Posts

Showing posts from December 3, 2017

मानवी हक्कांबाबत जनजागृती आवश्यक -न्या.बी.सी.कांबळे

Image
                                              अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -मानवी हक्काचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे मानवी हक्काची माहिती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.त्यासाठी मानवी हक्का बाबत जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश (1) बी.सी.कांबळे यांनी आज येथे केले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.              यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती प्रेमलता जैतू,   तहसिलदार एन.बी.लोखंडे, नायब तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे, कारागृह निरीक्षक आबासाहेब पाटील तसेच शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.              आपल्या मार्गदर्शनात न्या.कांबळे म्हणाले की, जे मानवाला नैसर्गिकरित्या मिळालेले आहे ते करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच मानवी हक्क आहे. मनुष्याच्या काम करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिकचे काम देणे किंवा त्याच्या नैसर्गिक प्राप्त     झालेल्या हक्काला बाधा पोहोचविणे म्हणजेच मानवी हक्काचे उ

कुडे शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह;तिघे संशयित ताब्यात

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8 - माणगांव वनपरिक्षेत्रात  येणाऱ्या  मौजे कुडे ता. तळा या गावच्या शिवारात सोमवार दि.4 रोजी बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. या संदर्भात उपवनसंरक्षक रोहा यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, वनपाल तळा  यांना सोमवार दि.4 रोजी सायंकाळी  दुरध्वनी संदेशाव्दारे माहिती मिळाली की,  मौजे.कुडे ता.तळा येथील श्री.विरेन वेदशरण छाब्रा यांचे मालकी सर्व्हे नंबर 93  चे क्षेत्रात एका  बिबट्याचा मृत देह आढळून आला आहे. सदर बातमी मिळाल्यावरुन त्या ठिकाणी क्षेत्रीय वनकर्मचारी तात्काळ पोहोचले व त्यांनी सदर घटनेबाबत वन्यजीव (संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 9,39 (अ), (ब), (ड) ,39(2),44 (क) अन्वये घडलेल्या घटनेचा प्रथम अपराध प्रतिवृत्त नोंदविले. घटना स्थळाच्या  पंचनाम्यात सदर बिबट नर जातीचा आढळून आला. तसेच  त्याच्या पंजातील नखे काढुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तदनंतर  सदर मृत बिबट्यास शवविच्छेदन कामी  Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur, Department of Veterinary Pathology, Bombay Veterinary College, Parel , Mumbai-

सामाजिक न्याय विभाग योजना संदेशांचे बसस्थानकांवरुन प्रसारण;आ.पंडितशेट पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8 - सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांच्या संदेशाचे प्रसारण जिल्ह्यातील बसस्थानकांवरुन करण्याच्या कामाचा शुभारंभ आज अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना ह्या मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी असतात. या योजनांचा अधिकाधिक प्रसार होऊन त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बसस्थानकांवरुन ध्वनीप्रक्षेपकामार्फत या संदेशांचे प्रसारण आजपासून रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आले. अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते या  उपक्रमाचा शुभारंभ आज अलिबाग बसस्थानकावर करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे,  अलिबाग बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक शंकर प्रकाश यादव, वृत्ती सोल्युशनचे  नरेंद्र पाटील, अमोल चौधरी, रफिक उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर  संगणकावरील ध्वनीक्षेपण यंत्रणा

ध्वजदिन निधी संकलन हे राष्ट्रीय कार्य-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
सशस्त्र सेना ध्वजदिन 2017 निधी संकलन शुभारंभ माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांची विशेष उपस्थिती अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8 - प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या विरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या विरांसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आणि नागरिकांनी हे स्वतःचे कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले .             रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2017 संकलन शुभारंभ कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.  यावेळी माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास  यांची विशेष  उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, अल

सशस्त्र सेना ध्वजदिन -2017 :निधी संकलन शुभारंभ 8 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7 :- सशस्त्र सेना ध्व्जदिन -2017 निधी संकलन शुभारंभ सोहळा शुक्रवार दि.8 रोजी सकाळी साडे दहा वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी   तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती रायगड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली     संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव (नि.) यांनी कळविले आहे. 0000

मुरुड येथून युवक बेपत्ता

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 - उत्तरप्रदेश येथील मैनुद्दीन शहाबुद्दील खान  वय 30 रा पिठनी, तहसिल नवगड,जि.सिद्धार्थनगर,राज्य सध्या रा. मनिष विरकुड  यांची चाळ, मुरुड येथून  दिनांक 20 सप्टेंबर 2015 रेाजी सकाळी नऊ  वाजता त्याचा रुम पार्टनर मुहम्मद् इलियास  याला राजपुरी येथे कामाला जात आहे असे सांगून निघून गेला तो आजतागायत परत आला नाही.  तसेच त्याचा मुरुड शहरात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु आजपर्यंत तपास लागला नाही असे मैनुद्दीन शहाबुद्दील खान  यांचे मेहूणे मोहमद फारुख खान यांनी मुरुड पेालीस ठाणे येथे तक्रार नोंदविली आहे.  त्याचे वर्णन याप्रमाणे- मैनुद्दीन शहाबुद्दील खान हा अंगात मध्यम , रंग निमगोरा, उंची 155 से.मी.   अंगात नेसूस नीळया  रंगाची जिन्स्,सफेद फुलशर्ट, नाक सरळ, भाषा इंग्रजी,हिंदी व मराठी आहे. 20 सप्टेंबर 2015 रेाजी हरवला आहे. तरी  मैनुद्दीन शहाबुद्दील खान  कुठे मिळाल्यास किंवा दिसल्यास 8308718760 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे पोलीस निरिक्षक  मुरुड पोलीस ठाणे यांनी कळविले आहे. ०००००

राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- राज्यमंत्री जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य ना.विजय शिवतारे हे दिनांक  7 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा याप्रमाणे. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी चार वाजता खोपोली जि.रायगड येथील गगनगिरी आश्रमाच्या पाणीपुरवठा व इतर मुलभूत सुविधांबाबत बैठक. स्थळ :- गगनगिरी आश्रम, खोपोली, जि.रायगड. बैठकीनंतर गगनगिरी आश्रम, खोपोली जि.रायगड येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण. 000000

जिल्हा रुग्णालयामार्फत एचआयव्ही जनजागृती

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- जागतिक एड्स नियंत्रण दिन ( 1 डिसेंबर)  व पंधरवाड्यानिमित्त जेएसडब्ल्यु कंपनी लेबर कॉलनी,   डोलवी, ता. पेण,   जि.रायगड   येथे   एचआयव्ही एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   जेएसडब्ल्यु येथील लेबर कॉलनी येथे उदघाटन व    डिजिटल मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे अनावरण   करून   कंपनीच्या विविध विभागामध्ये   मोबाईल आयसीटीसी व्हॅन   फिरवून   एकूण 6000 लोकांपर्यंत पोहोचून   जनजागृती करण्यात आली.   इच्छुक 721 व्यक्तींचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात   आली. तसेच त्यांची सिफिलिस (गुप्तरोग) विषयी तपासणी करण्यात आली. सांगता समारंभामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून    जनजागृती करण्यात आली. रिता   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व अध्यक्ष    गजराज राठोड,   जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण ,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  संजय माने,   सीएसआर विभाग प्रमुख  राजेश   नैनकवाल तसेच   सीएसआर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   सीएसआर प्रमुख  राजेश   नैनकवाल यांनी यापुढे   जिल्हा एड्स प्रतिबंध व नि

जागतिक मृदा दिवस : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण

Image
        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- जागतीक मृदा दिनाचे औचित्यसाधून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ व मार्गदर्शनाचा कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील आंबेपूर येथे  आमदार सुभाष पाटील यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले.               रायगड जिल्हयात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2017-18 मध्ये जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्याकरीता जिल्हयातील 978 गावांतून 16500 माती नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामध्ये 163264 शेतक-यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतूलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, जमिन सुपिकता निर्देशांक तसेच पिक अन्नद्रव्य वापराच्या शिफारशीसह शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.                   जमिनीचे आरोग्य व सुपिकता दिर्घकाळ टिकवुन ठेवण्याकरीता तिचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे यासाठ

