कोयना धरणबाधित कुटुंबांच्या स्वेच्छा पुनर्वसन वसाहतींना महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याची कार्यवाही डिसेंबर 2020 पूर्वी पूर्ण करावी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 


अलिबाग,जि.रायगड दि. 16 (जिमाका) :- कोयना धरणामधील बाधीत कुटुंबांनी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वेच्छा पुनर्वसनाद्वारे वसाहती स्थापन केल्या आहेत.  राज्य शासनानेही या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या वसाहतींना अद्याप महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याची कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी राज्य शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विहित कार्यपद्धती अनुसरून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबत व तद्नंतर स्वतंत्र महसूली अभिलेख तयार करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित करून संबंधित विभागास परिपत्रक तातडीने निर्गमित करण्याचे, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी संपूर्ण कार्यवाही डिसेंबर 2020 पूर्वी पूर्ण करण्याचे, त्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल दरमहा मंगळवारी राज्यमंत्री तथस पालकमंत्री, रायगड यांच्या कार्यालयास सादर करण्याचे व जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यानही याबाबत वेळोवेळी अवगत करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज