Posts

Showing posts from October 22, 2017

आरोग्यमंत्र्यांनी केली माथेरान येथील रुग्णालयाची पाहणी:आरोग्यसुविधेसाठी माथेरान मध्ये 'महाबळेश्वर पॅटर्न'- ना.डॉ. दीपक सावंत

Image
          अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-     माथेरानमधील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक आहे. उद्योजकांकडून सामाजिक सहायता निधी उभारून महाबळेश्वर मध्ये आरोग्य व्यवस्था प्रदान केली जात आहे त्याच पद्धतीने माथेरान मध्ये आरोग्य सुविधा देण्यात येतील. याठिकाणी दर 15 दिवसांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल. महाआरोग्य शिबिरासाठी औषधेही त्याच माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे  सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज माथेरान ता. कर्जत येथे केली.             राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत  यांनी आज माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या दवाखान्याची पाहणी करुन  तेथील आरोग्य सुविधेविषयी माहिती घेतली.त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह माथेरान मधील सरकारी दवाखान्याची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, तहसीलदार अविनाश कोष्टी, मुख्याधिकारी सागर घ

केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचिरूलू यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचिरुलू हे  सोमवार दि.30 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.30 रोजी सायंकाळी आरसीएफ, थळ येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. 'माय व्हिजनः करप्शन फ्री इंडीया' या विषयावर व्याख्यान, स्थळः आरसीएफ, थळ ता.अलिबाग. त्यानंतर मुंबईकडे रवाना. ०००००

शाश्वत विकासाची यशस्वी तीन वर्षे-कोकणात सर्वांगिण पायाभूत सुविधा

            महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या तीन वर्षात सिंचन, कायदा व सुव्यवस्था, कौशल्य विकास, शेती विकास, ग्रामीण आणि नागरी स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या बरोबरच डिजीटल प्रशासनात महाराष्ट्राने शाश्वत विकासची एक नवी दिशा दाखविली आहे आणि भरीव कामे उभे राहीले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या कोकण महसूल विभागाने गेल्या तीन वर्षात फलोत्पादन, रस्ते विकास, सिंचन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या बरोबरच केंद्र शासनाच्या मदतीने अनेक नवीन प्रकल्प कार्यान्वित केले. त्याचे प्रत्यक्ष लाभ आता मिळू लागले आहेत.  हे विशेष होय.             कोकणात शेती विकासासाठी विशेष प्रयत्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेंतर्गत देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी योजना लागू करण्यात आली. आणि याचा फायदा कोकणात मोठया प्रमाणावर झाला. राज्य शासनाने राबवलेल्या या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील एकूण २०७ विकास सहकारी संस्था आणि २० राष्ट्रीयकृत बँका पात्र ठरल्या असून त्यांचे अनुक्रमे २१ हजार ४

नवीन पनवेल येथे आज रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रोटरी क्ल्ब ऑफ पनवेल-MIDTOWN यांच्या संयुक्त विद्यमाने    शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी दहा वाजता के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालय,सेक्टर-18,नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्टेशन जवळ,ता.पनवेल जि.रायगड   येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.             यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली की, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यांना 10वी, 12वी, पदवी, पदवीधर, आयटीआय, सी.एन.सी प्रोग्रॅमिंग, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशिअन,डिप्लोमा इन प्रिंटींग अँड पॅकेजिंग,एम.एस.सी.केमिस्ट्री OR पॉलिमर केमेस्ट्री (5 ते 7 वर्षाच्या अनुभवासह ) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात मुलाखतीस येतांना   उमेदवाराने स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह के.आ.बांठ

सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताह

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-   भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती होण्यासाठी शासन दि 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करत असते. यंदाही सोमवार दि.30 पासून जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयात शपथ देवून सप्ताहाची सुरुवात वरिष्ठांचे संदेश वाचन करुन होणार आहे. त्यानंतर  अधिक्षक जिल्हा डाकघर रायगड अलिबाग येथे जनजागृती बैठक व पत्रके वितरण,   अलिबाग शहरात शासकीय कार्यालय, बस स्थानक, समुद्रकिनारा, स्थानिक बाजारपेठ येथे पत्रके वाटणे व स्टीकर चिकटवणे, जनजागृती करणे. अलिबाग शहर परिसरातील शाळा, कॉलेज मध्ये जनजागृती करण्यासाठी मिटींगचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 31 ऑक्टोंबर, रोजी सकाळी 11 वाजता आरसीएफ कंपनी थळ तर्फे कुरुळ येथे आयोजित जनजागृती मिटींगकरिता अधिक्षक जिल्हा डाकघर रायगड उपस्थित राहून मार्गदर्शन ल. दुपारी 4 वाजता   बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय अलिबाग तर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन. पेण, वडखळ, पोयनाड या हद्दीत शासकीय कार्यालये, बस स्थानक

उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 - राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री ना. सुभाष देसाई  हे   रायगड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.28 रोजी दुपारी तीन वाजता माणगांव येथून मोटारीने पाताळगंगा (पनवेलकडे)प्रयाण. सायंकाळी पाच वाजता हाय रिच आदित्य इंडस्ट्रिज उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. ठिकाण-प्लॉट नं.एन-2,एन-2,3, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया,पाताळगंगा, कसप व्हिलेज,पनवेल. ०००००

आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-   राज्याचे सार्वजनिक आरोग्य् व कुटूंब कल्याण मंत्री ना. डॉ.दीपक सावंत, हे शनिवार दि. 28 रोजी माथेरान ता. कर्जत जि. रायगड येथील दौऱ्यावर आले असूनचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - शनिवार दि.28 रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत नगरपरिषद रुग्णालय, माथेरानबाबत चर्चा.अकरा वाजेनंतर माथेरान येथे राखीव. रविवार दि.29 रेाजी सायंकाळी पाच वाजता माथेरान येथून मोटारीने सानपाडा नवी मुंबईकडे प्रयाण. 00000

केंद्रीय मंत्री अनंत गीते:यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे रविवार दिनांक 29 रोजी   जिल्हादौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.29 रोजी दुपारी अडीच वा. महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी, नागोठणे,जि.रायगड येथे आगमन. दुपारी सव्वा तीन वाजता महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी, नागोठणे,जि.रायगड येथून माणगांवकडे प्रयाण. सायं. चार वा. अशोक साबळे हायस्कुल, माणगांव जि.रायगड येथे आगमन. साडे पाच वा. अशोक साबळे हायस्कुल, माणगांव जि.रायगड येथून व्हाया वाखंड पाली,एक्सप्रेसवे ,पनवेल,शिळफाटा,कल्याण मार्गे   नाशिककडे प्रयाण. 00000

आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना:जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-   आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई तसेच   आदिवासी क्षेत्र, आदिवासी विकास महामंडळ नाशिक या अभिकर्ता संस्थांमार्फत शासनाची धान खरेदी केंद्र  सुरु करण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्रासाठी कशेळे व पाथरज ता. कर्जत ही दोन केंद्र आहेत,असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त् केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांचेमार्फत   रायगड जिल्ह्यातील अलिबाग,कर्जत,सुधागड,माणगाव, खालापूर, रोहा,पोलादपूर, महाड, पेण, श्रीवर्धन तसेच   आदिवासी क्षेत्र, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या अभिकर्ता संस्थेने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय,जव्हार यांचेमार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2017-18 मध्ये कर्जत तालुक्यातील कशेळे व पाथरज या दोन मंजूर धान खरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहे. धान खरेदीचा कालावधी हा खरीप पणन हंगाम कालावधी दि.5ऑक्टोबर ते 31   मार्च 20

रायगड किल्ला जतन व संवर्धन:पर्यटन सुविधांच्या कामांना प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- रायगड किल्ला जतन संवर्धन व पर्यटन विकासाची कामे आराखड्यानुसार विविध टप्प्यावर आहेत. तथापि पर्यटन सुविधा जसे पार्किंग व्यवस्था, पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे आदी कामांना प्राधान्य देऊन त्वरीत सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा अंमलबजावणी संदर्भात  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित यंत्रणांचा गुरुवारी (दि.26) आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी  अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला येथील अधीक्षक अभियंता मोहिते, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कामांचा विभागनिहाय आराखडा घेतला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत व त्यांच्या निरीक्षणात करावयाची  किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू व स्थळांच्या जतन, संवर्धनाची कामे, तसेच पर्यटक सुविधा, किल्ल्यापर्य

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा-2017-18किक बॉक्सींग:खेळातून मिळते आयुष्य जगण्याची शिकवण-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी:राज्यभरातील 500 हून अधिक खेळाडू सहभागी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 27 -   आयुष्यात खेळांचं खुप महत्त्व आहे. खेळांमुळे आपल्याला ताण तणावाचं व्यवस्थापन करण्याचे शिक्षण मिळते. शारिरीक बल, निर्णय क्षमता या गोष्टी आत्मसात करतांना खेळ आपल्याला आयुष्य जगण्याची शिकवण देत असतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. महाराष्ट्र   शासनाच्या   क्रीडा   व   युवक   सेवा   संचालनालयाच्या   वतिने   राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत   ‘किक बॉक्सिंग’   स्पर्धाचे   आयोजन   जिल्हा   क्रीडा   परिषद ,   रायगड अ लिबाग   च्या   वतिने   दि .   २७   ते   २९   ऑक्टोबर या   कालावधीत   जिल्हा   क्रीडा   संकुल ,   नेहुली ,   अलिबाग   येथे   करण्यात आले आहे .  या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक ,   एन .   बी .   मोटे   हे   अध्यक्षस्थानी  उपस्थित होते. तसेच   शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नथुराम पाटील, जिल्हा   क्रीडा   अधिकारी   महादेव   कसगावडे, किक बॉक्सिंग संघटनेचे मंदार पनवेलकर, प्रविण पाटील, संतोष म्हात्रे,  प्रदीप शिंदे, स