जागतिक मृदा दिवस :राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण :आंबेपूर येथे आज कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात माती नमुने गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक मृदा दिनानिमित्त मंगळवार दि. 5 रोजी आंबेपूर येथे जमीन आरोग्य पत्रिका वितरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. असे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी रायगड यांनी कळविले आहे. सकाळी 11 वाजता आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिका वितरण होणार आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2017-18 मध्ये जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमा अंतग्रत शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्याकरीता जिल्ह्यातील 978 गावांतून 16500 माती नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामध्ये 163264 शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारीत अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस राज्यात साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्यसाधून रायगड

लोकशाही दिनात 8 अर्ज प्राप्त

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये   8   अर्ज प्राप्त झाले आहेत.                 यामध्ये महसूल विभाग- 4 व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-3, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण-1 असे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले आहेत.   त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांचे 2 अर्ज जागीच निकाली काढण्यात आले. मागील प्रलंबित अर्ज 6   आणि आजचे 6 असे एकूण 12 अर्ज प्रलंबित आहेत.   यात महसूल विभाग-8, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-2,  अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण-1.    यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीधर बोधे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती जयमाला मुरुडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकरी (सा.प्र.) जि.प.रायगड प्रकाश खोपकर विविध शासकीय विभागाचे अधिकारी   उपस्थित होते. 0000

क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तर मास्टर ट्रेनर प्रशिक्षण

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी क्रीडा धोरणानुसार खेळातील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षणाच्या पद्धती,नवीन खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे क्रीडा शिक्षकांचे निवासी राज्यस्तर मास्टर ट्रे नर प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातून 10 पात्र क्रीडा शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे त्यातील 5 हे फुटबॉल खेळातील असणार आहेत. मास्टर ट्रेनर साठीचे निकष – १)      जिल्ह्यातील ज्या शाळांचे अधिक संघ शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य मिळवत असतील तसेच त्यांचेकडे क्रीडा सुविधा उपलब्ध असतील अशा शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल. २)      राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच उच्चतम क्रीडा अर्हता (एन.आय.एस.,एम.पी.एड इ.) ३)      जिल्ह्यामध्ये विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये यांचे जाळे असणा-या शिक्षण संस्थांमधील प्रशि

अलिबाग पं. स.ची मासिक सभा गुरुवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:-   अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.7रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती अलिबाग सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेस सर्व सदस्य्,सदस्या यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पं.स.सभापती प्रिया नथुराम पेढवी, यांनी केले आहे. 00000

डोलवी, सहाण येथे जनजागृतीपर कार्यक्रम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- 1 डिसेंबर 2017 जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवाड्यानिमित्त जेएसडब्ल्यु कंपनी लेबर कॉलनी,   डोलवी, ता. पेण,   जि.रायगड   येथे   एचआयव्ही एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व   जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेणचे    अध्यक्ष   गजराज राठोड    यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून   करण्यात आले.    यावेळी   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  संजय माने, हेड आफ सिक्युरिटी   श्रीनाथ मुधोळकर, सीएसआर प्रमुख  राजेश   नैनाकवाल तसेच   संहिता चटर्जी सीएसआर विभाग व   डापकु विभाग यांची उपस्थिती होती.   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी यांनी   एचआयव्ही एड्स   विषयी शपथ दिली.   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  माने यांनी   एचआयव्ही विषयी माहिती दिली.   यावेळी    जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण    यांचेमार्फत   मोबाईल आयसीटीसी व्हॅनला डिजिटल मोबाईल आयसीटीसी व्हॅन (सुशोभीकरण) चे   उदघाटन   डॉ. गवळी   यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच   जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण यांचे सौज