जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा

दिनांक :- 8 मार्च 2017                                                              वृत्त क्र. 129
 जागतिक महिला दिनानिमित्त
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा

 अलिबाग, दि.08 (जिमाका) :-     राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आज जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद अलिबाग  येथे सर्वोत्कृष्ट आशा  व  व गट प्रवर्तक पुरस्कार सोहळा तसेच आरोग्य  संस्थांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या आरोग्य सेविका, एल.एच.व्ही. व स्टाफ नर्स यांना गौरविण्यासाठी  फलोरेन्स नाईटींगगेल पुरस्कार सोहळा  आयोजित करण्यात आला होता.
सदर सोहळयास रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती प्रियदर्शनी पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप विभाग डॉ. खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, तसेच हितेश जाधव आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये  जिल्हयातील 15 तालुक्यांत आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या  प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील 52 आशा स्वयंसेविका, तसेच सर्वोत्कृष्ट  30 आशा स्वयंसेविका व जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट 2 आशा स्वयंसेविका आणि नाविण्यपूर्ण कामगिरी  करणाऱ्या सर्वोत्कृष्ट 2 आशा स्वयंसेविकांना याखेरीज जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट 3 गट प्रवर्तकांना , जिल्हयातील विविध आरोग्य संस्थांमध्ये  सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 आरोग्य सेविका, 3 एल.एच.व्ही. व 3 स्टाफ नर्स यांना फलोरेन्स नाईटींगेल या पुरस्काराने  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना डॉ.दिनेश पेंढारकर,कर्करोग तज्ञ यांनी कॅन्सर विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले.

                                                0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक