Posts

Showing posts from March 5, 2017

महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे

Image
महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक                          --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे अलिबाग(जिमाका), दि.9:- महिला संरक्षण विषयक असलेले कायदे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून योग्य त्यावेळी त्यांना त्याचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला  पोलिस उप अधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,जेष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या ॲड.निहा राऊत, ॲड.महेश ठाकूर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.             मार्गदर्शन करतांना, डॉ. गोटे पुढे म्हणाले की, सध्या महिलांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीचे चुल आणि मूल हे बंद झाले असून पुरुषांच्या बरोबरीने महिला समाजात वावरत आहेत. त्यामुळे ही कार्यशाळा

जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

Image
वृत्त क्र.132                                                                       दिनांक :- 8 मार्च 2017 जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम अलिबाग (जिमाका)दि.8:-जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय रायगड अलिबाग यांच्यावतीने अलिबाग तालुक्यातील आगरसुरे ग्राम पंचायत कार्यालय येथे शासकीय उपक्रमांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साकारण्यात आला.           यावेळी आगरसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी भोईर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती प्रणिता गोंधळी, माहिती अधिकारी विष्णू काकडे, ग्रामसेवक जयेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे हिरामण भोईर, जयंत ठाकूर तसेच अन्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माहिती अधिकारी विष्णू काकडे यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाची माहिती दिली. तसेच महिला बचत गट, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाविषयी व मुद्रा कार्ड योजनेविषयी माहिती दिली. या विविध योजनांचा

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                              वृत्त क्र. 129  जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा  अलिबाग, दि.08 (जिमाका) :-      राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आज जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद अलिबाग  येथे सर्वोत्कृष्ट आशा  व  व गट प्रवर्तक पुरस्कार सोहळा तसेच आरोग्य  संस्थांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या आरोग्य सेविका, एल.एच.व्ही. व स्टाफ नर्स यांना गौरविण्यासाठी  फलोरेन्स नाईटींगगेल पुरस्कार सोहळा  आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळयास रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती प्रियदर्शनी पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप विभाग डॉ. खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, तसेच हि

जिल्हयात महिला दिन उत्साहात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम

Image
दिनांक :- 08/03/2017                                                                                                    वृ.क्र 125                                                                              जिल्हयात महिला दिन उत्साहात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम           अलिबाग दि.08 (जिमाका), जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्हयात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी सर्व उपस्थितांना महिलांचा सन्मान व आदर करण्याबाबत शपथ दिली.             यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रसाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जेष्ठ विधीज्ञ ॲड.प्रविण ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर व इतर मान्यवर उपस्थित होते.   शपथ मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलां-मुलींमध्ये कोणत्या

मुद्रा कार्ड योजना अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                                     वृत्त क्र.124 मुद्रा कार्ड योजना अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा                           -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले                         अलिबाग दि. 8 (जिमाका):- स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या अधिकाधिक होतकरु उद्योजकांपर्यंत   मुद्रा बँक योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रसार व प्रसिध्दी समन्वय समितीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा मुद्रा बँक समन्वय समिती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या मुद्रा बँक समन्वय समितीची बैठकीत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, समिती सदस्य-सरकारी वकील ऍ़ड प्रसाद पाटील,  जिल्हा नियोजन अधिकारी तथा समिती समन्वयक सुनिल जाधव, समिती सदस्य जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्र.अ. आर.पी.बघे,   बी.एस.पोळ तस

केबल नेटवर्क सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                                 वृत्त क्र. 123 केबल नेटवर्क सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न  अलिबाग, दि.08 (जिमाका) :-     जिल्हास्तरीय खाजगी दूरचित्रवाणी ( केबल नेटवर्क) संनियंत्रण समिती पुनर्गठित करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,    खाजगी दूरचित्रवाणी संनियंत्रण समिती श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच समितीचे सदस्य हर्षद कशाळकर, डॉ.मेघा घाटे, ऍ़ड. स्मिता काळे, प्र.प्राचार्य संजीवनी नाईक,  पदसिध्द सदस्य- जिल्हा पोलीस अधिक्षक   रायगड यांचे प्रतिनिधी पोलिस निरीक्षक,पी. बी. गोफणे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले या बैठकीत  मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, जिल्हयातील केबल नेटवर्कव्दारे दाखविण्यात येणारे कार्यक्रम, बातमी या आक्षेपार्ह असल्यास किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वाटल्यास याबाबत समितीने दखल घ

स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान

Image
वृत्त क्र.123                                                                         दिनांक :- 7 मार्च 2017 स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान           अलिबाग दि.07 (जिमाका) स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने घर तेथे शौचालय या उपक्रमाद्वारे हागणदारीमुक्त गाव मोहिमेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट काम केलेल्या महिला सरपंचांना केंद्र शासनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुजरात, गांधीनगर येथे महिला मेळावाकरीता निमंत्रित केले आहे. स्वच्छतेच्या या गुजरात दौऱ्यांकरीता रायगड जिल्हयातील 31 महिला सरपंच रवाना झाल्या आहेत.           सदर महिलांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पी.एम.साळुंके, पेण चे गट विकास अधिकारी सी.पी.पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील उपस्थित होते.            यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंके म्हणाले की, आपले गाव हगणदारी मुक्त होणेसाठी महिला सरपंचांनी दिलेल्या योगदानाची शासनाने द

महा आधार सीडींग मेळावा 16 मार्च रोजी जिल्ह्यात आयोजन

वृत्त्‍ क्र.121                                                                             दिनांक :- 7 मार्च 2017 महा आधार सीडींग मेळावा 16 मार्च रोजी जिल्ह्यात आयोजन बँक खाते आधारकार्डशी सलग्न करणार                                                             --- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग (जिमाका)दि.7:- जिल्ह्यातील बँकामधील सर्व खाती आधारकार्डशी सलग्न (सीडींग) करण्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी बँक आणि इतर बँकांनी  गुरुवार दि. 16 मार्च 2017 रोजी महा आधार सीडींग मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.           या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर,निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, नोडल अधिकारी अजय सावंत तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी   उपस्थित होते.           शासनाच्या निर्देशानुसार शासकीय योजना व सवलतींचा लाभ आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे ब

उष्माघात ? काय करावे ?

लेख क्र.11                                                                                                   दिनांक :- 7 मार्च 2017 उष्माघात ? काय करावे ? उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काही  उपाययोजना आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होऊ शकतो. यासाठी काय करावे व काय करु नये या बाबींकडे थोडे लक्ष द्यावे आणि आपले आरोग्य सांभाळावे. आपल्या आरोग्याची काळजी  घेणे आपल्याच हाती असते. केवळ आपलेच कुटूंबिय नव्हे तर आपले हितसंबंधी आणि पर्यायाने संपूर्ण समाज्याची  जबाबदारी   कळत नकळत आपल्यावर येते.   तेंव्हा थोडी काळजी  घेणे गरजेचे आहे. काय करावे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे सांगतांना अगदी साध्या बाबी सांगितल्या आहेत. यात  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. तसेच हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.बाहेर जाताना गॉगल्स्, छत्री,टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. आपण जर उन्हात

जागतिक महिला दिना निमित्त महिला मतदार साक्षरता दिवस

लेख क्र.12                                                                                          दिनांक :- 7 मार्च 2017 जागतिक महिला दिना निमित्त  महिला मतदार साक्षरता दिवस 8 मार्च 2017 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र साजरा होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून या वर्षी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशांप्रमाणे रायगड जिल्हयात सर्व  विभागीय स्तरावर व तालुका स्तरावर  महिला मतदार साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या विषयाची माहिती देणारा लेख…. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे येत्या 8 मार्च,2017 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महिलांना लोकशाही प्रक्रीयेमध्ये  सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी महिलांच्या उन्नतीकरीता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला कल्याण अधिकारी, आरोग्य विभागातील परिचारिका आणि शिक्षिका यांचे तसेच इतर अशासकीय  वा शासकीय संस्था / महामंडळ (माविम सारख्या) यांचे सहकार्य घेऊन हे काम केले जाणार आहे.             या निमित्त् रायगड जिल्हयात

दिलीप पांढरपट्टे यांना पी.एच.डी. रायगड जिल्हयातील भूसंपादनावर संशोधन

Image
दिनांक :-7 मार्च 2017                                                                 वृत्त क्र.119  दिलीप पांढरपट्टे यांना पी.एच.डी. रायगड जिल्हयातील भूसंपादनावर संशोधन  अलिबाग, दि.07 (जिमाका) :-    धुळे जिल्हयाचे जिल्हाधिकारी  तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी,  दिलीप पांढरपट्टे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने नुकतीच पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.  रायगड जिल्हयातील सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनांचे सामाजिक -आर्थिक परिणाम या विषयावर डॉ. पांढरपट्टे यांनी संशोधन करुन प्रबंध सादर केला होता. त्यास समाजशास्त्रातील विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. या संशोधनासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील समाजशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. विजय मारुलकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सन 1981 ते सन 2014 या कालावधीत बी.एस.सी., बी.एड, एल.एल.बी., एल.एल.एम., एम.बी.ए. अशा विविध शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाम

रायगडची दंगल क्वीन कुस्ती पट्टू समिक्षा कटोर

Image
दिनांक :- 6 मार्च 2017                                                           लेख क्र.09 रायगडची दंगल क्वीन कुस्ती पट्टू समिक्षा कटोर                         कुस्ती हा खेळ  पुरुषांचा समजला जाणारा असला तरी रायगड जिल्ह्यातील समिक्षा किसन कटोर या मुलींने या कुस्ती क्षेत्रात आपली हुकूमत गाजवली आहे.  राष्ट्रीय पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  तिच्या कुस्तीच्या कामगिरीकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप… दंगल चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.  यात महिला कुस्तीपट्टूवर एक वेगळा  प्रकाश  टाकण्यात आला.  महिला कुस्तीपट्टू संदर्भात जनसामान्यात चर्चा सुरु झाली.  हे जरी या चित्रपटाने  घडले असले तरी यापूर्वीपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील नवेदर-नवगावची युवा कुस्तीपट्टू समिक्षा किसन कटोर कुस्ती क्षेत्रात आपल्या कामगिरीने अनेकांच लक्ष वेधून घेत होती.   समिक्षाचे वडील किसन कटोर हे कुस्तीपट्टू. वडीलांची कुस्तीमधील कामगिरी बघून समिक्षाला सुध्दा कुस्ती खेळाची प्रेरणा मिळाली. मुलीची आवड लक्षात घेता त्यांनीही तिच्याकडून कठोर परि

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर

Image
दिनांक :- 6 मार्च  2017                                                           लेख क्र.8 शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भगिनी योगिता व दिपाली शिलधनकर                राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती हा मानाचा क्रीडा  पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या रायगडच्या कन्या योगिता व दिपाली शिलधनकर भगिनीं. सायकलिंग सारख्या आगळया-वेगळया क्षेत्रात या दोघींनीही कमी वयात कौतुकास्पद कामगिरी करुन उज्वल यश मिळविले आहे.  त्यांच्या या सायकलिंग क्षेत्रातील कामगिरीवर टाकलेला एक अल्पसा दृष्टीक्षेप….  रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यामधील सासवणे गावातील योगिता व दिपाली शिलधनकर या दोघी भगिनी.  या दोघींनाही सायकलिंग मध्ये राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.  मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण दोघींसाठीही समर्पक.   लहानपणापासून दोघींनाही खेळाची  हौस आणि हीच हौस पुढे आवड झाली.     सासवणे येथे महाशिवरात्री निमित्त विविध स्पर्धा आयोजित  केल्या जातात.  त्यात 2006 यावर्षी  सायलिंकची स्पर्धा जाहीर झाली आणि त्यात दोघींनीही भाग घेत

पॉवर वुमन-ज्योतिका पाटेकर

Image
दिनांक :- 6 मार्च 2017                                                           लेख-क्र.10   पॉवर वुमन- ज्योतिका पाटेकर आपल्या आशा आकांक्षा जपत  कर्तव्याच्या ओझ्याखाली न दबता जिद्द, ध्येय व मेहनत यांच्या जोरावर  मुलांची व कुटुंबाची जबाबदारी घेत पॉवर वुमन म्हणून नावारूपास येण्याची किमया ज्योतिका पाटेकर यांनी वयाच्या 48 व्या वर्षी केली आहे.   26 वर्षाच्या मोठ्या थांब्यानंतरचा ज्योतिका पाटेकरांचा आपल्या लेकी सोबतचा प्रवास रंजक आहे.   मायलेकींची कहाणी आजच्या समस्त महिला वर्गालाच काय पण विशीच्या तरुणींनाही स्फूर्तीदायक   आहे.            दंगल या अमिर खानच्या चित्रपटात कुस्ती खेळासाठी व देशाला या खेळात गोल्डमेडल मिळवून देण्यासाठी आपल्या मुलींना घडविण्यास होणारी पालकांची धडपड, तगमग संपूर्ण देशाने पाहिली व स्विकारली.   तर आपल्या चिमुकलीचे भविष्य उज्वल होण्यासाठी पालक वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असल्याच्या अनेक घटना आहेत.  अशा प्रकारच्या या घटनांनाही मागे सारणारी अनोखी किमया रायगडाच्या ज्योतिका पाटेकर या हिरकणीने केली आहे. शालेय व महाविद्यालयी