कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

 


            अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी  "महाडीबीटी फार्मर पोर्टल" (MAHA DBT) वर अर्ज करू शकतात, पोर्टल पुन्हा सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना ही शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कृषी योजनांचा लाभ व्हावा यासाठी शासनाने चौथ्यांदा ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी MAHA DBT पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज भरून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

             शेतकरी फलोत्पादन योजनेंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस,प्लास्टिक मल्चिंग तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा लागवड, डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरू लागवड, सिताफळ लागवड तसेच इतर फळबाग लागवड योजना, शेततळ्यातील पन्नी, सामायिक शेततळे तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत  ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, स्वयंचलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर,पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र,मळणी यंत्र, रोटावेटर, वखर या योजनांचा लाभ घेवू शकतात.

               यासाठी 7/12 ,8 अ, बँक पासबुक,आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

               तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक