डोलवी, सहाण येथे जनजागृतीपर कार्यक्रम




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- 1 डिसेंबर 2017 जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवाड्यानिमित्त जेएसडब्ल्यु कंपनी लेबर कॉलनी, डोलवी, ता. पेण, जि.रायगड येथे एचआयव्ही एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेणचे  अध्यक्ष  गजराज राठोड  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.  यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  संजय माने, हेड आफ सिक्युरिटी श्रीनाथ मुधोळकर, सीएसआर प्रमुख  राजेश  नैनाकवाल तसेच संहिता चटर्जी सीएसआर विभाग व डापकु विभाग यांची उपस्थिती होती. 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी यांनी एचआयव्ही एड्स विषयी शपथ दिली. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  माने यांनी एचआयव्ही विषयी माहिती दिली. 
यावेळी  जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण  यांचेमार्फत मोबाईल आयसीटीसी व्हॅनला डिजिटल मोबाईल आयसीटीसी व्हॅन (सुशोभीकरण) चे उदघाटन  डॉ. गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण यांचे सौजन्याने  दि रुरल अँड यंग फाऊंडेशन, पेण, जि.रायगड यांचे मार्फत पथनाट्याचे सादरीकरण उपस्थितांच्या समोर करण्यात आले.
प्रास्ताविक श्रीम. संहिता चटर्जी यांनी  केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे.एस.डब्लू. सीएसआर विभागातील किरण म्हात्रे  व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच डापकुमधील   जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक  नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा  रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.अँड ई. सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर,   आयसीटीसी विभागातील  समुपदेशक  श्रीम. अर्चना जाधव,  सचिन जाधव, अमोल नारखेडे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, एआरटी मधील समुपदेशक  राजकुमार बिराजदार, डेटा मॅनेजर सौ. कोमल लोखंडे,  एसटीडी विभागातील समुपदेशक  प्रतिम सुतार, मोबाईल आयसीटीसी व्हॅन वाहनचालक किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील आदींनी परीश्रम घेतले.
सहाण येथे कार्यक्रम
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'एचआयव्ही, एड्स एक आव्हान युवकांची  जबाबदारी' या कार्यक्रमाचे  आयोजन सहाण येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित रासेयो शिबिरात करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय माने, डापकू सामान्य रुग्णालय अलिबाग व श्री. गणेश उपस्थित होते. यावेळी शिबीरार्थींनीमधून इच्छुक 57 शिबीरार्थींनी एचआयव्ही चाचणी केली. त्यानंतर गावातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक