दिव्यागांना मदत करण्यासाठी पेण तालुका प्रशासन सदैव तत्पर --तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे

 

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- शासन निर्णय दि.23 मे 2023 नुसार दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हे अभियान पेण तालुक्याच्या कार्यक्षेत्रात दि.6 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. दिव्यागांना मदत करण्यासाठी पेण तालुका प्रशासन सदैव तत्पर असल्याचे तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी काल (दि. 21 जून) रोजी पेण येथे सांगितले.

 

 

दि.21 जून 2023 रोजी पेण तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशाबाबत तसेच दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या बोलत होत्या.  

यावेळी तालुक्यातील सर्व दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

या बैठकीत तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांच्या समस्या ऐकून त्यानुषंगाने धान्यवाटप व शिधापत्रिका संबंधित असलेल्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, अशा सूचना तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना तसेच संजय गांधी निराधार योजनेविषयी दिव्यांगांच्या काही समस्या असल्यास त्या समस्यांचे व अनुदान वाटपामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणींचेही तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

 यावेळी दिव्यांग संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते श्री.भालचंद्र भगत यांनी त्यांच्या मनोगतात तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे व त्यांचे सर्व कार्यालयीन कर्मचारी दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच ते दिव्यागांना नेहमीच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करतात, असे सांगून प्रशासनाचे आभार मानले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक