Posts

Showing posts from January 22, 2017

पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा

Image
पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा             अलिबाग दि.26, (जिमाका) राज्याचे स्वच्छता दूत जेष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्मश्री हा सन्मान पुरस्कार घोषित केला. त्यामुळे आज  रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले तसेच जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवंदडा येथे भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.                         यावेळी सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी, श्रीमती नार्वेकर तसेच  अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (सामान्य) जयराज देशमुख, अजित नैराळे, अलिबाग तहसिलदार प्रकाश संकपाळ आदि अधिकारी उपस्थित होते. 000000

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न

Image
दिनांक :-26 जानेवारी 2017                                                                         वृत्त क्र.57 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न         अलिबाग दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. अविनाश गोटे, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.              जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांच्या संघटीत प्रयत्नाने आपले भारतीय प्रजासत्ताक अधिक सक्षम होईल अशी आशा व्यक्त केली.             यानंतर पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस पथक, जिल्

मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 24/01/2017                                                                                                  वृत्त क्र. 46 मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे                                                       --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.24 :- (जिमाका) जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शिक्षक मतदार संघात होणारी निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी  तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे, अश्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.  जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात  आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर,  अतिरिक्त  मुख्य   कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उप

वाहन चालविणे हे एक व्रत - जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे

Image
दिनांक:- 23/01/2017                                                                                                     वृत्त क्र.44 वाहन चालविणे हे एक व्रत - जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे अलिबाग दि.23 (जिमाका) कोणतेही वाहन चालविताना जेव्हा आपण त्याचा परवाना घेतो. त्यावेळी चालक होणे हे एक व्रत आहे, असे समजून त्याचा स्विकार करावा व हे व्रत सदोदित अंगीकारावे. यामुळे  स्वत:ची व समाजाची सुरक्षा राखली जाईल असे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी आज पनवेल कळंबोली येथे केले. कळंबोली येथील परिवहन विभागाच्यावतीने आयोजित 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या सांगता समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, तसेच परिवहन अधिकारी दिपक उगले आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.                 पुढे मार्गदर्शन करताना प्रा.दवणे म्हणाले की, रस्ता सुरक्षा हा  केवळ सप्ताह अथवा पंधरवड्याचा विषय नसून तो कायम स्वरुपी गांर्भीयाने घेण्याचा विषय आहे. कोणतेही