Posts

Showing posts from June 18, 2023

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    अलिबाग,दि.23 (जिमाका) :- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि.24 जून 2023 रोजी  सकाळी 9.15 वा. मलबार हिल, मुंबई येथून रस्ते मार्गे खाजगी वाहनाने पनवेलकडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल येथे आगमन. सकाळी 10.30 वा. पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल. सकाळी 11.15 वा. महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज) पनवेल येथून रस्ते मार्गे पनवेलकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. मोदी @9प्रबुध्द नागरिक भेट कार्यक्रमास पनवेल येथे उपस्थिती व राखीव. दुपारी 12.30 वा. मोदी @9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत लाभार्थी मेळाव्याकरिता पनवेल येथे उपस्थिती. दुपारी 2 वा. पनवेल येथून रस्ते मार्गे मावळ, पुणे कडे प्रयाण. ००००००

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.23(जिमाका):- जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादीकरिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून  “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ”  करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.               ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय, राय

जंजिरा सैनिकी विश्रामगृहातील सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा

    अलिबाग,दि.23(जिमाका):- राज्यातील सर्व माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच राज्यातील/ जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता अलिबाग -गोंधळपाडा येथे ‘‘जंजिरा सैनिकी विश्रामगृह’’ कार्यरत आहे.  माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच इतर नागरीक यांना त्यांच्या सैन्यातील हुद्दयाप्रमाणे राहण्याचे दर आकारण्यात येतात.                   विश्रामगृहामध्ये अतिमहनीय, वातानुकूलित तसेच डॉरमेट्री कक्ष तसेच खानपान सेवा वाजवी दरामध्ये उपलब्ध आहे. विश्रामगृहाच्या आवारात खुला हॉलदेखील उपलब्ध आहे. हा हॉल तसेच कक्ष मुलांचे वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरी, कार्यालयीन बैठका इत्यादीकरिता उपलब्ध राहतील.       इच्छुक अभ्यागतांनी विश्रामगृहाच्या 9021273310, 9175062877  या मोबाईलवर संपर्क साधावा व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे. 000000000

शेतकऱ्यांसाठी पेरणी व आपत्कालीन पिक परिस्थितीतील नियोजनाबाबत कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

    अलिबाग,दि.23 (जिमाका) :-  भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. यावर्षी दि. 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले नाही. सद्य:स्थितीत दि. 21 जून 2023 अखेर सरासरी पर्जन्यमान 145.3 मिमी असून प्रत्यक्षात मात्र 16.7मिमी (सरासरीच्या 11.5 टक्के) पाऊस पडलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून दि.21 जून 2023 अखेर प्रत्यक्षात 1.98 लाख हेक्टर (1.30 टक्के) पेरणी झाली आहे.      महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून आगमनास विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पेरणी करताना काय दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन पिक परिस्थितीत काय नियोजन करावे, याबाबत कृषी मंत्री महोदयांनी, अपर मुख्य सचिव कृषी आयुक्त कृषी, सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणी भारतीय हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री. के.एस. हौसळीकर यांच्या समवेत दि.21 जून 2023 रोजी बैठक घेवून सर्व संबंधितांबरोबर चर्चा केली. त्यानुसार हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी प

स्वामित्व योजना (ड्रोनव्दारे गावठाण मोजणी) प्रकल्पाची केंद्रीय पथकाकडून तपासणी

    अलिबाग,दि.23(जिमाका):-  स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन हा महत्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीरीत्या सुरु आहे. या प्रकल्पास संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायती राज, भारत सरकार, दिल्ली चे अवर सचिव श्री. अविनाश चंदर तसेच त्यांचे सल्लागार श्री.शिवम रंजन, श्री.वात्सल्य मालवीय यांनी स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण ड्रोन भूमापन झालेले मौजे सागाव, ता.अलिबाग या गावाची पाहणी केली. येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे झालेल्या सर्व्हेचा ग्रामस्थांना काय लाभ झाला, याबाबत ग्रामस्थांचे मत जाणून घेतले.               यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद  श्री.राजेंद्र भालेराव, तसेच खंडाळा ग्रामपंचायत  चे ग्रामविकास अधिकारी श्री.शेखर बळी, उपसरपंच अशोक थळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष कलगुटकर हे उपस्थित होते.              उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला मालकी हक्काचा पुरावा मिळाल्यामुळे शासनातील विविध योजनांचा लाभ भविष्यात होईलच याबरोबरच हद्दीबाबत

लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 23 जूनच्या कॅम्प मध्ये सहभागी व्हावे -- कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने

    अलिबाग,दि.22 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी एम किसान) अंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, eKYC प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 20, 21 व 22 जून रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. अजूनही काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता दि.23 जून 2023 रोजी देखील विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने यांनी केले आहे.              राज्यात सद्य:स्थितीत जवळपास 10 लाख व 18 लाख लाभार्थीची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व eKYC करणे प्रलंबित आहे. केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात दि. 1 मे पासून मा. जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र यात फारसे यश येत नसल्याने कृषी आयुक्तांच्या दिनांक 15 जून 2023 रोजी च्या पत्र

मुरुड तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 995 हून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

  अलिबाग,दि.22(जिमाका):-   “ शासन आपल्या दारी ”  या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड-जंजिरा तहसिलदार कार्यालयामार्फत  दि.22 जून 2023 रोजी दरबार हॉल, मुरुड येथे शैक्षणिक दाखले, पीएम किसान योजना, ई-केवायसी, आधार सिडींग, रेशन कार्ड देणे असे विविध  प्रकारचे दाखले देण्यासाठी एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुरुड तालुक्यातील नागरिकांना दुय्यम शिधापत्रिका 475, उत्पन्न दाखले -130, वय व अधिवास दाखले 95, नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती 60, पीएम किसान ई-केवायसी 55, आयुष्यमान भारत कार्ड-48, आधार कार्ड 40, शिधापत्रिकेत नाव दाखल करणे 35, पॅन कार्ड 20, ई-श्रम कार्ड  15, शेतकरी दाखले 12,ई दाखले 10, अशा एकूण 995 दाखल्यांचे वाटप  करण्यात आले. यावेळी तहसिल कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, सेतू केंद्राचे कर्मचारी, CSC केंद्राचे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून कामकाज सुलभ होण्यासाठी सहकार्य केले.  तालुका प्रशासनाच्या

आदिवासी मुलांच्या नवीन पनवेल येथील शासकीय वसतिगृहाकरिता हवी भाडेतत्वावर इमारत

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह पनवेल (नवीन), ता.पनवेल, जि.रायगड, येथे सुरु असून आता पनवेल परिसरामध्ये या वसतिगृहातील 100 विद्यार्थ्यांना पुरेशी अशी सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत भाडेतत्वावर मिळणे आवश्यक आहे.      तरी अशा प्रकारची सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारत उपलब्ध असल्यास संबंधितांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड (02143 252519)  व गृहप्रमुख, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, पनवेल (नवीन), ता.पनवेल जि.रायगड (श्री.सोळसकर- 8275929569) कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव  दि.5 जुलै, 2023 रोजीपर्यंत सादर करावा,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पेण च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे. 0000000

"देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हाणी घाट" या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हरीतील  "देवकुंड धबधबा"  व सणसवाडी गावचे हद्दीतील  "सिक्रेट पॉईंट"  व  "ताम्हिणी घाट"  हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन 2017 पावसाळी हंगामात या ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील 4 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यूमुखी पडले होते. तसेच सुमारे 55पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीपात्रात अडकले होते. सन 2018 चे पावसाळी हंगामातदेखील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशाची मुदत संपल्यानंतर 3 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते व मृत्युमुखी पडले होते. सन 2022 मध्ये एक पर्यटक नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मयत झाला आहे. त्याचबरोबर सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अन

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड येथे कार्यरत आहे. वसतिगृहाकरिता सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या वसतिगृहात इयत्ता आठवी पासून पुढे शिकणात्या विद्यार्थिनीला गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाईल. शालेय- 30 जागा, इयता 11 वी 12 वी-15 जागा, व वरिष्ठ महाविद्यालय 15 जागा व व्यावसायिक - अभ्यासक्रमाकरिता -15 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, भटक्या जमाती इत्यादी संवर्गात इयत्ता आठवी पासून व भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया गोंड इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनींना इयत्ता 5वी पासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :- मागील इयत्तेची मार्कलिस्ट झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईट झेरॉक्स व विद्यार्थिनीचा 1 फोटो, तहसिलदाराकडील उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स (उत्पन्न अट SC,ST. 2 लाख 50 हजार व इतर जातीच्या विद्यार्थींनींना 1 लाख 50 हजार,  SC/ST/VJNT/OBC या प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता जाती

महाड येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड़, पंचशिल नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळ, ता. महाड येथे 100 मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. शासकीय वसतिगृहात गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. याबाबत आरक्षण अनुसूचित जाती 80 टक्के अनुसूचित जमाती 03 टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास 5 टक्के अनाथ- 3 टक्के, अपंग- 2 टक्के, असे आहे.  प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु.4 हजार शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.500 निर्वाहभत्ता, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाच्या दोन संचाकरिता गणवेष भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट/शैक्षणिक सहल भत्ता, अॅप्रन भत्ता ही वैशिष्ट्ये आहेत. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन

“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील प्रतिक्षायादीमधील ज्येष्ठतेनुसार उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्र प्रदान

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र  “ शासन आपल्या दारी ”  हा उपक्रम राबविण्यात येत आहे.   यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनाकडून नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिक्षायादीमधील ज्येष्ठतेनुसार काही उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नुकतीच देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर विकास शाखा) श्री.शाम पोशट्टी  यांच्या हस्ते माथेरान नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग वि.जा.अ.) या पदावर श्री.गोपाळ विष्णू चव्हाण, मुरुड नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग खुला) या पदावर श्री.संजय कृष्णा बामगुडे आणि महाड नगरपरिषद आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (प्रवर्ग खुला) या पदावर श्री.विशाल भाऊ नलावडे यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्र देण्यात आले. या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत संबंधित उमेदवारांनी शासनाचे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री.सर्जेराव मस्के-पाटील व जिल्ह

रायगड ‍जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 14 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्रांची तात्पुरत्या स्वरूपात करणार नियुक्ती

    अलिबाग,दि.22(जिमाका):-   प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रायगड ‍जिल्ह्यात 14 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. मासळी उतरविण्याची केंद्रांची नावे, सागरमित्र नेमणूकीबाबत अटी व शर्ती आणि कार्ये व जबाबदाऱ्या  खालीलप्रमाणे आहेत. मासळी उतरविण्याची केंद्रे:-   परवाना अधिकारी उरण कार्यक्षेत्र:-  1. उलवे-मोहा, 2. दिघोडे, 3. मोरावे-गव्हाण,   परवाना अधिकारी मुरुड कार्यक्षेत्र:-  4. न्हावे, 5. मुरुड, 6. राजपुरी, 7. आगरदांडा,   परवाना अधिकारी श्रीवर्धन कार्यक्षेत्र:-  8. वाशी, 9. कुडगाव, 10. आदगाव, 11. मेंदडी, 12. खरसई, 13. बागमांडला, 14.   शेखाडी,                अटी व शर्ती :-  शैक्षणिक पात्रता ही    कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा मधून उत्तीर्ण ही आहे. ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल, मत्स्यविज्ञान पदविका (Fisheries Diploma) 3 वर्षे उत्तीर्ण उमेदवार हा इयत्ता 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण समकक्ष ग्राह्य धरण्यात येईल व मत्स्यविज्ञान पदविका उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल,  वय 18 वर्षांपे

दिव्यागांना मदत करण्यासाठी पेण तालुका प्रशासन सदैव तत्पर --तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  शासन निर्णय दि.23 मे 2023 नुसार दिव्यांग कल्याण विभागामार्फत  “ दिव्यांगांच्या दारी ”  हे अभियान राबविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हे अभियान पेण तालुक्याच्या कार्यक्षेत्रात दि.6 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहे.  दिव्यागांना मदत करण्यासाठी पेण तालुका प्रशासन सदैव तत्पर   असल्याचे   तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी काल (दि. 21 जून) रोजी पेण येथे सांगितले.     दि.21 जून 2023 रोजी पेण तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशाबाबत तसेच दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी तालुक्यातील सर्व दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. या बैठकीत तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांच्या समस्या ऐकून त्यानुषंगाने धान्यवाटप व शिधापत्रिका संबंधित असलेल्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, अशा सूचना तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना तसेच संजय गांधी निराधार योजनेविषयी दिव्यांगांच्या काही सम

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  दैनंदिन धावपळीच्या कामकाजात आपल्या तब्बेतीची काळजी योग्य रीतीने घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अलिबाग पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक कर्मचारीवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शरीर व मन यांच्यात दुवा साधणारा मार्ग म्हणजे योग. ज्यामुळे आपल्याला नवचैतन्य प्राप्त होऊ शकते. प्रत्येकाने वेळात वेळ काढून कमीत कमी 10 मिनिटे हा योग साधना केली तरी आपल्या तब्बेतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतील, अशी माहिती यावेळी अलिबाग पोस्टमास्टर श्री.गजेंद्र भुसाणे यांनी दिली. यावेळी मुख्यालयाचे सहायक अधीक्षक श्री.सुनील पवार यांनी आजच्या योगशिबिराच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीच्या 5 हजार वर्षांच्या परंपरेला स्पर्श करू शकलो, असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी योगासनांच्या विविध प्रकारांबाबत निलेश पाटील, समीर म्हात्रे, मनोज अंबुरे यांनी उपस्थित कर्मचारीवर्गास माहिती दिली. या कार्यक्रमास सरिता म्हात्रे, मृणाल सावंत, अस्मिता पाटील, प्रभा राऊत या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. डाक अधीक्षक डॉ.

पेण तहसिल कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) अभिनव पुढाकार घेतला असल्याने भारताला योगाचा संदेश आणि फायदे जगभरात पोहोचविण्यात मदत झाली आहे. अमृत सरोवराचा शांत परिसर व पवित्र वातावरण योग्य उत्साहींना एकत्र येण्यासाठी, विविध आसनांचा सराव करण्यासाठी व योगाच्या सर्वांगीण अभ्यासामध्ये मग्न होण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. म्हणूनच अमृत सरोवर अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या अमृत सरोवराच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याबाबत शासनाचे निर्दश प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने पेण तालुक्यातील मौजे कांदळेपाडा येथील अमृत सरोवर या ठिकाणी दि.21 जून 2023 रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पेण उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार श्रीम. स्वप्नाली डोईफोडे, यांच्यासह योगप्रशिक्षक श्री. शेरमकर तसेच अन्य महिला प्रशिक्षक, ग्रामपंचायत कांदळेचे सरपंच व उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी व महसूल कर्मचारी यांनी मोठया संख्येनी सहभाग घेतला. यावेळी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व व आसनाचे प्रकार याविषयीची माहिती सर्वांना देण्यात

रोहा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    अलिबाग,दि.22(जिमाका):-  उपविभागीय अधिकारी कार्यालय, रोहा यांच्या वतीने दि.21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन तालुका क्रीडा संकुल धाटाव, रोहा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या योग शिबिरास योग प्रशिक्षक श्रीमती विभा चोरगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी जीवनात असलेले योगाचे महत्त्व सांगून योगाचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड, तहसिलदार श्री.किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.ससाणे, जाधव नर्सिंग होमचे श्री.अशोक जाधव, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल, लायन्स क्लब ऑफ रोहा, मेडिकल अँड चॅरिटेबल असोसिएशन यांचे प्रतिनिधी, रोहा व परिसरातील नागरिक, शासकीय अधिकारी/कर्मचारी, व्यावसायिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम व योगा यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली आणि नियमित व्यायाम, योगा करून आरोग्याकडे लक्ष देण्यासंदर्भात उपस्थितांना आवाहन केले. या कार्यक्रमासाठी यंग युनिटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमाव

“शासन आपल्या दारी..!” “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना

    कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने  “ शासन आपल्या दारी..! ”  हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.               या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या या लेखातून... शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने  “ प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ”  (PM- KISAN) योजना सुरु केली असून ही योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे.  ही योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.   वित्त मंत्री महोदयांच्य