Posts

Showing posts from October 11, 2020

मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना बंधनकारक -- सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण अं.दराडे

     अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना दि. 1 ऑक्टोबर 20 पासून ते खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेल्या मिठाई पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे, हे ठळकपणे नमूद करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण अं.दराडे यांनी स्पष्ट केले आहे.        बऱ्याच दुकानातून छोट्या कागदी बॉक्स मधून मिठाईची विक्री केली जाते.   मात्र ही मिठाई कधीपर्यंत खाणे योग्य आहे, याचा उल्लेख नसतो.   हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे गोड पदार्थ किती दिवसांपर्यंत खाणे योग्य राहू शकतात, हे ग्राहकांना न समजल्यामुळे बऱ्याच वेळा ग्राहकांकडून मिठाईचे सेवन केल्याने ग्राहकांच्या आरोग्यास अपाय होऊन अन्न विषबाधेसारखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.    त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके प्रधिकरण नवी दिल्ली यांनी दि.25 जून 2020 रोजी आदेश निर्गमित केले असून हे आदेश दि. 1 ऑक्टोबर 20

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजूंनी लाभ घ्यावा

    अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत ( CMEGP ) राज्याच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत राबविण्यात येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनानेही योजना सुरु केली आहे. जिल्हयातील युवक-युवतीच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरु केलेल्या या योजनेद्वारे उत्पादन व सेवा आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे. या योजनेमार्फत उत्पादन उद्योगांकरिता रु.50 लाख व सेवा उद्योगांकरिता रु.10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते तर शासनामार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के व शहरी भागातील लाभार्थ्यांकरिता 15 ते 25 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव करण्यासाठी पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास, जाती

तीनशेपेक्षा जास्त लोकसंख्येच्या वाड्यांचे महसूली गावांमध्ये रूपांतर करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

  अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- रायगड जिल्हा डोंगराळ भागांमध्ये मोडत असून जिल्ह्यामध्ये वाडयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.   केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायद्याची प्रभावी व गुणात्मक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय महसूल यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे.   त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार ज्या वाड्यांची लोकसंख्या तीनशेपेक्षा अधिक झाली असेल अशा वाड्यांचे महसूली गावांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे.   या बाबींचा विचार करून जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण व डोंगरी भागातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सबल करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वाड्यांचे महसूली गावांमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता असल्याने त्यानुषंगाने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सन 2012 मध्ये ज्या वाड्यांचे महसूली गावांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, अशा गावांचे महसूली अभिलेख स्वतंत्र करावेत, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी या कामासाठी कृती आराखडा तयार करून संपूर्ण कार्यवाही साधारणत: एक महिन्यामध्ये पूर्ण करून तसा अहवाल सादर करावा, सध्या ज्या वाड्यांची लो

कोयना धरणबाधित कुटुंबांच्या स्वेच्छा पुनर्वसन वसाहतींना महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याची कार्यवाही डिसेंबर 2020 पूर्वी पूर्ण करावी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

  अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- कोयना धरणामधील बाधीत कुटुंबांनी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वेच्छा पुनर्वसनाद्वारे वसाहती स्थापन केल्या आहेत.   राज्य शासनानेही या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या वसाहतींना अद्याप महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याची कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी राज्य शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विहित कार्यपद्धती अनुसरून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबत व तद्नंतर स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित करून संबंधित विभागास परिपत्रक तातडीने निर्गमित करण्याचे, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी संपूर्ण कार्यवाही डिसेंबर 2020 पूर्वी पूर्ण करण्याचे, त्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल दरमहा मंगळवारी राज्यमंत्री तथस पालकमंत्री, रायगड यांच्या कार्यालयास सादर करण्याचे व जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यानही याबाबत वेळोवेळी अवगत करण्याचे जिल्हा प्रशासनाला नि

जिल्ह्यातील प्रलंबित महत्त्वाचे विषय तात्काळ मार्गी लावावेत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश

              अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमार्फत विविध उपक्रम, योजना व उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी तयार केलेल्या प्रस्तावास कालबद्ध कालावधीमध्ये शासनाची मान्यता घेणे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या बाबीचा सर्वंकष विचार करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हास्तरीय विभागप्रमुखांनी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयांची यादी तयार करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची बैठक घेऊन विभागनिहाय शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयांची यादी संबंधित विभागप्रमुखांकडून दरमहा प्राप्त करून घ्यावी, त्याची प्रत राज्यमंत्री तथा पालकमंत्री, रायगड यांच्या कार्यालयात सादर करावी, शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आवश्यक माहिती सादर करणे व त्याच्या समन्वयासाठी विभागप्रमुखांनी दर पंधरवड्यामध्ये सोमवारी राज्यमंत्री तथा पालकमंत्री, रायगड या कार्यालयाशी समन्वय ठेवून प्रस्तावांची सद्य:स्थिती व आवश्यक कार्यवाहीबाबत अवगत करावे, त

चेंढरे ग्रामपंचायत मध्ये "जागतिक हात धुवा दिवस" साजरा

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- येथील चेंढरे ग्रामपंचायतमध्ये आज जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.               यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत, ग्रामविकास अधिकारी  निलेश गावंड, सुरेश पाटील,  रविकिरण गायकवाड, दत्तात्रय नाईक, श्रीमती रुपाली नाईक  व ग्रामस्थ उपस्थित होते.        मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन या नियमांचे  पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला झाला.        यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी उपस्थितांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविले व हात धुण्याचे महत्वही सांगितले. 000000

"माझे कुटुंब-माझी जबाबदारी”बक्षीस योजनेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरींचे आवाहन

      अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :-     राज्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि को-मॉर्बिड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी व जनजागृती करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात "माझे कुटुंब माझी जबाबदारी ”   ही मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान आता शासनाने "माझे कुटुंब-माझी जबाबदारी " मोहीम बक्षिस योजना राज्यात प्रत्येक जिल्हयात राबविण्याचाही निर्णय घेतला आहे.               ही बक्षिस योजना व्यक्ती आणि संस्थांसाठी आहे. जिल्हास्तरावर ही बक्षिस योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार असून, महानगरपालिका स्तरावर,महानगरपालिका आयुक्तांमार्फत तर आमदार मतदारसंघ स्तरावर उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.या स्पर्धेतील बक्षीस योजना दोन प्रकारच्या आहेत. यामध्ये योजनेतील सर्व स्पर्धाचे ऑनलाईन आलेले साहित्य तपासून गुणानुक्रमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्तरावर समिती नेमून त्या समितीमार्फत गुणानुक्रमांक निश्चित करण्यात य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 96 मि.मी.पावसाची नोंद

      अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 3 हजार 678.43 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 150.00 मि.मी., पेण-123.00 मि.मी., मुरुड-127.00 मि.मी., पनवेल-97.60 मि.मी., उरण-65.00 मि.मी., कर्जत-124.20 मि.मी., खालापूर-124.00 मि.मी., माणगांव-54.00 मि.मी., रोहा-85.30 मि.मी., सुधागड-90.00 मि.मी., तळा-69.00 मि.मी., महाड-72.00 मि.मी., पोलादपूर-98.00 मि.मी., म्हसळा-71.00 मि.मी., श्रीवर्धन-74.00 मि.मी., माथेरान-121.60 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 545.70 मि.मी.इतके असून सरासरी 96.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 114.36 मि.मी.इतकी टक्के आहे. 00000

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाहिली आदरांजली

Image
  वृत्त क्रमांक:-1275                                                                                            दिनांक:- 15 ऑक्टोबर 2020        अलिबाग,जि.रायगड,दि.15, (जिमाका)- भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.        यावेळीउपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, तहसिलदार सतिष कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. 0000000

मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी मौजे पांगळोली येथील जागा हस्तांतरित पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय

    अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या मागणीनुसार तसेच उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी केलेल्या शिफारशीनुसार व अवर सचिव, कौशल्य विकास   व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि.6 ऑक्टोबर 2020 च्या पत्रान्वये रायगड जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 22 व महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 मधील नियम-5 व 6 तसेच महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.जमीन 2015/प्र.क्र.55/ज-1, दि.31 डिसेंबर 2015 (द्वितीय सुधारणा) नियम 2015 मधील नियम 3 (ब) मधील तरतूदीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील मौजे पांगळोली येथील गट नं.104 मधील 11-40-0 हेक्टर   जमीन   कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.               पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यात अद्ययावत अशी मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे ऊसर येथील जागा हस्तांतरित नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा जबरदस्त पाठपुरावा

    अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012   च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व   भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती.             त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं.75/1अ, क्षेत्र 17-10-14 हे.आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हे.आर. व 3-50-00 हे.आर. या सरकारी गुरचरण, ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या आहेत.                 तसेच मौजे ऊसर   येथील सर्व्हे नं.75/1क, क्षेत्र 07-50-40 हे.आर.मधील 4-00-44 हे.आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनीही शासनजमा करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्य

चला हात स्वच्छ धुवू.. करोनाला हरवू …!

