Posts

Showing posts from February 21, 2021

नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी जनतेने शासनास सहकार्य करावे

  अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका) : खासगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याच्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपायोजना करण्याच्या उद्देशाने खाजगी डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे.   दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळ खोकला व ताप, सतत खोकला व रक्तमिश्रीत बेडका, सायंकाळी येणारा ताप, भूक मंदावणे, शरीराचे वजन कमी होणे, यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास अशी व्यक्ती संशयित क्षयरुग्ण समजली जाते. क्षयरोग निदान व उपचार करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, विविध पॅथॉलॉजी रुग्णालये, डॉक्टर्स तसेच क्षयरोगाची औषधे विक

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी कार्यक्षेत्र बदलाची नोंद संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी -- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार

                 अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण, यांचे कार्यक्षेत्र 11 तालुक्यांपुरते मर्यादित आहेत.   या 11 तालुक्यांपैकी 2 तालुके अलिबाग व पेण हे मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (MMRTA) कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत. इतर तालुके प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) रायगड मध्ये समाविष्ट आहेत. नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबईच्या दि. 24 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पेण व अलिबाग संपूर्ण तालुके MMRTA कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे या बदलाची नोंद ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांच्या परवान्यावर संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी. यासाठी त्याबाबत योग्य बदल करुन घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील परवाना शाखेशी संपर्क साधावा. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्यातर्फे सर्व नवीन ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी वाहनमालकांना ज्यांनी अद्याप परवाना घेतला नाही, अशा वाहनमालकांनी, कार्यक्षेत्राप्रमाणे विहित परवाना शुल्क भरुन परवाना घ्यावा. अन्यथा, वाहनांची नोंद

'दिलखुलास' कार्यक्रमात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग-3 झाला प्रसारित

  अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “ दिलखुलास ” कार्यक्रमात “ करोनाशी सामना करताना ” या विषयावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या विशेष मुलाखतीचा भाग--3 आज (दि.26 फेब्रुवारी) रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून प्रसारित झाला.                एकूण तीन भागातील ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून बुधवार,दि.24 फेब्रुवारी, गुरुवार, दि.25 फेब्रुवारी आणि शुक्रवार, दि.26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारित करण्यात आली. निवेदक प्रा. सुभाष कदम यांनी ही मुलाखत घेतली.               रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सुरू असलेल्या उपाययोजना, करोना काळात सरकारी आदेशांचे पालन, कंटेनमेन्ट झोन करताना उद्भवलेल्या अडचणी, करोना काळातील नवीन अनुभव अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली.     0000000

माणगाव शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची ग्वाही

Image
                 अलिबाग, जि.रायगड, दि.25 (जिमाका) : माणगाव   शहराच्या   विकासासाठी   आपण   कटिबद्ध   असल्याचे पालकमंत्री   कु.आदिती   तटकरे   यांनी   आज गुरुवार,   दि.25   फेब्रुवारी    रोजी      माणगाव    नगरपंचायत   हद्दीतील   विविध   विकासकामांच्या     भूमीपूजन   समारंभप्रसंगी   ग्वाही   दिली.           पालकमंत्री   आदिती   तटकरे   पुढे   म्हणाल्या   की, खासदार सुनिल तटकरे   यांनी   माणगाव   शहराच्या   विकासासाठी   गेल्या   अनेक   वर्षांपासून   जातीने   लक्ष   घातले   आहे. याची   जाणीव   ठेवून   मी देखील   माणगाव   नगरीच्या   विकासासाठी   प्रयत्नशील   आहे. माणगावकरांना   अभिप्रेत   असणारी   सर्वच   कामे   आपण   टप्प्याटप्प्याने   पूर्ण करू. शहरातील   मुख्य   रस्ते   असतील, अंतर्गत   रस्ते   असतील   , सामाजिक   सभागृह   असतील   यांसारखी   विविध   विकासाची   कामे   आपण   येणाऱ्या   काळात   निश्चितच   करू. शहरातील   भेडसावणाऱ्या   समस्यांच्या   निराकरणासाठी चालना   देण्याचे   काम   यापुढेही   आपण   करणार   आहोत.   जुने   माणगाव   येथील   मुख्य   रस्त्याचे   उर्वरित   कामही