Posts

Showing posts from March 24, 2024

नोंदणी व मुद्रांक विभागाची जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरु

  रायगड,दि.27(जिमाका):-  नोंदणी व मुद्रांक विभागाचे रायगड जिल्यायातील सर्व नोंदणी कार्यालये मार्च अखेरच्या दि. 29 मार्च, दि.30 मार्च व दि.31 मार्च 2024 या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सूचना आहेत.   दि.1 एप्रिल 2024 पासून नवीन (सुधारित) बाजारमूल्य दर तक्ते लागू होत असतात. त्यामुळे  दस्त नोंदणीची वाढती संख्या विचारात घेता होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीकांत सोनवणे यांनी कळविले आहे. ००००००००

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

Image
    रायगड(जिमाका)दि.27:-रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची पूर्व तयारी जोमाने सुरु आहे. विविध पातळ्यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज रायगड लोकसभा मतदार संघातील 192-अलिबाग या विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.              यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई सांळुखे आदी उपस्थित होते.              श्री.जावळे म्हणाले भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्

अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणीचे कामकाज दि.1 एप्रिल 2024 पासून मौजे जिते येथे होणार सुरु

  रायगड,दि.27(जिमाका):-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयास गट नं.28/1 मौजे जिते या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून दि.23 मार्च 2024 रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहाळा संपन्न झाला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुख्यालय जुनी इमारत विकासस्मृती व पेण-खोपोली बायपास रोड येथे सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथे हलविण्यात येणार आहे. पेण-खोपोली बायपास रोड येथे करण्यात येणारी अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी इत्यादी सर्व प्रकारचे कामकाज दि.1 एप्रिल 2024 पासून मौजे जिते येथे नवीन कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात करण्यात येणार आहे. तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. सर्व वाहन मालक, चालक तसेच नागरिकांना या बदलाबाबत अवगत करण्यात येत असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मौजे जिते येथील नवीन इमारतीत सर्व कामकाज सुरळीत होईपर्यं

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांचे निर्देश

  रायगड(जिमाका)दि.26:-  रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व  अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी.  आवश्यकते नुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; शासन परिपत्रक जारी

  रायगड जिमाका दि. 26- राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. 19 एप्रिल, दि. 26 एप्रिल, दि. 07 मे, दि. 13 मे व दि. 20 मे, 2024 अशा पाच टप्प्यात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे,