Posts

Showing posts from May 15, 2022

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दिली शपथ

Image
अलिबाग, दि.20 (जिमाका):-  दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात तहसिलदार विशाल दौडकर यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

“हॅम रेडिओ” चा वापर आपत्ती काळात योग्यच - तहसिलदार मीनल दळवी

Image
  अलिबाग, दि.20 (जिमाका):-  आपत्ती काळात मोबाईल यंत्रणा बंद पडल्यास  “ हॅम रेडिओ ” चा वापर करून तातडीने आपत्ती व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यासोबत आपण वित्तहानी, मनुष्यहानी, आग, अपघातही  “ हॅम रेडिओ ” चा वापर केल्याने टाळू शकतो, असे अलिबाग तहसिलदार मीनल दळवी म्हणाल्या. अलिबाग तहसील कार्यालय येथे रायगडचा युवक फाउंडेशनतर्फे हॅम रेडिओच्या वापराबाबत आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी प्रात्यशिक आयोजित केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजित टोळकर, सोबत हॅम रेडिओ परवानाधारक रायगडचा युवक फाऊंडेशनचे खजिनदार सत्यम पाटील, आपत्ती व सुरक्षा मित्र मंगेश राऊत, प्रथमेश भगत हे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून तहसिलदार मीनल दळवी व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांच्यासोबत अलिबाग तहसील कार्यालय येथे संवाद साधत होते. तर आपत्ती व सुरक्षा मित्र तथा हॅम परवानाधारक दिलीप बापट हे हॅम रेडिओ कंट्रोल चेंढरे मधून देत होते. यावेळी मॉकड्रील करताना तहसिलदार मीनल दळवी यांनी वायरमन यांना आदेश देताच जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारा

समर्पित आयोगाच्या भेटीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

अलिबाग, दि.20 (जिमाका):-  नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गठित समर्पित आयोग दि.25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देणार आहे. या भेटीदरम्यान नागरिक, संस्थांची मते जाणून घेणार असून निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगर पालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देणार आहे. हा आयोग कोकण भवन येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 02.30

प्लास्टिक बंदीसाठी सरसावले काशीद.. जनजागृती अभियान संपन्न

Image
अलिबाग, दि.18 (जिमाका):-  रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायती व अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगातून जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.  “ आम्ही ”  संस्था, मुंबई यांच्या वतीने काशीद बीचवर नुकताच प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती मेळावा संपन्न झाला. यावेळी काशीद च्या सरपंच सौ.नम्रता कासार, मुरुडचे गटविकास अधिकारी श्री.सुभाष वाणी,  “ आम्ही ”  संस्थेच्या प्रमुख श्रीमती परेरा व श्रीमती किरण पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड म्हणाले, नागरिकांनी सवयी बदलून ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, शिवाय प्लास्टिक खाल्ल्याने समुद्रातील मासे व जनावरेही मृत होतात, हे सर्व दुष्परिणाम आटोक्यात आणण्यासाठी काशीदचे ग्रामस्थ,  “ आम्ही ”  संस्था व पर्यटक यांच्या एकत्रित प्रयत्नातून प्लास्टिक बंदीचा उपक्रम यशस्वी करून काशीदचा वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राब

चालू वर्षी 01 जून ते 31 जुलै 2022 या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

  अलिबाग,दि.18 (जिमाका):-   महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी दि.01 जून 2022 ते दि.31 जुलै 2022 (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे. या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब / वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमा

तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीयपंथीयांसाठी “पाठ्यवृत्ती”

Image
इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवाविण्याचे  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन   अलिबाग,दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यात विविध प्रयत्न करीत आहे. तृतीयपंथीयांचे गुरु, दयार यांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करीत आहे. एक वर्षे कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी दि.10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7 या गुगल अर्जावरील माहिती भ