Image
  विशेष लेख क्र.31                                                                                           दिनांक :- 14 ऑक्टोबर 2020       दरवर्षी दि.15 ऑक्टोबर हा दिवस “ आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस ” म्हणून साजरा केला जातो.   स्वच्छतेविषयी जाणीवा समृद्ध   व्हाव्यात व सुदृढ आरोग्यदायी जीवनासाठी हात धुण्याविषयी प्रभावी जागृती होण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे.   रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायतीमध्ये हात धुण्याची मोहीम सोशल डिस्टंसिंग ठेऊन केली जाणार आहे.   “ नेहमी स्वच्छ हात धुवा व निरोगी राहा ” असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. करोनाची साथ जगभरात थैमान घालत आहे.   याचा प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व शासकीय आरोग्य यंत्रणेकडून मुख्य उपाय सांगितला जातो तो म्हणजे हात धुवा.   साधा उपाय सर्दी, खोकला, फ्लू , स्वाइन फ्लू व झाला करोना विषाणू टाळण्यासाठी सांगितला जातो.   विशेषत: श्वसनमार्गाला आणि पचनसंस्थेला बाधित करणाऱ्या वायरस

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

              अलिबाग,जि.रायगड, दि.14 (जिमाका) :- जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार सप्टेंबर, 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.   यासाठी सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व प

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित होणार “पालकमंत्री कक्ष”

    अलिबाग,जि.रायगड, दि.14 (जिमाका) :- रायगड जिल्हा हा नागरी, ग्रामीण, आदिवासी बहुल, औद्योगिक, डोंगराळ भाग अशा स्वरुपांमध्ये समाविष्ट होत असल्याने जिल्ह्यामध्ये अनेक नागरी व तत्सम सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संघटना, पत्रकार, स्वयंसेवी संस्थांकडून शासनाकडे तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे अनेक निवेदने प्राप्त होत असतात. केंद्र व राज्य शासनाची प्रचलित धोरणे, योजना व विविध कायद्यामधील तरतूदी विचारात घेवून जिल्ह्यामध्ये नागरी व तत्सम सुविधा निर्माण करणे, शासनाच्या धोरणांची, योजनांची कायद्यांची विहित कार्यपद्धती अनुसरून कालबद्ध कालावधीमध्ये अंमलबजावणी करणे, पात्र लाभार्थी शोधून त्यांना अनुज्ञेय लाभ देणे व तत्सम बाबींसाठी नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, पत्रकार, स्वयंसेवी संस्था व प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक व गुणात्मकरित्या चांगला समन्वय साधण्यासाठी   सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय, उपविभागीयस्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये “ पालकमंत्री कक्ष " स्थापन करण्याचा निर्णय

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास शासनाची मान्यता पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नांना यश

  वृत्त क्रमांक:-1270                                                                                            दिनांक:- 13 ऑक्टोबर 2020   अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका) :- भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन शासकीय महाविद्यालयासाठी वापर   करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.               सन 2012 मध्ये तत्कालीन वित्त मंत्री सुनिल तटकरे यांनी या वैदयकीय महाविदयालयाच्या मंजूरीची घोषणा केली होती. तर आता याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हे वैदयकीय महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होणेबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आज या शासकीय वैदयकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास शासन मान्यता मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय आज ज

पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिले फणसाड अभयारण्याच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्नांचे आदेश

  अलिबाग, जि.रायगड,दि.12 (जिमाका):-  जैवविविधतेने नटलेले फणसाड अभयारण्य आपल्या जिल्ह्याचे वैभव आहे. येथे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना,उपक्रम राबविणे आवश्यक असून वन विभागाने येथील पर्यटनवाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.        दि.11 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फणसाड अभयारण्य येथील पर्यटनवाढ या विषयाबाबत या अभयारण्यास भेट दिली,त्यावेळी त्यांनी हे निर्देश संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.        यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव डॉ. जगन्नाथ वीरकर, प्रांताधिकारी शारदा पाेवार,उपवनसंरक्षक ठाणे (वन्यजीव) डॉ.भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते,तहसिलदार गमन गावीत, फणसाड वनक्षेत्रपाल आर.बी. भोसले, सुपेगाव वनपाल यू.डी. पाटील, सुपेगाव वनरक्षक जी.बी. बांगर,वनरक्षक अरुण पाटील,आतिब खातीब, मंगेश दांडेकर, स्थानिक नागरिक आदींची उपस्थिती होती.         पालकमंत्री कु.आदिती

उप जिल्हा रुग्णालय रोहा येथील डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Image
  अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.12 :- करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ऑक्सिजनची वाढती गरज भागविणे आवश्यक असल्याने उप जिल्हा रुग्णालय रोहा येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.             यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रांताधिकारी यशवंत माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, उपनगराध्यक्ष  महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, आरोग्य सभापती अहमद शेख दर्जी, पंचायत समिती सभापती गुलाबताई वाघमारे तसेच मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, विजय मोरे, महेंद्र गुजर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.             रोहा तालुक्यातील  रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास अलिबाग, माणगाव, महाड येथील रक्तपेढीकडून रक्त आणावे लागत होते. खाजगी रूग्णालयामधील शस्त्रक्रिया, गरोदर माता व ॲनिमियाच्या रुग्णांसाठी रक्तपुरवठ्याच्या कमतरतेमुळे अडचण येत होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे  डयुरासिल लिक्विड ऑक्सिजन टँक आणि रक्त साठवणूक केंद्राचे  पालकमंत्री  कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन कर