॉशिंग मशीन व खुर्च्या देवून केले मोलाचे सहकार्य

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका)- प्राथमिक आरोग्य केंद्र ,धोकवडे, ता.अलिबाग येथे   आज कोविड लस घेण्यासाठी आलेले उद्योजक पिनाकीन पटेल व सौ. हिमा पटेल यांच्याकडून धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास 1 रेफ्रिजरेटर, 1 वॉशिंग मशीन, 20 खुर्च्या हे साहित्य सहकार्याच्या भूमिकेतून देण्यात आले. याकरिता ग्रामपंचायत सदस्या सौ. संजना संदेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.       यावेळी त्यांच्या समवेत   वैद्यकीय   अधिकारी डॉ. सुप्रिया वेटकोळी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी   उपस्थित होते. ००००००

आयसीआयसीआय बँक मिनी शाखेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उद्घाटन संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका)- आयसीआयसीआय बँकेच्या जिल्हाधिकारी मिनी शाखा कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते (दि.08 मार्च रोजी ) येथे करण्यात आले.                 यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, रिटेल शाखा बँकिंग प्रमुख श्री. राजेश राय, विभागीय प्रमुख सरकारी बँकिंग मुंबई श्री. ब्रजतोष सिंह, विभागीय प्रमुख रिटेल शाखा बँकिंग गौरव अरोरा, क्षेत्रीय प्रमुख अमोल कोहली, विभागीय प्रमुख(शासकीय) विजय देवराम ईळवे, विभागीय प्रमुख (विक्री) फ्रँकी डिमेलो,शाखा व्यवस्थापक,अलिबाग रुबी झा आदि मान्यवर उपस्थित होते.   सर्वसामान्य नागरिकांना या शाखेतून सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध असणार आहेत.   ०००००००

कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

              अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी   "महाडीबीटी फार्मर पोर्टल" (MAHA DBT) वर अर्ज करू शकतात, पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना ही शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कृषी योजनांचा लाभ व्हावा यासाठी शासनाने चौथ्यांदा ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी MAHA DBT पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज भरून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.               शेतकरी फलोत्पादन योजनेंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस,प्लास्टिक मल्चिंग तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा लागवड, डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरू लागवड, सिताफळ लागवड तसेच इतर फळबाग लागवड योजना, शेततळ्यातील पन्नी, सामायिक शेततळे तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत   ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बै

अलिबाग व पेण तालुक्यातील वाढीव धानखरेदी केंद्रावर भात खरेदी होणार लवकरच सुरु

        अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) : आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेली अभिकर्ता संस्था जिल्हा पणन अधिकारी रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-21 मध्ये जिल्हयातील अलिबाग व पेण तालुक्यातील 04 वाढीव धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी जिल्हयात पणन हंगाम 2020-21 मधील धान खरेदी करिता 36 खरेदी केद्रांना मंजूरी दिली असून त्या खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. या भात खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगाम दि. 01 ऑक्टोबर 2020 ते दि .31 मार्च 2021, रब्बी पणन हंगाम दि. 01 मे 2021 ते दि.30 जून 2021 हा आहे. भात खरेदी वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतच्या 7/12 उताऱ्याची व गाव नमुना 8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान / भरडधान्य खरेदी करण्यात येईल.   शेतकऱ्यां चे 7 /12 उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र , या वर्षाची पीक परिस्थिती ( पैसेवारी ) , पिकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले

    अलिबाग,जि.रायगड, दि.16,(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते.   तसेच त्याची निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते.   मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भाजीपाला पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.   त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठया प्रमाणावर वाढत आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे. रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे व पिक रचनेत बदल घडवून आणणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्